January 2021

विद्यार्थी आणि मानसिकता

विद्यार्थी आणि मानसिकता बरेच विद्यार्थी आज सुद्धा अभ्यासाच्या पद्धतीमध्ये बदल करताना आढळत नाहीत. त्याचा परिणाम त्यांच्या मनावर, शरीरावर, डोक्यावर आणि पर्यायाने कुटुंबावर कळत नकळत होत असतो. अभ्यास पद्धती प्रत्येकाची वेगळी असते. जो तो आपापल्या गुरूकडून ती घेत असतो. पुढे जाऊन त्या पद्धतीमध्ये कालानुरूप बदल करणे अपेक्षित असून जर तो बदल केला गेला नाही तर चिंताजनक …

विद्यार्थी आणि मानसिकता Read More »

कंटाळा आणि थकवा

  मला अभ्यासाचा खूप कंटाळा व नंतर थकवा येतो हे वाक्य आता बहुतेक मुलांच्या तोंडी आहे. अर्थात ते नेहमीच असते परंतु परीक्षा तोंडावर आल्या की हा कंटाळा अजून डोके वर काढतो. मग अभ्यास होत नाही म्हणून वर कांगावा. का होतं असं म्हणून बरेच विद्यार्थी आणि पालक अनेकदा चौकशी करतात. महत्वाचं म्हणजे कंटाळा हे थकव्याचे व …

कंटाळा आणि थकवा Read More »

थकवा आणि मानसिकता

काल “थकवा आणि मानसिकता” याविषयावर समुपदेशनाचे ऑनलाईन चर्चासत्र झाले. त्यामध्ये बरेच जन विविध प्रश्न विचारून शंका समाधान करून घेत होते. त्यापैकी नेहमीप्रमाणे हाच प्रश्न होता की आपण थकतो म्हणजे नेमकं काय? आपल्या बहुतेक थकव्याचा उगम मेंदूमध्ये होतो. खरं तर फक्त आणि फक्त शारीरिक कारणांमुळे निर्माण होणारा थकवा तसा दुर्मिळ असतो. फक्त मानसिक श्रमामुळे तुम्ही थकू …

थकवा आणि मानसिकता Read More »

अयोग्य निंदा आणि मार्ग

आजकल निंदा करणं रोजचं झालं आहे. कुणीही उठावं आणि कुणाचीही निंदा करावी. लोकशाहीमध्ये त्यातल्या त्यात राजकारणातून अनेकदा अशा निंदा ऐकून, किती हा मूर्खपणा म्हणून आपण जळफळाट करत असतो. अर्थात त्याचा आपल्याशी कसलाही संबंध नसताना मानसिक यातना मात्र भोगाव्या लागतात. एका थोर पुरुषाने म्हटले आहे, “नीच दर्जाचे लोक हे थोर व्यक्तींच्या चुका आणि मूर्खपणाचा खूपच जास्त …

अयोग्य निंदा आणि मार्ग Read More »

आनंदी मानसिकता

निराशेमुळे मला झोपेचा मोठा प्रोब्लेम आहे असा एक मित्र समुदेशनदरम्यान बोलत होता. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा प्रश्न आहे.  निराशा आणि झोपेचा खूप जवळचा संबंध आहे. जेंव्हा हे दोघे एकत्र असतील तेंव्हा मात्र विचार करावा लागतो. तुम्हाला झोप येत नसेल तेव्हा त्या वेळेचा सदुपयोग आपण कोणाला कशा प्रकारे आनंदी करू शकतो, याचा विचार करण्यासाठी केल्यास फायदा …

आनंदी मानसिकता Read More »

बदला आणि मानसिकता

किशोर प्रचंड संतापात माझ्याशी काल बोलत होता. त्याची कुणीतरी जाणुनबुजून छेड काढतेय, त्याला उसकवण्याचा प्रयत्न करतंय हे जाणवत होतं. त्याची पूर्ण माहिती ऐकून घेऊन त्याला फक्त एकच प्रश्न विचारला की यामध्ये सर्वात दुःखी कोण आहे, तू की तो. आता मात्र तो दोन मिनिटे शांत होऊन बोलला की “मी”. त्याला उत्तर माहिती होतं परंतु राग व्यवस्थापनाची …

बदला आणि मानसिकता Read More »

फक्त आज

‘तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा असा कोणता धडा शिकला?’ हा प्रश्न मी एक समुपदेशन घेणाऱ्या व्यक्तीला विचारला. थेरपीचा एक भाग म्हणून त्याच्याकडून उत्तराची अपेक्षा होती. त्याचे उत्तरही माफक होते परंतु त्यात म्हणावी अशी गहराई नव्हती.  मी आज आनंदी राहण्याचा प्रयत्न करणे, हा आतापर्यंत मी शिकलेला सर्वात महत्त्वाचा धडा माझ्यासाठी होता. प्रत्येक जण काहींना काही धडा …

फक्त आज Read More »

भूतकाळ आणि चिंता

“चिंता” याविषयावर मी नेहमीच लिहित आलोय कारण तिच एकमेव मोठी गोष्ट आपल्याला मानसिक त्रासाकडे नेत असते. त्याबाबत एका वेबीनार मध्ये आम्ही काल मोठी चर्चा केली. त्यात शेक्सपियर ने लिहिलेलं एक वाक्य मी इतरांना सांगितलं की “बुद्धिमान व्यक्ती कधीही आपल्या नुकसानीबद्दल शोक करीत नाही, तर हे नुकसान कसे भरून काढता येईल याचा आनंदाने विचार करतात.” याचाच …

भूतकाळ आणि चिंता Read More »

मन आणि विचार

  तुमचे मन एखाद्या उद्यानासारखे असते ज्याची काळजीपूर्वक, योग्य देखभाल केली तर ते बहरू शकते किंवा त्याकडे दुर्लक्ष केले तर त्यात अवाजवी तणही माजू शकते. परंतु एक गोष्ट निश्चित की या उद्यानाकडे दुर्लक्ष करा वा त्याची काळजी घ्या, त्यात काहीतरी उगवेलच. जर त्यात उपयुक्त बीजे पेरली गेली नाहीत तर त्यात बेसुमार गवताची बीजे पसरतील आणि …

मन आणि विचार Read More »

अपयशातून यश

आता परीक्षा येत आहेत, आर्थिक वर्ष संपत आलय, आणि हवे ते निकाल मिळत नाही म्हणून त्रासून जायची वेळ जवळ येतेय म्हणून बरेच मित्र परिवार चिंतित दिसतो आहे. म्हणून जेंव्हा मी त्यांच्याशी चर्चा केली तेंव्हा तेच सांगण्याचा प्रयत्न केला की चिंता तुम्हाला होणं साहजिक परंतु त्यातून फारसे असे प्राप्त काही होणार नाही.   जर तुम्हाला हवे असलेले …

अपयशातून यश Read More »