विद्यार्थी आणि मानसिकता

विद्यार्थी आणि मानसिकता

बरेच विद्यार्थी आज सुद्धा अभ्यासाच्या पद्धतीमध्ये बदल करताना आढळत नाहीत. त्याचा परिणाम त्यांच्या मनावर, शरीरावर, डोक्यावर आणि पर्यायाने कुटुंबावर कळत नकळत होत असतो. अभ्यास पद्धती प्रत्येकाची वेगळी असते. जो तो आपापल्या गुरूकडून ती घेत असतो. पुढे जाऊन त्या पद्धतीमध्ये कालानुरूप बदल करणे अपेक्षित असून जर तो बदल केला गेला नाही तर चिंताजनक आहे. त्यासाठी विद्यार्थी, पालक आणि गुरु (कोच) यांची भागीदारी अतिशय महत्वाची आहे. परंतु नेमका इथेच घोटाळा आहे.

१. मुलांना पालक एकतर आउटडेटेड वाटतात.
२. पालकांना त्यांच्या कामातून मुलांसाठी कित्येकदा वेळ मिळत नाही. आई वर जास्त लोड येतो. तिलाही नवीन पद्धतीची जास्त माहिती नसते. नवीन आया मात्र जातीने लक्ष घालताना दिसतात. परंतु जर का त्या पारंपरिक अभ्यास पद्धतीच्या मागे असतील तर त्यांना मुलांची नवीन पद्धत चुकीची वाटते.
३. एकाच दिवसात मुले अनेक गुरूंकडून शिकत असतात. ऑनलाईन, कोचिंग क्लासेस, शाळा, कॉलेज प्रत्येक गुरु ची पद्धत वेगळी. मुले गोंधळून जातात. कुठली पद्धत चांगली या शोधामध्ये त्यांचा अमूल्य वेळ निघून जातो.
४. स्वतःची पद्धत कुठली याची माहिती नसणे. कशी असावी या माहितीचा अभाव.
५. शाळा कॉलेज मधील शिक्षणाची सुविधा, साहित्य, प्रात्यक्षिक सराव इत्यादींचा सर्वार्थाने असलेला अभाव व निधीची, मानसिकतेची कमी.
६. शिक्षकांच्या स्वतःच्या समस्या. त्यांनाच समुपदेशन उपलब्ध नसणे, किंवा नावीन्याची आस नसणे. अर्थात न करण्यामागे प्रत्येकाच्या भूमिका वेगवेळ्या आहेत.
७. दरवर्षी नवीन शिक्षण व परीक्षा मधील बदल हा बऱ्याच जणांना त्रासदायक होतो. वास्तविक बदलाला सामोरे जाण्याची सकारात्मक प्रवृत्तीची कमी.
८. सोसिअल मीडिया आणि इतर विचलित करणारी साधने.
९. मिळालेली चुकीची माहिती व त्यावर अतिविश्वास.
१०. पहाटे उठण्याची सवय नसणे.
११. वेळोवेळी होणारया चाचण्यांना घाबरणे, उगीच चिंता करणे.

एक न अनेक कारणे मुलांना त्रासदायक ठरतात. आज पालक जरी सजग असले तरीही आपण कुठेतरी कमी पडतोय अशी जाणीव त्यांना होतेच. परंतु मदत कुठे कशी मिळेल याची माहिती नसणे हा सर्वात मोठा प्रश्न. तरीही मुख्य प्रवाह मुलांच्या मानसिकतेचा आहे. पालकांनी किंवा गुरूंनी कितीही सांगितले तरी विद्यार्थ्यांना त्याचे महत्व पटत नाही आणि इथून पुढे सुरु होतो मनाशी संघर्ष.

आपला वेळ मर्यादित आहे म्हणून आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वेळेचे जास्तीत जास्त शैक्षणिक मूल्य मिळवणे महत्वाचे आहे. तथापि, शिकण्याची गती हा एकमेव महत्त्वाचा घटक नाही. विद्यार्थ्यांनी शिकलेल्या माहितीची अचूकपणे आठवण ठेवणे, नंतरच्या वेळी ती आठवण्याची आणि विविध परिस्थितीत याचा प्रभावीपणे वापर करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
एक प्रभावी आणि कार्यक्षम विद्यार्थी बनणे ही एक रात्रभर घडणारी गोष्ट नाही, परंतु या सल्ल्यांपैकी काही सूचना रोजच्या सरावात ठेवल्याने तुम्हाला अभ्यासाच्या वेळेचा अधिकाधिक फायदा होईल.

१. मेमरी इम्प्रूव्हमेंट मूलभूत गोष्टींचा वापर करणे योग्य.
२. नवीन गोष्टी शिकत आणि करत राहण्याची आवड जोडणे आणि वेळोवेळी त्यामध्ये बदल करणे चांगले.
३.जे आपण शिकलो ते इतरांना शिकवण।
४. अगोदर असलेल्या माहितीचा सध्या शिकत असलेल्या टॉपिक शी संबंध लावणे व त्यातून समजून घेतल्यास फार फरक पडतो.
५. प्रात्यक्षिक करून शिकणे काहींना खूप फायदेशीर आहे जे जास्त वेळ बसून अभ्यास करू शकत नाहीत.
६. अभ्यासाचा वेळ आपल्या मूड नुसार ठरवला गेला पाहिजे. तरीही पहाटेचा वेळ हा इतर गोंगाटापेक्षा शांत आणि डोक्यात जास्त विचार नसल्याने कमी वेळात जास्त वाचन होते.
७. वाचनाचा वेग वाढवणे गरजेचे आहे म्हणून कसे वाचावे याचे मार्गदर्शन घ्यायला हवे. जवळपास ३०० शब्द प्रति मिनिटे हा वेग आपल्या हवा.
८. जेंव्हा मानसिक संतुलन, चिंता, डिप्रेशन यांचा त्रास होत असेल तर मानसोपचार तज्ज्ञाला भेटायला मागे पुढे पाहू नका.
९. लक्षात ठेवण्यासाठी संघर्ष करण्यापेक्षा उत्तरे शोधा. वेळ जास्त खर्च होणार नाही.
१०. आपली शिकण्याची क्षमता सुधारण्यासाठी आणखी एक उत्तम रणनीती म्हणजे आपल्या शिकण्याच्या सवयी आणि शैली ओळखणे.
११. एका अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आणि नंतर त्यांची चाचणी घेण्यात आली त्यांची परीक्षेत दीर्घकालीन मेमरी चांगली होती व ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अतिरिक्त वेळ मिळाला परंतु चाचणी घेण्यात आली नाही त्यांच्याकडे मेमरी कमी प्रमाणात आहे असे जाणवले. थोडक्यात, आपल्या वेळोवेळी होणारी टेस्ट्स कडे डोकेदुखी म्हणून पाहू नका, उलट दोस्ती केली तर तुमचाच फायदा.
१२. एका वेळी एकाच विषयाचा विचार. ज्या विषयाचा अभ्यास करायचा तेच पुस्तक समोर पाहिजे. लक्ष विचलित होणार नाही.

मुलांचे प्रॉब्लेम्स नवीन नाहीत. पण जग वेगाने बदलत असल्याने त्यांची नाळ जुन्या मतवादी पालकांशी जुळेनाशी झालीय. म्हणून पालकांना सुद्धा समुपदेशनाची आवश्यकता आहे. मुलांची आवड निवड आपल्याशी जुळेल असे नाही. पण पहा करून मग बघू काय होईल ते, असे विचार मुलांना बुचकळ्यात टाकतात, कदाचित त्यांचे वर्ष वाया जाऊ शकते, पैशाचा अपव्यय आणि मनस्ताप वेगळाच. म्हणून काही टेस्ट आहेत त्या कुणाही मानसोपचार तज्ज्ञाकडून करून घ्या.

१. अभ्यास पद्धत (७ वी ते पदवी )
२. विद्यार्थ्यांची अभ्यासाप्रती असणारी वृत्ती (८ वी ते पदव्यूत्तर )
३. भावनिकता (१० वी ते पदव्युत्तर)
४. पर्सनॅलिटी (१० वी ते पदव्युत्तर )
५. माय चॉईस माय करिअर ( १० वी ते १२ वी)
६. Aptitude (१० वी पदवी)

वरील टेस्ट्स आपल्या पाल्याबाबत शंका निरसन करतील. त्याच प्रमाणे शाळेतील त्यांचे गुणांक, इतर परीक्षा मधील यश, त्यांचे विचार आणि त्यांच्या शिकलेल्या गोष्टींचा प्रत्यक्षात वापर करण्याची वृत्ती हे बरेच काही सांगून जाते. म्हणून त्यांच्या बारीक बारीक सवयी वर लक्ष ठेवा. मुलांना वेळोवेळी खेळ आणि मोबाईल चे व्यसन लागणे क्रमप्राप्त आहे म्हणून ठराविक वेळ त्यांच्या आवडीप्रमाणे खेळूद्या. नाहीतर तुमच्या मागे व्यसनाधीन होतील. अधिक प्रभावी शिकायला शिकण्यास वेळ लागू शकतो आणि नवीन सवयी प्रस्थापित करण्यासाठी नेहमीच सराव आणि निश्चय करावा लागतो. त्यासाठी वेळ हा द्यायलाच हवा.

श्रीकांत कुलांगे
मानसोपचार तज्ञ्

विद्यार्थी आणि मानसिकता

विद्यार्थी आणि मानसिकता

 

4 thoughts on “विद्यार्थी आणि मानसिकता”

  1. खूप सोप्या भाषेत विचार व्यक्त केले आहे,जे पुन्हा पुन्हा पालकांना व मुलांना स्वतः चा मूल्यमापन करायला मदद करेल।

  2. विद्यार्थी आणि मानसिकता: उपयुक्त लेख. Every individual should keep on learning and improving. Change is the only constant thing. Nicely explained how students, teachers and parents should adopt new techniques.

  3. Pingback: स्वयंशिस्त आणि आनंद - Sk Psychological Counselling Hub

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *