कंटाळा आणि थकवा

 

मला अभ्यासाचा खूप कंटाळा व नंतर थकवा येतो हे वाक्य आता बहुतेक मुलांच्या तोंडी आहे. अर्थात ते नेहमीच असते परंतु परीक्षा तोंडावर आल्या की हा कंटाळा अजून डोके वर काढतो. मग अभ्यास होत नाही म्हणून वर कांगावा. का होतं असं म्हणून बरेच विद्यार्थी आणि पालक अनेकदा चौकशी करतात.

महत्वाचं म्हणजे कंटाळा हे थकव्याचे व अभ्यास प्रमाण कमी करण्याचे खरे आणि मुख्य कारण आहे. शारीरिक श्रमाच्या तुलनेत तुमचा भावनात्मिक दृष्टिकोन तुम्हाला जास्त थकवत असतो, हे तसे सर्वांनाच माहीत असलेले वास्तव आहे. तरीही ठराविक कारणं प्रामुख्याने मुलांना कंटाळा येण्याचे आहेत.

१. कायम अभ्यासाचा ध्यास. त्यात ब्रेक न घेता करत राहणे.

२. आवडीचा विषय नसणे.

३. अभ्यासात रुची नसणे.

४. मनाचा विचार व गोंधळ. हे करू की ते.

५. चुका खूप उशिरा समजणे.

६. आता खूप उशीर झालाय, मग पुढे कसं होणार.

७. भावनिक प्रश्न. घरातील / सभोवतालचे अपोषक वातावरण.

८. शारीरिक आजार. जेवण, झोप, आहार यांचे असंतुलन.

९. वेगवेगळी विचलित होण्याची कारणं.

१०. अभ्यास करण्याची जागा.

११. नकारात्मक विचार. विचारांवर अंकुश नसणे.

१२. चुकीचे मित्रमंडळ किंवा सल्ले.

हाच कंटाळा कशा प्रकारे मुलांमध्ये थकवा निर्माण करतो यावर एक प्रयोग केला गेला. ड़ॉ. बारमॅक यांनी विद्यार्थ्याच्या एका गटाला अशा प्रकारच्या परीक्षणांच्या साखळीतून पाठविले की, ज्याची त्यांना अजिबात आवड नव्हती. परिणाम? विद्यार्थी थकले. त्यांना झोप येऊ लागली. ड़ोके दुखी आणि डोळ्यातील तणावाचा त्रास सांगू लागले. त्यांना चिडचिडेपणा जाणवू लागला. काही प्रकरणात तर त्यांच्या पोटातही गडबड झाली. हे सर्व काय फक्त ‘कल्पना’ होत्या का? नाही. या विद्यार्थ्याची मेटॉबॉलिझम टेस्टही करण्यात आली. या परीक्षणाचा निष्कर्ष असा समोर आला की, एखादी व्यक्ती खूप कंटाळते तेव्हा त्याच्या शरीरातील ब्लड प्रेशर आणि ऑक्सिजनचा वापर खरोखरच कमी होतो. त्याला आपल्या कामात आवड आणि आनंद वाटू लागताच त्यांच्या शरीराचे सर्व मेटाबॉलिझम एकदम ठीक होते.

थोडक्यात मुलांचा अभ्यास आणि पद्धत अशी असावी की त्यातून त्यांना विषयासंबंधी आवड निर्माण व्हावी. त्यासाठी लहानपणापासून घरातील वातावरण निर्माण करण्यात आले पाहिजे. कार्यातून शिक्षण पद्धत बेस्ट. आता कदाचित नवीन अभ्याक्रमानुसार बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत. विद्यार्थी आणि पालक वर्ग, दोघानाही मानसिकता बदलावी लागेल कारण आता युग वेगाने बदलत आहे. विद्यार्थ्यांना कंटाळा येऊ नये म्हणून काही गोष्टी आवश्यक.

१. विश्रांती. ७-८ तास चांगली झोप.

२. आपल्या अभ्यासाची तयारी कशी इंटरेस्टिंग हवी ते स्वतः शोधणं.

३. पद्धत आणि आवड या दोन्ही गोष्टी महत्वाच्या.

४. आपले aatitude सकारात्मक ठेवण्यासाठी वेळोवेळी शाळेतील समुपदेशक यांच्याशी संपर्क साधावा.

५. जर समुपदेशक शाळेत नसतील तर मानसोपचार तज्ञाकडून मुलांच्या शिक्षणाची पद्धत आणि विचार कसे आहेत याची मानसिक चाचणी करून घ्यावी. त्यानुसार समुपदेशन घ्यावे.

६. होमिओपॅथी डॉक्टरांना भेटा. ठराविक औषधी गुणकारक आहेत.

७. योग्य व पोषक आहार.

८. व्हिटॅमिन कमतरता तपासणी करून घ्यावी.

९. नित्य व्यायाम मुलांना सतर्क ठेवतो. परीक्षा जवळ आली म्हणून बंद करण्याची गरज नाही.

१०. कृपा करून कामाचा ताण घरी आणू नका. त्यामुळे मुलं विचलित होतात. हसत खेळत गप्पा हे उत्तम टॉनिक चे काम करते.

११. काही मुलं जन्मजात व्यंग घेऊन येतात. त्यांच्या अभ्यासावर परिणाम नक्कीच होतो. LD, ADHD अशा काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.

१२. जिद्द वाढविण्यासाठी प्रयत्न. मोटिवेशन देत राहणं.

अनेक वेळा आपण अशा गोष्टी सुरू करतो परंतु यश येत नाही म्हणून मध्येच सोडून देतो. लक्षात ठेवा जुन्या खोडी जाण्यासाठी व नवीन लावण्यासाठी ठराविक वेळ लागतो, मानसिकता लागते. कंटाळा आणि थकवा एकमेकांना सोडत नाहीत म्हणून अगोदरच काळजी घेतलेली बरी.

तुम्ही आपल्या कामामुळे आनंदी नसाल तर तुम्ही कुठेही आनंदी राहू शकत नाहीत. तुम्ही आपल्या कामात रस घेतल्यामुळे तुमचा मेंदू तुमच्या चिंतांच्या पलिकडे जाऊन विचार करू लागतो. त्यामुळे चिंता आणि भूतकाळ विसरा व नवीन दिवसाकडे सकारात्मकतेने पहा.

©श्रीकांत कुलांगे

मानसोपचार तज्ञ

 

 

 

 

6 thoughts on “कंटाळा आणि थकवा”

  1. Take it easy has become a slogan.
    Children do not understand that one has to go through the process of learning, they like it or not.

    First they have to accept the fact that they have to study.

    Then follow the liking of subjects ..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *