February 2021

तक्रार आणि हेतू

तक्रारीचा सूर कोणीतरी त्यांच्या सगळ्या अडचणी आणि तक्रारी तुम्हाला सांगितल्या तर तुम्हाला कसे वाटेल? उत्साही आणि रसरसून गेल्यासारखे नक्कीच वाटणार नाही ना? सत्य हे आहे की, कोणालाही तक्रार करणाऱ्या व्यक्तीसोबत राहायला आवडणार नाही. नक्कीच आपण कधी ना कधीतरी तक्रार करतो. महत्त्वाचा प्रश्न हा आहे की : आपण किती वेळा तक्रारी करत असतो? आता जेव्हा मी …

तक्रार आणि हेतू Read More »

घड्यावर पाणी!!

  काही माणसे आयुष्यात त्याच त्याच चुका पुन्हा करताना आढळतात. मागील अनुभवावरून केलेल्या चुकांवरून ‘धडा’ घेऊन पुढील कृती करताना पुन्हा पुन्हा तीच कृती करणे टाळावे हे त्यांना जमत नाही. अशीच एक केस मागील आठवड्यात समुपदेशन साठी आली होती. असं का होत असावं ते त्यांना समजत नव्हते. अर्थात हे त्यांच्या हातून आपोआप होत राहते. कधी उदासीनपणामुळे, …

घड्यावर पाणी!! Read More »

सहनशक्तीच्या पलीकडे

  मागील आठवड्यात कर्जत येथील एका डॉक्टर कुटुंबानं केलेली आत्महत्या हृदय पिळवटून टाकणारी आहे. सगळं सहनशक्तीच्या पलीकडं आहे. मुलाला कमी ऐकू येतेय म्हणून समाज कुटुंबाला अपमानास्पद वागणूक देते हे वाचून वाईट तर वाटतेय. परंतु त्याही पेक्षा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सहनशक्तीचा. ‘हे सर्व माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलं आहे हो! आणखी नाही मी सहन …

सहनशक्तीच्या पलीकडे Read More »

आठवणी आणि जगणं

आपल्या जुन्या आठवणी नेहमी आपल्या मानसिकतेवर परिणाम करत असतात. ज्या वेळी एखादा मोठा बदल आयुष्यात घडत असतो, त्या वेळी आठवणींचे पाश, इतक्या दिवसांच्या अंगवळणी पडलेल्या सवयी पाय मागे ओढतात. या बदलाचा ताण मनावर, शरीरावर येतो व त्रास होतो. अशा वेळी हा बदल लगेच अंगवळणी पडावा, नवीन परिस्थितीला सहजतेनं सामोरं जाता यावं, म्हणून काही व्यक्ती समुपदेशन …

आठवणी आणि जगणं Read More »

एकलकोंडा स्वभाव

अत्यंत सौम्य, शांत स्वभाव, मी बरा नि माझं काम बरं ही वृत्ती. या व्यक्ती बुद्धिमान असतात. कर्तृत्ववान असतात. ज्ञानी, विचारवंत असतात. अन् यामुळेच असेल कदाचित, त्यांना थोडासा गर्व-थोडा अभिमानही असतो. तो असणं स्वाभाविकही असतं. त्यांच्या एकांतप्रिय स्वभावामुळं काही लोकांना ते गर्विष्ठ, तुसडे, माणूसघाणे वाटण्याचाही संभव असतो; अशा व्यक्तीचे नातेवाईक त्याच्या विषयी काय करावं म्हणजे तो …

एकलकोंडा स्वभाव Read More »

विरक्ती आणि जीवन

  काही व्यक्ती न बोलता त्यांना आलेली विरक्ती इतरांना नकळत दाखवत असतात. ही विरक्ती सर्वच बाबतीत असते आणि त्यांच्या चालण्या, बोलण्यातून दिसते. जीवनातील छोटीछोटी सुखंही माणसाला आनंदी ठेवण्यासाठी पुरेशी असतात. ती जीवनाला चव आणतात; पण या सर्व गोष्टींमुळे आनंद मिळण्यासाठी मन संवेदनक्षम हवं. नाही का? परंतु काही आठवड्यांपूर्वी आलेली समुपदेशनाची केस अजून सुध्दा चालू आहे. …

विरक्ती आणि जीवन Read More »

मनाचे आरोग्य

मनाचे आरोग्य माणसाचे शरीर आजारी होण्याआधी त्याचे मन प्रथम रोगाला बळी पडते. सध्याच्या स्पर्धेच्या जमान्यात अनेक जणांना चिंता, काळजीने ग्रासलेले दिसते. यामुळे मानसिक व्यथा-रोग तर निर्माण होतातच; पण मानसिक स्थितीचा शारीरावर परिणाम होऊन ‘सायकोसोमॅटिक डिसीजीस्’ उद्भवतात. प्रत्येक माणसाचा वेगळा असा एक स्वभाव असतो. काही अंशी चांगला आणि काही अंशी वाईट. काही गुण, काही अवगुण असलेला; …

मनाचे आरोग्य Read More »

स्वभाव आणि व्यवस्थापन

लोकांना न दुखावता त्यांना कसे सुधारावे यावर काल विशेष चर्चा झाली. समोरून बोलणारी व्यक्ती एका कंपनीची मॅनेजर होती. रोजच्या कामात त्याला सर्वात मोठा अडसर होता त्याचा स्वभाव. अतिशय फटकळ आणि पटकन राग येणारा म्हणून थोडा प्रसिद्ध. मनमोकळे बोलताना त्याच्या मानसिकतेचे विश्लेषण करता आले. अर्थात त्यालाही त्याच्या स्वभावाची माहिती असल्याने समुपदेशन घेणे त्याने योग्य समजले. ठराविक …

स्वभाव आणि व्यवस्थापन Read More »

भावनिक ब्लॅकमेलिंग

आयुष्यात काही माणसं विचित्र स्वभावाची भेटतात. त्याचे काम करून घेण्यासाठी वाटेल ते करणार मग त्यामध्ये हुकमी एक्का असतो तो म्हणजे भावनिकतेला साद घालून आपला स्वार्थ साधायचा. याच बाबत एक केस मागील आठवड्यात आली होती आणि त्या व्यक्तीला या भावनिक ब्लॅकमेलिंग ला कसे तोंड द्यायचे तेच समजत नव्हते. भावनिक ब्लॅकमेलिंग वेगवेगळ्या मार्गाने केली जाते आणि असे …

भावनिक ब्लॅकमेलिंग Read More »

वृद्धावस्था – ताणतणाव व समस्या

अनेक वृध्द मंडळी आज आपापले नातवंडे आणि इतर मंडळीसह चांगल्यापैकी स्थिर आहेत. याउलट काही वृध्द मंडळी अनेक मानसिक त्रासातून जाताना आढळली आहेत. त्यांच्या बऱ्याच अडचणी असून त्यांना काय करावं हे लक्षात येतं नाही. आयुष्यभर कुटुंबासाठी झगडणाऱ्या या मंडळींना शेवटच्या पर्वात मात्र हालअपेष्टांना तोंड द्यावे लागते. त्यातून ज्या ताण तणाव आणि समस्या निर्माण होतात त्या काही …

वृद्धावस्था – ताणतणाव व समस्या Read More »