November 2021

वादविवाद – दुसरी बाजू

वादविवाद पुरुष का घालतात याबाबत मागील ब्लॉग मध्ये चर्चा केली. परंतु पुरुष मंडळी कडून विचारणा सुरू झाली की बायकांच्या वादविवादाचे काय? बायकासुद्धा मने दुखावणारे वादविवाद घडवून आणण्यात हातभार लावतात, पण त्यामागची कारणे वेगळी असतात. वरवर पाहता असे दिसते की, ती आथि॔क बाबींवरुन, जबाबदाऱ्यांवरुन किंवा इतर काही मुद्यांवरुन भांडते आहे, पण आतली गोष्ट अशी असते की, …

वादविवाद – दुसरी बाजू Read More »

मतभेद

  पती-पत्नी यांच्यातील प्रेमळ नातेसंबंधांसमोरील सर्वांत मोठे आव्हान म्हणजे त्यांच्यातील वेगळेपणा आणि मतभेद हाताळणे. अनेकदा जोडपी जेव्हा चर्चा करतात, तेव्हा थोड्याच वेळात त्याचे रुपांतर वादावादीत होते आणि मग त्या दोघांनाही काही समजायच्या आत युद्धासाठी शंख फुंकतात! त्यानंतरची पायरी म्हणजे जोडप्यात अबोला सुरु होतो. आपोआपच एकमेकांना दुखावणे, दूषणे देणे, तक्रारी करणे, आरोप करणे, हट्ट धरणे, रागावणे, …

मतभेद Read More »

क्षमाभाव

क्षमा करण्याचा सराव ही आध्यात्मिक विकासात सर्वोच्च स्वयंशिस्त आहे. क्षमाशीलतेच्या नियमाप्रमाणे तुम्हाला ज्या कोणी कोणत्याही प्रकारे दुखवलं असेल, त्यांना तुम्ही मोकळेपणाने क्षमा करू शकत असाल, तर त्या पातळीपर्यंत तुम्ही मानसिक आणि भावनिकदृष्ट्या निरोगी असता.” प्रत्येक व्यक्तीने – तुमच्यासह – इतरांकडून विनाशक टीका, नकारार्थी शेरे, दुष्टपणा, उद्धटपणा, विश्वासघात आणि अप्रमाणिकपणा ह्यांचा वर्षानुवर्षं अनुभव घेतला असेल. हे …

क्षमाभाव Read More »

तो आणि ती

मला नेहमी हा प्रश्न विचारला जातो की, ‘जर जोडीदारापैकी एकाला लग्न मोडण्याची जबरदस्त इच्छा असेल आणि त्याचवेळी दुसऱ्याला ते टिकवून ठेवण्याची आस असेल आणि ते दोघेही या गोष्टीचा गंभीरपणे विचार करत असतील, तर काय घडेल?’ अशा घटनांमध्ये मानसिक रस्सीखेच सुरू असते. असं घर स्वत: विरुद्धच दुभंगतं. हळूहळू ते तुटून विखुरतं. असं असलं तरी, त्यांच्या मानसिक …

तो आणि ती Read More »

जीवन आणि नियोजन

वेळेचं नियोजन किंवा टाइम मॅनेजमेंट हे एक अत्यंत महत्त्वाचं शास्त्र आहे. अनेक मोठ्या लोकांना हे तंत्र जमलेलं असतं. Time management is the life management – वेळेचं नियोजन म्हणजे जीवनाचं नियोजन, असं म्हटलं जातं. एखादं काम कमी वेळेत किंवा घाईनं उरकणं म्हणजे टाइम मॅनेजमेंट नव्हे. हा तर त्याचा एक छोटासा भाग म्हणावयाचा. आपलं आयुष्य म्हणजे क्षणांची …

जीवन आणि नियोजन Read More »

नातं स्त्री पुरुषाचं!

‘पुरुषाची बरोबरी करण्याच्या नादात पुरुषी दृष्टिकोन किंवा केवळ पुरुषी विचार स्त्री स्वीकारणार नाही, एवढी जबाबदारी समस्त स्त्रीजातीनं घ्यावयास हवी.’ असे किरण बेदी एकदा म्हणाल्या होत्या. मग स्त्रीची भूमिका कोणती असा प्रश्न नीती अनीती च्या गर्तेत स्त्री पुरुष हरवून जातात का ते पाहायला हवे. अनेक जोडपी विवाहबद्ध होऊन किंवा नात्यात राहून एकमेकांच्या भूमिकेला तडा देतात. नीती-अनीती …

नातं स्त्री पुरुषाचं! Read More »

कलहप्रिय व्यक्ती

जी माणसं स्वत:वर खूश असतात, ज्यांचा अहं तृप्त असतो, अशी माणसं इतरांना प्रेम, कौतुक, आदर व आधार देतात. ते ईर्षा, मत्सर अशा भावनांच्या आहारी जात नाहीत. स्वत: शांत राहून तणावजन्य परिस्थिती व कलहाचे शांतीने व्यवस्थापन करतात. याविरुद्ध काही व्यक्ती कलहप्रिय मानवी मनोवृत्तीचे प्रतिनिधीत्व करतात. पुष्कळदा दोन कलहप्रवृत्त पक्षांपैकी एक थोडा-फार सुजाण असतो. प्रसंगी माघारही घेतो; …

कलहप्रिय व्यक्ती Read More »

श्रद्धा आणि आपण

घटक आणि तणावनिर्मिती यांचा अभ्यास व या बाबतीतील प्रयोग असं सांगतात की, अत्यंत धार्मिक आणि श्रद्धावान लोक हे अत्यंत तीव्र ताणसुद्धा सहजगत्या सहन करतात. असं का? शास्त्रीयदृष्ट्या, श्रद्धेमुळं आपला आनंद, उत्साह वाढविणाऱ्या एन्डॉर्फिन्सचं रक्तातील प्रमाण वाढतं. शरीरातील अंत:स्रावी ग्रंथींच्या स्रावावरही याचा चांगला परिणाम होतो. शरीरातील अनैच्छिक क्रियांचे नियंत्रण करणाऱ्या चेतासंस्थेचं कार्य सुधारतं. फारसा गंभीर आजार …

श्रद्धा आणि आपण Read More »

तणाव व तंत्र

माणसं कळत- नकळत, सुचेल आणि जमेल त्या तंत्राचा अवलंब तणावमुक्तीसाठी करीत असतात. कारण तणावग्रस्तता अत्यंत त्रासदायक आणि क्लेशकारक अशी अवस्था असते. काहीजण मूलभूत असे राजमार्ग प्रयत्नांनी शोधतात, तर काहीजण सोपे तात्कालिक मार्ग, कधी चोरवाटा, कधी पळवाटा धुंडाळतात. ते करीत असलेली मात कधी वास्तव, तर कधी भ्रामक असते. वेळोवेळीच्या या परीक्षेत काहीजण नापास होतात, तर काहीजण …

तणाव व तंत्र Read More »