मराठी लेख

मानसिक आरोग्य आणि उन्हाळा

आता जवळपास उन्हाळा संपत आलाय, परंतु मागील काही महिन्यांचे ऊन आणि उष्ण वाऱ्यांचे आपल्या मानसिकतेवर काय परिणाम होतात याची पर्वा कुणी करताना दिसत नाहीत. उन्हाळ्यात कडक उन्हाची चर्चा होते तेव्हा त्याचा संबंध उष्माघात, अशक्तपणा आणि पाण्याची कमी यांसारख्या शारीरिक समस्यांशी जोडला जातो. उष्माघात टाळण्यासाठी, आपण शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि उष्णतेच्या लाटेपासून वाचवण्यासाठी अनेक मार्ग वापरतो. …

मानसिक आरोग्य आणि उन्हाळा Read More »

जप आणि भूमिका

जप का आणि कसा करावा, त्याचा फायदा वा तोटा यासंबंधी एक सुंदर ऑनलाईन कार्यशाळा नुकतीच पार पडली. आपले मन आणि त्याचा गुंता सोडवायला अनेकदा समुपदेशक उपलब्ध असतात परंतु आध्यात्मिक मनाशिवाय मनाला शांत करणं काहींना कठीण जाते. काही प्राचीन तत्त्वज्ञान व त्यातील पद्धती वापरल्यास मनुष्याचा सर्वांगिण विकास करण्यास मदत होते. त्यातले अगदी छोटेछोटे उपायही सबळ असतात …

जप आणि भूमिका Read More »

मन आणि मानसिक आरोग्य

बऱ्याच मानसिक आजारांवर योग, ध्यान प्रभावी उपचार आहेत हे सांगण्यात येते. अनेक पेशंटची धारणा असते की हे उपचार केले की मनावर कंट्रोल राखणं शक्य होईल. परंतु ते सहज शक्य नसते. योग आणि ध्यान या दोन गोष्टी निद्रानाश, मनाची चंचलता आणि उतावीळपणा या सर्वांवर प्रभावी उपाय आहेत. योगाभ्यासामध्ये असं सांगितलं गेलं आहे की आपल्या निद्रेचे मुख्य …

मन आणि मानसिक आरोग्य Read More »

प्रतिकूल परिस्थिती आणि वागणं

अनेक दिवसांपासून मुलांबरोबर काम करताना त्यांच्या मनातील उलघाल जाणवते. त्यांची आजच्या जगात जगायची हिम्मत तुटताना पाहताना मन विषण्ण होऊन जातं. मन स्वस्थ ठेवून, हिंमत न हरता संकटांवर मात करण्याची क्षमता (Adversity Quotient ) कशी विकसित करायची हे मुलांना शिकवण्याची हीच वेळ आहे. या काळात मानसिक स्वास्थ्य जपणं महत्त्वाचं आहे. मनाच्या स्वस्थतेचा आणि शरीर स्वस्थ असण्याचा …

प्रतिकूल परिस्थिती आणि वागणं Read More »

राग आणि भावनिक बुद्धिमत्ता

आपल्या आयुष्यात भावनांना केवढं महत्त्व असतं. आयुष्य घडवण्याचं आणि बिघडवण्याचं काम अनेक वेळा या भावनांमार्फतच होत असतं. बिघडवण्यात रागाला पहिला नंबर द्यावा लागेल. लहानसहान गोष्टींवरून रागावणारी अन् त्यामुळे परस्परांशी महिने किंवा वर्षानुवर्षं अबोला धरणारी माणसं किंवा कुटुंबं बघितली की वाटतं, हे रुसवेफुगवे खरंच योग्य कारणांसाठी असतात का? छोटी मोठी कारणं हे दोन कुटुंबांत दुरावा निर्माण …

राग आणि भावनिक बुद्धिमत्ता Read More »

अविवेकी विचार

अविवेकी विचार काही लोकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. अशा व्यक्तींसाठी समुपदेशन करताना खुप वेळा मनात येते की खरंच यांना जीवनाचा आनंद कधी भेटलाच की नाही. सर्वसामान्य व्यक्तींच्या मनात साधारणत: कोणकोणते अविवेकी विचार येऊ शकतात याची एक यादीच अल्बर्ट एलिसने सांगितली आहे. त्यातील काही खाली नमूद करत आहे. प्रत्येक अविवेकी विचारानंतर त्याच्याशी संबंधित आपले विचार …

अविवेकी विचार Read More »

भावनिक बुद्धिमत्ता कौशल्ये

भावनिक बुद्धिमत्ता कौशल्ये (skills) ही अशी क्षमता आहेत जी आपल्याला स्वतःच्या भावना समजून घेण्यास आणि व्यवस्थापित करण्यास मदत करतात. ही कौशल्ये शैक्षणिक क्षेत्रात, निर्णय घेण्याची क्षमता आणि जीवनातील एकूण यश यासह अनेक फायद्यांशी सलग्न आहेत. या लेखात आपण या भावनिक बुद्धिमत्तेची कौशल्ये सुधारण्यासाठी काय करू शकता यावर चर्चा करणार आहोत. या कौशल्यांवर काम करून आणि …

भावनिक बुद्धिमत्ता कौशल्ये Read More »

कौटुंबिक वातावरण आणि EQ

कौटुंबिक वातावरण मुलांना अनेकदा गुंतागुंतीचे जाणवते असं काही संशोधक म्हणतात. भावनिक क्षमता वाढवण्यास कुटुंब व्यवस्था मजबूत हवी त्यातून नवीन पिढीला सकारात्मक संकेत आपण देत असतो. कमी भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे, भावना अचूकपणे जाणण्यात असमर्थता (स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये) आणि ती माहिती तुमच्या विचार आणि कृतींना मार्गदर्शन करण्यासाठी वापरणे होय. अनेकांना याची जाणीव सुध्दा नसते आणि त्यातून नैराश्य …

कौटुंबिक वातावरण आणि EQ Read More »

भावनिक आधार

अनेकांच्या डोक्यात पायाभूत गोष्टींची पायाभरणी नसते. पालक आपल्या पाल्यांना सगळं टॉप क्लास देतात परंतु भावनांक वाढवायची तसदी घेत नाहीत. नुसती अभ्यासातली बुद्धी किंवा शैक्षणिक पात्रता व्यवहारी जीवनात यशस्वी होण्यासाठी पुरेशी नसते हे त्यांना ठावूक नसतं. तिथे यशस्वी होण्यासाठीचे आणखी काही निराळे निकष असतात. भावनिकदृष्ट्या व्यक्ती कार्यक्षम व परिपक्व असणं तसंच स्वत:च्या व दुसऱ्यांच्या भावनांची योग्य …

भावनिक आधार Read More »

हुशारी आणि भावनिकता

हुशार असूनही आयुष्यात मी मागे का हा प्रश्न विचारणारे अनेक जण भेटतात. त्यांना आयुष्यात असलेले प्रश्न व्यवस्थित हाताळता येत नाहीत हा एक दुसरा प्रॉब्लेम. अशा अनेकविध मित्रांना एकच सांगू इच्छितो की आपली भावनिकता वाढवा. असं सांगण्यामागे काही कारणं आहेत. IQ (Intelligence Quotient) हा शब्द आपल्या ओळखीचा आहे. IQ चांगला म्हणजे आपण हुशार. हुशारीमुळे चांगलं शिक्षण …

हुशारी आणि भावनिकता Read More »