मी का कमी?

आयुष्यात कधी ना कधी “मी कशातही चांगला नाही” असा विचार येणे सामान्य आहे. हा विचार अनेकदा, काही करायची इच्छा असो वा नसो, मनात येऊ शकतो. इतरांप्रमाणे आपण आपले जीवन नीट व्यतीत करत नाहीत हा शोध आपणच लावत असतो. सहसा, “मी कशातही चांगला नाही” असा विचार करणे हे सांगते की तुमचा कमी आत्मविश्वास किंवा स्वत:बाबत शंका तुम्ही अनुभवत आहात.

काही लोक हे विचार झटकून टाकून पुढे जातात. अशा प्रकारच्या विचारसरणीत अडकणे सामान्य आहे. परंतु जर अशी विचारसरणी वाढली तर आयुष्यात पुढे जाणे कठीण होऊ शकते. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या गोष्टीत चांगला असतो. पण आपल्याला ती गोष्ट काय आहे हे समजण्यापासून रोखणारी गोष्ट म्हणजे नकारात्मक आत्म-चर्चा आणि कमी आत्म-सन्मान.

मी का अशी किंवा असा हा प्रश्न अनेक तरुण तरणींना पडतो. का होतं असं हे शोधणं गरजेचे असते. हाच विचार कायम राहिला तर जरूर परिणाम होतो.

“मी कशातही चांगले नाही” असे का वाटू शकते, या भावना कशामुळे उद्भवू शकतात ते पाहू या.

१. तुलनात्मक दृष्टीने पाहणं.

२. भूतकाळातील चुकांसाठी स्वतःला दोषी मानणं.

३. नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करण्यास असमर्थता.

४. काही विचार जसे की,

a. “माझ्याकडे कोणतीही प्रतिभा नाही.”

b. “मी स्वारस्यपूर्ण नाही आणि कोणालाही माझ्यामध्ये स्वारस्य नाही.”

c. “माझ्या कोणत्याही गोष्टीत चांगले होण्याचा प्रयत्न करण्यात काही अर्थ नाही.”

d. “माझ्याशिवाय इतर सर्वजण आनंदी आणि यशस्वी आहेत.”

e. “मी शाळेत किंवा कामात कधीही चांगला राहणार नाही.”

f. “माझ्यासाठी काहीतरी प्रयत्न करण्याचे कोणतेही कारण नाही कारण मी त्यात चांगले होणार नाही.”

g. “मी अपयशी आहे.”

५. जाणूनबुजून तुम्हाला कुणीतरी खाली ओढत आहे अशी जाणीव होणं.

६. अनुभवातून सिध्दता.

७. मानसिक इच्छाशक्तीचा अभाव.

८. नकारात्मक भावना व विचार. कायम नकारात्मक बोलत राहणं.

९. चुकीचे नातेसंबंध.

१०. तणाव, नैराश्य.

हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की या प्रकारचे विचार, हे फक्त विचार आहेत. ते तुमच्या जीवनातील वास्तव व्यक्त करतातच असे नाही. ते नकारात्मक आत्म-चर्चेची उदाहरणे आहेत, आणि बऱ्याचदा अशाप्रकारचे नकारात्मक विचारांचे चक्र कायम ठेवतात. यातून बाहेर यायचे असेल तर काही गोष्टी कराव्या लागतील.

१. सोशल मीडिया ब्रेक घेणं.

२. प्रशंसा स्वीकारण्यास शिकणं.

३. आपले हितशत्रू कोण व त्यांच्या कुठल्या बोलण्याला बळी पडायचे ते ठरविणे.

४. आत्मविश्वास वाढविणाऱ्या मित्रमंडळी सोबत राहणं.

५. व्यक्तिमत्व विकास करून आत्म सन्मान वाढविणे.

६. आहार, विहार, विचार यांचं प्रमाण शिस्तबद्ध पद्धतीने पालन करणे.

७. प्रयत्नांती परमेश्वर हा विचार मनात ठेवणे.

८. आपण काय वाचतो, कुणाशी बोलत असतो याची नोंद घेणे.

९. असे विचार हे कायम स्वरूपाचे नसतात हे मनावर बिंबवणे महत्वाचे.

१०. समुपदेशन, वेगवेगळ्या मानसशास्त्रीय चाचण्या आपल्याला मदत करतात.

११. नित्य व्यायाम, योगा, मेडीटेशन इत्यादी गोष्टी आपला आत्मविश्वास वाढविण्यासाठी मदत करतात.

“मी कशातही चांगला नाही” हे एक अतिशय शक्तिशाली वाक्य आहे आणि जर आपण ते वारंवार उच्चारले तर आपण त्यावर विश्वास ठेवू लागतो. म्हणून यासारखे विचार आपण किती करायचे याला कुठेतरी आळा घालणं गरजेचं. बरेच जण आय कॅन डू इट या स्वभावाचे असतात, त्यांना पाहा, त्यांच्या सोबत वेळ घालवा म्हणजे आपल्यात आत्मविश्वास परत निर्माण होऊ शकतो.

तुमच्यातील ताकद ओळखून हळूहळू प्रयत्न केल्यास तुम्ही स्वतःला प्रोत्साहन देऊ शकता. तुमची प्रतिभा आणि सामर्थ्य ओळखण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, परंतु ते आहेत. श्रद्धा, सबुरी आणि आपल्या स्वत: च्या मूल्याबद्दल अधिक सकारात्मक विचार करण्यासाठी आपली मानसिकता बदलणे हे स्वतःसाठी गरजेचे आहे. तुमचा विजय नक्कीच होईल याबाबत खात्री बाळगा. आपल्या कृतीतून दाखवून दिलं की समाज तुमच्यावर विश्वास ठेवतो.

 

 

 

1 thought on “मी का कमी?”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *