आनंदी मानसिकता

निराशेमुळे मला झोपेचा मोठा प्रोब्लेम आहे असा एक मित्र समुदेशनदरम्यान बोलत होता. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा प्रश्न आहे. 

निराशा आणि झोपेचा खूप जवळचा संबंध आहे. जेंव्हा हे दोघे एकत्र असतील तेंव्हा मात्र विचार करावा लागतो.

तुम्हाला झोप येत नसेल तेव्हा त्या वेळेचा सदुपयोग आपण कोणाला कशा प्रकारे आनंदी करू शकतो, याचा विचार करण्यासाठी केल्यास फायदा होतो. तुमच्या निरोगी होण्याच्या दिशेने टाकलेले हे एक मोठे पाऊल असेल.

जर आपल्याला चिंता दूर करायची असेल आणि सुख समाधानाने भरलेले जीवन जगायचे असेल तर काही पद्धती आहेत.

१. आपण आपले डोके शांतता, साहस, आरोग्य आणि आशेच्या विचारांनी भरून टाकायला हवे. कारण ‘आपल्या विचारातूनच आपले जीवन घडत असते.’

२. जे आपल्याला आवडत नाहीत, त्यांच्याबदद्दल विचार करण्यासाठी आपण एक क्षणही वाया घालविता कामा नये.

३. कृतघ्नतेबद्दल चिंता करण्याऐवजी आपण तिची अपेक्षा करायला हवी. आपण कृतज्ञतेची अपेक्षा ठेवावी, हा काही सुख मिळविण्याचा एकमेव मार्ग नाही. तर आपण देण्याचा आनंद मिळवावा हा आहे.

४. आपल्याला मिळालेले यश मोजा, झालेला त्रास नाही.

५. इतरांची नक्कल न करता आपले अस्सल स्वरूप ओळखावे. त्याच रुपात रहावे कारण ‘मत्सर अज्ञान आहे. आणि ‘नक्कल करणे आत्महत्या आहे.’

६. नशिब आपल्या हातात लिंबू देते तेव्हा त्या लिंबाचे सरबत बनविण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत.

७. इतरांना थोडे सुख देण्याच्या प्रयत्नात आपण आपले दु:ख विसरावे.’ तुम्ही इतरांचे भले करीत असता तेव्हा त्याच्यापेक्षा जास्त स्वत:चे भले करता.

८. आपण कोणाला कशा प्रकारे आनंदी ठेवू शकतो, याचाच रोज विचार केल्यास आणि वास्तवात आणल्यास तर आपण तर मॅलेनकोलियाक हा रोग चौदा दिवसांत बरे करू शकता.(दुसर्‍याबद्दल दीर्घकाळ वाटणार्‍या राग आणि तिरस्कारासारखा मॅलेनकोलियाक हा रोग आहे.)

९.स्वतः चा आनंद कोणत्या गोष्टीत आहे हे शोधणे व ते करण्याचा प्रयत्न करणे.

इतरांमध्ये रस घेऊन स्वत:ला विसरून जावे. रोज किमान एक तरी चांगले कार्य असे करावे की त्यामुळे कोणाच्या तरी चेहर्‍यावर आनंदाचे हास्य उमटेल. जे काही आपण देतो त्याचा सुगंध काही काळासाठी त्या हातातही राहतो, मग ते गुलाब असो किंवा विटंबना. याचा अर्थ खूप मोठा आहे. मित्राला समजून सांगितले की आयुष्य निराशेने भरून टाकण्यापेक्षा त्याची कारणं शोधून कायमस्वरूपी उपाययोजना केल्या पाहिजेत तरच तुला स्वताला आणि इतरांना तो आनंदी ठेऊ शकणार.

यश आणि सुखासाठी आत्मत्याग आणि शिस्तीची आवश्यकता असते, या शोधाला वगळून आधुनिक मानसशास्त्रातील कोणताही शोध माझ्या दृष्टीने फारसा महत्त्वाचा नाही. इतरांबद्दल विचार करीत राहिल्यामुळे तुम्ही फक्त स्वत:बद्दल चिंता करण्यापासून बचाव करू शकता, एवढेच नाही तर त्यामुळे तुम्हाला खूप सारे मित्र मिळू शकतात आणि खूप सारा आनंद मिळविण्यातही मदत मिळते.

 

©श्रीकांत कुलांगे

मानसोपचार तज्ञ

2 thoughts on “आनंदी मानसिकता”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *