स्वयंशिस्त आणि आनंद

परवा एका व्यक्तीने आनंद म्हणजे नेमकं काय आणि तो परमार्थाशिवाय कसा मिळवावा. असा प्रश्न विचारला. अर्थात मी फिलॉसॉफर नाही पण त्याला मानसशास्त्राच्या भूमिकेतून विश्लेषण केले.

आनंद, आरोग्य, यशप्राप्ती आणि वैयक्तिक नेतृत्व ह्या गोष्टींसाठी वैयक्तिक जबाबदारी स्वीकारण्याची, स्वत:ला शिस्त लावण्याची तयारी आणि क्षमता अत्यावश्यक आहे. सगळ्या शिस्तीत जबाबदारी स्वीकारणं ही सर्वात कठीण आहे, पण ती नसेल तर कोणतंही यश शक्य नाही. म्हणून मी हे करू शकत नाही ते करू शकत नाही असे न्यूनगंड तयार होण्याची शक्यता असते.
आपण आनंदी का होत नाही व त्याला बाह्य नियंत्रण कसे कारणीभूत आहेत याचे काहीं तथ्ये भरपूर संशोधकांनी आपल्या समोर मांडलेले आहेत:

१. जेव्हा बाहेरच्या परिस्थितीचं तुमच्यावर नियंत्रण आहे असं तुम्हाला जाणवतं, तेव्हा ताणतणाव आणि दुःख निर्माण होतं.
२. ज्या प्रमाणात तुम्हाला असं वाटतं की तुमच्या आयुष्यावर तुमचा ताबा नाही, किंवा तुमच्या आयुष्याचं सारथ्य करण्याची फार थोडी क्षमता तुमच्याकडे आहे, त्यावेळेला तुमच्यावर बाह्य नियंत्रण आहे.
३. मानसिक विकलांगता कित्येकदा आपले विचार नियंत्रित करतात. परिणाम आपल्या व इतरांच्या आनंदी जीवनावर होतो.
४. तुमच्या शारीरिक परिस्थितीने किंवा शिक्षणाच्या अभावामुळे तुम्ही नियंत्रित होत आहात असं वाटतं.
५. भूतकाळातील चुका, घटना व प्रतिसाद आपल्यावर नियंत्रण गाजवतात.
६. त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वामुळे ते नियंत्रित होत आहेत, आणि चांगल्यासाठी बदल करायला ते असमर्थ आहेत, असं बऱ्याच लोकांना वाटतं. थोडक्यात मी तसाच आहे…
७. ज्या प्रकारचं आयुष्य त्यांना जगायचंय आणि आनंदी व्हायचंय, त्यासाठी जे आवश्यक बदल करण्याची त्यांना गरज आहे, त्यासाठी आवश्यक ती शिस्त आणि इच्छाशक्ती आचरणात आणण्याची जबाबदारी ते झटकून टाकतात.

 

बाह्य नियंत्रण ऐवजी अंतर्गत नियंत्रण आणण्याची गुरुकिल्ली आहे. तुम्ही आनंदी आहात किंवा दुःखी, हे पुष्कळदा तुमची आताची परिस्थिती, आणि तुम्हाला ज्यामुळे आनंद मिळू शकेल असं तुम्हाला वाटतं ती परिस्थिती, ह्यांच्यातील तफावत ठरवते. ही बाब तुमचा स्वतःचा निर्णय आणि मूल्यमापन ह्यांच्याशी संबंधित आहे. मग यावर काय करू शकतो?

१. तुम्ही आजच तुमच्या आयुष्याचा पूर्णपणे ताबा घेण्याचा निर्णय घेणं.
२. तुम्ही जसे आहात आणि जिथे आहात, हे तुमच्यामुळे आहात, तुमचे निर्णय तुम्ही स्वतः घेता, हे समजून घ्या आणि स्वीकारा.
३. तुमच्या आयुष्यात जर असा एखादा भाग असेल, ज्याच्यात तुम्ही खूष नसाल, तर ती परिस्थिती बदलण्यासाठी जे काही करावं लागतं ते करण्यासाठी स्वत:ला शिस्त लावा.
४. समाधानाची आणि आनंदाची अवस्था सतत बदलत राहू शकते.
५. आनंद हे एक बाय-प्रॉडक्ट आहे हे ध्यानात घेतलं पाहिजे.
६. आपली नाती – विशेषतः सर्वात महत्त्वाची – गृहीत धरणं ही आपली एक फार मोठी चूक आहे हे लक्षात ठेवणे.

स्वयंशिस्त आनंदासाठी अत्यावश्यक आहे. आनंदाचा अर्थ तुमच्यासाठी काय आहे, तसंच त्या आदर्श परिस्थितीच्या दिशेने वाढत्या पद्धतीने प्रत्येक दिवशी काय करणं, हे स्पष्टपणे निश्चित करण्यासाठी तुम्हाला स्वयंशिस्तीची गरज आहे. त्यासाठी पाच महत्वाची घटक आहेत.

१. आरोग्य आणि ऊर्जा. तुम्ही जेव्हा काही त्रास नसलेलं आरोग्य आणि उर्जेचा एक सातत्याने वाहणारा स्त्रोत ह्यांच्या उच्च प्रकारच्या पातळ्यांचा आनंद उपभोगता तेव्हाच तुम्हाला खरोखरच आनंदी वाटतं.
२. आनंदी संबंध : तुमचा पूर्ण ८५ टक्के आनंद किंवा दुःख तुमच्या इतर लोकांबरोबरच्या संबंधातून येईल.
३. अर्थपूर्ण काम : खरोखरच आनंदी व्हायचं असेल तर तुम्ही आयुष्याशी पूर्णपणे बांधील असलं पाहिजे.
४. आर्थिक स्वातंत्र. पैशाची चिंता नाही अशा सीमेला पोहोचलेले लोक सगळ्या लोकांत अधिक आनंदी असतात. तुम्ही नशिबावर सोडून देण्यासारखी ही गोष्ट नाही, तर त्यासाठी हेतुपुरस्सर, विचारपूर्वक कृती करावी लागते, आणि जे मिळवण्यासाठी फार मोठी स्वयंशिस्त लागते.
५. स्व-प्रकटीकरण : तुम्ही जे व्हायला समर्थ आहात, ते प्रत्येक बाबतीत तुम्ही होत आहात असं वाटणं, म्हणजे स्व-प्रकटीकरण. तुमच्या अंगातले सुप्त गुण तुम्ही जेव्हा अधिकाधिक ओळखून त्यांचा वापर करता, तेव्हा हे घडतं.

तुम्हाला जे लोक आवडतात आणि ज्यांचा तुम्ही आदर करता, त्यांच्या सहवासात काहीतरी करण्यात जेव्हा तुम्हाला आनंद वाटतो, तेव्हा पर्यायाने सुख वाटतं.
तुम्ही जेव्हा स्वयंशिस्त, स्व-प्रभुत्व आणि स्वनियंत्रण ह्यांचं आचरण करता, तेव्हाच तुम्ही खरोखरच आनंदी होऊ शकाल. जेव्हा तुम्हाला जाणवतं की तुम्ही तुमचं आयुष्य पूर्णपणे नियंत्रणाखाली आणलंय, तेव्हाच तुम्ही खरोखर समाधानी होऊ शकता.

krushikranti.com

4 thoughts on “स्वयंशिस्त आणि आनंद”

  1. दत्तात्रय अरुण सोनवणे GPS 96

    Mr. Kulange.. Your thoughts on behavioural psychology are very practical and thoughtful

  2. वा स्त व जीवना ची ओ लख करून देणारा लेख
    आनं दी जीवन जगता येईल

  3. Ashwini T. Jathar

    खूप छान मार्गदर्शन पार लेख, अंतर्मनाचा अभ्यास करण्याची दिशा देणारा …??

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *