मानसिक दुर्बलता

मानसिक दुर्बलता म्हणजे काय याबाबत बऱ्याच व्यक्तींनी अजून काही खुलासा व्हावा म्हणून विचारणा केली. Covid संक्रमण आपल्या सर्वांची मानसिक हानी आणि कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होण्यास कारणीभूत ठरत आहे. यादरम्यान आपण अधिक मानसिक सक्षम होणे अपेक्षित आहे. तरीही काही मानसिक दुर्बल व्यक्ती त्यांच्या कुटुंबाला आधार न देता परिस्थिती अजून बिकट करतात.

या व्यक्तींचे इथे काही तथ्ये पाहूया.

१. या व्यक्ती जीवनाचा निर्मळ आनंद लुटू शकत नाहीत.

२. भयभयीत जीवन जगतात.

३. इतरांसाठी आपण जगतोय असे भासविण्याचा प्रयत्न करून जीवन जगण्याची औपचारिकता पूर्ण करतात.

४. माझे तेच खरे म्हणणाऱ्या, प्रवाहात पोहत जाणाऱ्या, मानसशास्त्राचा अभाव असणारे.

५. स्वतःच्या कार्य क्षमतेपेक्षा दैवावर विश्वास ठेवतात.

६. या व्यक्ती स्वतःच्या व अनुक्रमे कुटुंब, समाज, राष्ट्र, निसर्ग व जगाच्या सर्वांगीण अधोगती जबाबदार असतात.

७. कर्तव्य पेक्षा भावनेला अधिक महत्व देतात. तर काही निष्ठुर व भावनाशून्य असतात.

८. नवनिर्मितीला विरोध करतात. इतर नागरिकांना चुकीचे सल्ले देत असतात.

मानसिक दुर्बल व्यक्ती; अहम, भीती, द्वेष, मत्सर, चिंता, वैफल्य, निष्क्रियता या आपल्या विकासाला मारक ठरणाऱ्या शत्रूंना शरण गेलेल्या असतात. त्यामुळे या व्यक्ती प्रेम, पैसा, पद, प्रतिष्ठा, कुटुंब या जीवनाचा भाग असलेल्या घटकांना अति महत्त्व देऊन स्वतःला हरवून बसतात. अशा मानसिक दुर्बल व्यक्तींचे सुद्धा काही प्रकार आहेत.

१. सामान्य व्यक्ती. हे स्वतः आपल्या जीवनात समस्या निर्माण करतात व त्या मध्ये गुंतून पडतात. त्या सोडविण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांना आज आयुष्याची सार्थकता मानतात.

२. गुन्हेगार व्यक्ती. अचूक मार्गदर्शनाचा अभाव, गुन्हेगारी क्षेत्रातील व्यक्तीचा सहवास, वचपा काढण्याची मानसिकता, अमली पदार्थांचे व्यसन, वाईट खेळांच्या सवयी, झटपट पैसा मिळवण्याचा प्रयत्न, वासनांनी मिळवलेला ताबा, यामुळे भावनांच्या आहारी जाऊन व्यक्ती गुन्हा करतो.

३. कुप्रसिद्ध व्यक्ति. स्वतःमधील नेतृत्वगुणाचा मानवतेला काळिमा फासणारी कृत्ये करण्यासाठी दुरुपयोग करतात. दहशत निर्माण करणं, भांडण करणार, स्वतःवर व धर्मावरील अन्याय दूर करण्यासाठी आपण हे पवित्र कार्य करीत आहोत अशी त्यांची मूळ विचारधारा असते.

४. उच्चपदस्थ चंगळवादी व्यक्ती. जगातील या प्रकारच्या व्यक्ती म्हणजे अज्ञानी लोकांचे “महाअज्ञानी” नेते होय. देशाच्या सर्वांगीण विकासातील प्रमुख अडथळा असलेले सर्वात घातक विषाणू हे लोक असतात. सर्वसामान्य जनतेला शिक्षणापासून वंचित ठेवून त्यांचा हक्क व कर्तव्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. या व्यक्तींना संपूर्ण जग कपटी व लबाड म्हणून ओळखत असतं.

आपल्याजवळील धनसंपत्ती, सत्ता, पदाच्या बळावर आपण सर्वकाही मिळवु शकतो अशा गर्विष्टपणाने जीवन जगणाऱ्या मानसिक दुर्बल नागरिकांचे काही वैशिष्ट्य सुद्धा आहेत.

१. अज्ञान. या व्यक्ती स्वतःचे अज्ञान मान्य करत नाहीत. मानसशास्त्रीय दृष्टिकोन योग्य नसल्याने कुटुंबातील सदस्यांना अचूक मार्गदर्शन करत नाहीत.

२. नकारात्मक दृष्टिकोन. न्यूनगंड, पूर्वग्रहदूषित विचार, चिंता, संकोच, क्रोध अशा नकारात्मक विचारांनी पछाडलेले असतात.

३. चांगल्या गोष्टींचा दुरुपयोग. उपलब्ध साधने, नैसर्गिक वा कृत्रिम सामग्रीचा गैरवापर यावर त्यांचा भर जास्त असतो.

४. अंधविश्वास. स्पष्ट बोलणारा नागरिकांचा असावा त्यांना नकोसा असतो. दैवावर विश्वास ठेवणारे, अंधविश्वास ठेवणारे असल्यामुळे अडचणी निर्माण करतात.

५. मानवनिर्मित समस्यांना कारणीभूत.

वृक्षतोड, हवा व जल प्रदूषण, दहशतवाद, मतभेद, कौटुंबिक व मानसिक अशा अनेक समस्या “मानसिक दुर्बल” नागरिकांनीच निर्माण केल्या आहेत. त्यांचे दुष्परिणाम आपल्या भावी पिढ्यांना भोगावे लागतील. वातावरणातील बदलांचे मनुष्याच्या शरीरावर परिणाम होत असतात. अशा असंख्य काळजी न करणाऱ्या लोकांमुळे आज मोठ्या प्रमाणात covid पासून होणारी प्राणहानी किंवा कार्बन उत्सर्जनामुळे हवामान बदल होत आहेत. इतर अनेक मानवनिर्मित समस्येत वाढ झाल्यामुळे पैसा, संपत्ती असूनही आनंदी जीवन जगण्याची पात्रता नसल्यामुळे मानसिक दुर्बल व्यक्ती स्वतः बरोबर कुटुंबीयासमवेत भयभीत जीवन जगत असतात. यांना कुठेतरी थांबवायला हवे म्हणून हा आजचा ब्लॉग. वरील माहितीवर चर्चा नक्कीच व्हायला हवी. त्यातच आपले व समाजाचे हित आहे.

©श्रीकांत कुलांगे

मानसोपचार तज्ञ.

9890420209

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *