Blog by Shrikant

आयुष्याचे मूल्यमापन

  जगण्यात खरंच जाम मजा आहे रे असे जेंव्हा मित्र बोलला तेंव्हा मी उडालोच. बऱ्याच दिवसांनी एवढा सकारात्मक मित्र भेटल्यामुळे साहजिकच मी विचारले, काय रे काय कारण. त्याला कुणीतरी सांगितले कि बच्चा, आयष्याचं विश्लेषण करून बघ. तेंव्हा कुठं माझ्या डोक्यात प्रकाश पडला कि हा असा का बोलतोय. हसून त्याला मी विचारले कि सांग कसं केलं […]

आयुष्याचे मूल्यमापन Read More »

आर्थिक तणाव व मनाशी तडजोड

  दिल्लीहून मित्राचा अत्यंत हताश आवाजामध्ये आजच्या परिस्थितीबाबत वाईट अवस्थेतून जात असलेला फोन होता. आर्थिक परिस्थिती अतिशय चिंताजनक होत चालली आहे कारण शासनाकडून येणारे पैसे थकबाकीत, कामगारांना द्यायचे पगार बाकी, बँकेचे हप्ते आणि आहे तो आर्थिक व्यापाराचा डोलारा कसा सांभाळायचा याबाबत एक अत्यंत खंबीर माणूस बराचसा दिशाहीन दिसला. प्रॉपर्टी असून विकत घेणारा अशा वेळेस कुणी

आर्थिक तणाव व मनाशी तडजोड Read More »

मनाची घुसमट

  मानलेल्या बहिणीने एक प्रश्न विचारला दादा मला कित्येकदा गृहीत धरलं जातं. मी नाही पण म्हणू शकत नाही. नुसती घुसमट होते, राग येतो. थोडावेळ चर्चा करून मनाची समजूत घातली, काय करायचे ते सांगितले. हेच चित्र प्रत्येकाच्या घरात थोड्याफार फरकाने दिसून येते. कारणे वेगवेगळी असतात पण गुंता कसा सोडवू हा प्रश्न असतो. जीवन प्रवासात आपण कोणावर

मनाची घुसमट Read More »

मानसिक लवचिकता

  आपण म्हणतो की मानसिकता बदलल्याशिवाय प्रगती नाही मग ते कुठलेही क्षेत्र घ्या. रोज मला काहीजण म्हणतात की तुमच्यासारखे लेख रोज वाचतो पण माझी मानसिकता बदलत नाही, मी कुठे कमी पडतोय समजतं नाही. आपण एखादी गोष्ट कशा प्रकारे हाताळतो त्याला मानसिकता म्हणूया. त्यामध्ये पण दोन प्रकार आहेत – कायमस्वरूपी आणि बदलणारी. कायम स्वरूपाच्या मानसिकतेमध्ये, लोकांचे

मानसिक लवचिकता Read More »

स्वयं शिक्षणाची पायाभरणी

  लवकरच शाळा / कॉलेजेस सुरू होतील आणि पालक आप आपल्या परिस्थिती नुसार चांगल्या संस्थेत, क्लास मध्ये मुलांचे एडमिशन करतील. चांगली शाळा / कॉलेज असेल तर मुलं चांगली घडतील असा समज आपला असतो. परंतु जेंव्हा आपण निरीक्षण करु तेंव्हा समजेल की मुलं चांगली असतील तर कुठे पण शिकतील. आणि इथून पुढे सुरू होईल की काय

स्वयं शिक्षणाची पायाभरणी Read More »

ऐकीव गोष्टी आणि परिणाम

  आजकल खूप सारी माहिती आपल्याला सोशिअल मीडिया वरून वाचायला आणि ऐकायला भेटते. याव्यतिरिक्त समाजात विखुरलेल्या बातम्या. विश्वास ठेवायचा कुणावर व कशासाठी हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. इतिहास साक्षी आहे केवळ अपूर्ण माहिती ऐकून, संशयावरून समाज, मित्र, कुटुंब विस्कळीत झाले आहेत. थोडक्यात कान आणि डोळे यामधील अंतर असूनही आपण हा देवाने दिलेला मेंदू न वापरता

ऐकीव गोष्टी आणि परिणाम Read More »

सवांदाचे महत्व

  समुपदेशन करताना सर्वात जास्त वेळा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ती किंवा तो ऐकत नाही. बर हा प्रश्न हजारो सालापासून चर्चीला गेलाय आणि अजूनही जगभर भ्रमंती करतोय. अस का होत असाव म्हणून अनेक मानसशास्त्रज्ञांनी याचा विचार केला. आपला जोडीदार आपले म्हणणे का ऐकत नाही याची संभाव्य कारणे आहेत. वैवाहिक जीवनात आपले म्हणणे न ऐकण्याची समस्या

सवांदाचे महत्व Read More »

सकारात्मकता शरीराची

  काल आयुष्यात काय उद्देश असावा याबाबत थोडी चर्चा केली होती, आणि पुन्हा अनेक प्रश्न अनेकांच्या फीडबॅक मधून. रेवतीचा मोठा प्रॉब्लेम होता, म्हणाली सर खूप प्रयत्न करतेय पण पहिल्यासारखी बारीक होतं नाहीये. तिचा उद्देश असून, प्रयत्न करून देखील बारीक नाही होऊ शकली म्हणून शल्य. तिच्यामध्ये शरीराविषयी थोडी नकारात्मकता तिला जाणवतेय हे मला लगेच समजलं. शरीर

सकारात्मकता शरीराची Read More »

उद्देशपूर्ण जगणं….

  ग्रुपमध्ये गप्पा मारता मारता सहज विषय निघाला की आपल्या जगण्याचा हेतू (purpose ) काय ? आता तरुण मंडळी असल्यामुळे मोक्षप्राप्ती वगैरे कोणी काय म्हणालं नाही पण उत्तर मात्र करिअर, चांगले कुटुंब, यशस्वी कारकीर्द इत्यादी. तथापि, असे काही लोक आहेत जे सर्व मिळून सुद्धा काहीतरी कमी आहे याची जाणीव होत राहते व हाच “काहीतरी कमी

उद्देशपूर्ण जगणं…. Read More »

यशाचा शोध

  एकदा कॉलेजमध्ये विद्यार्थ्याने ने प्रश्न विचारला होता कि आयुष्यात सक्सेसफुल होण्यासाठी प्रयत्न करूनसुद्धा हाताला काहीच का लागत नाही. वेल, प्रश्न चुकीचा नव्हता. आम्ही चर्चा केली, काय आणि कसे प्रयत्न केले, त्यातील पैलू, मार्ग, वेळ सगळ्यांचं विश्लेषण करून त्याचं कुठे गणित चुकलं त्याला ते समजावून सांगितले. शेवटी त्याला एकच विचारलं कि यश (success ) म्हणजे

यशाचा शोध Read More »