एकदा कॉलेजमध्ये विद्यार्थ्याने ने प्रश्न विचारला होता कि आयुष्यात सक्सेसफुल होण्यासाठी प्रयत्न करूनसुद्धा हाताला काहीच का लागत नाही. वेल, प्रश्न चुकीचा नव्हता. आम्ही चर्चा केली, काय आणि कसे प्रयत्न केले, त्यातील पैलू, मार्ग, वेळ सगळ्यांचं विश्लेषण करून त्याचं कुठे गणित चुकलं त्याला ते समजावून सांगितले. शेवटी त्याला एकच विचारलं कि यश (success ) म्हणजे काय रे. क्षणभर त्याला काही सुचेना, जे तुम्हा आम्हात घडत असते. समजतच नाही कि यश म्हणजे नेमकं काय. यश फक्त शिक्षण, व्यापार, नोकरी, पैसा, लग्न, आयटम वैगरे नाहीये, हे आयुष्यात कित्येकदा समजतं पण नाही. पण काही मात्र “आज” मध्ये यश बघतात. आज मी इतके पैसे कमावले, आज मी भांडलो नाही, कुणाला लागेल असा बोललो नाही, दुखावले नाही, कुणालातरी मदत केली यालाच काही जण यश म्हणतात. उद्या कुणी पहिला, आजकल करोना चा आगमन, दंगे, मारामारी सांगून होतं नाही. म्हणून आज बिनाझंजट जगणे म्हणजे तेच यश असा माझा साऊथ आफ्रिकन दोस्त नेहमी म्हणतो. एकूणच यश हि संकल्पना आणि तिची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते.
वास्तविक मानसशात्रीय दृष्ट्या हा विचार अत्यंत छान आहे कारण या दरम्यान घेतलेले उद्याचे निर्णय अगदी सटीक असतात. यश मिळवण्यासाठी जे तुम्ही करताय कदाचित दुसऱ्याला ते नाही जमणार, पण काही बेसिक गोष्टी पाळल्या तर त्या आपल्याला यश प्राप्त करून देण्यासाठी फायदेशीर ठरतात.
१. ग्रोथ माइंडसेट तयार करा. हे असे केले तर, तसे केले तर, पद्धती बदलणारे माइण्डसेट म्हणजेच ग्रोथ. ते साध्य करण्यासाठी – नवीन पद्धत शिकणे, चुकांतून शिकणे व स्वतःच्या प्रयत्नावर विश्वास ठेवणे.
२. आपली भावनिक बुद्धिमत्ता सुधारित करा; भावना महत्वाची – त्यांना सावरा, कंट्रोल मध्ये ठेवा, इतरांचं ऐका.
३. मानसिक शक्ती विकास; स्वतः वर विश्वास, प्रयत्नात सातत्य, हेतू पक्का करून त्यासाठी काय मदत कोण,कशी करू शकेल ते शोधणे.
४. इच्छाशक्ती प्रबळ करणे; दूरचा पल्ला गाठायचा म्हणजे थकून चालणार नाही. ध्यान केंद्रित ठेवणे – वजन कमी करायचं ना मग गोडापासून दूर बर. मेहनत जरुरी,
५. मनातून येणाऱ्या प्रेरणा जागृत ठेवणे; स्वतः ला प्रेरित करण्यासाठी गरजेच्या. त्यासाठी स्वतःला चॅलेंज करा, प्रत्येक गोष्टी बाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न, कुठल्याही परीक्षेची भीती नको किंवा कोण पुढे चालला त्याची पर्वा नको. स्टे मोटिव्हटेड.
६. स्वतःमध्ये काय चांगलं आहे याचा शोध आणि संगोपन: विवेकबुद्धी शाबूत ठेवणे, निश्चितता /अनिश्चितता स्वीकारणे, प्रसंगी तोंड देण्याची क्षमता, धर्याने उभे राहणे, कुतूहल / स्पर्धात्मकता टिकवने.
यशाचा कोणताही एक असा उपाय नाही आणि जीवनात यशस्वी कसे व्हावे याबद्दल निश्चितपणे कोणतेही उत्तर नाही. तरीही यशस्वी लोकांच्या काही सवयी पाहून आपण आपल्या स्वत: च्या दैनंदिन जीवनात अंमलबजावणीसाठी नवीन युक्ती आणि रणनीती शिकू शकता. या क्षमता विकसित करा आणि त्यांचे पालनपोषण करा आणि कालांतराने आपल्याला असे दिसून येईल की आपण आपल्या ध्येयांपर्यंत पोहोचण्यात आणि आयुष्यात इच्छित यश मिळविण्यास तुम्ही सक्षम झाला आहात. मुलं, पालक, शिक्षक यांचा समन्वय मर्यादित आणि एकमेकांत गुंतागुंतीचा नसेल तर योग्य मार्ग सापडतो, उगीच ढवळाढवळ करून जास्त नुकसान होते.
@श्रीकांत कुलांगे
९८९०४२०२०९