ऐकीव गोष्टी आणि परिणाम

 

आजकल खूप सारी माहिती आपल्याला सोशिअल मीडिया वरून वाचायला आणि ऐकायला भेटते. याव्यतिरिक्त समाजात विखुरलेल्या बातम्या. विश्वास ठेवायचा कुणावर व कशासाठी हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. इतिहास साक्षी आहे केवळ अपूर्ण माहिती ऐकून, संशयावरून समाज, मित्र, कुटुंब विस्कळीत झाले आहेत. थोडक्यात कान आणि डोळे यामधील अंतर असूनही आपण हा देवाने दिलेला मेंदू न वापरता फक्त ऐकीव माहितीवर आपली नातीगोती दूर करतो, एकमेकांना दुखावतो. एका मंथरेचे ऐकण्यामुळे कैकयीने रामायण घडवले! आपल्या आसपास अशा असंख्य मंथरा हिंडत आहेत ज्या आपल्याला आरोग्य, शिक्षण, शेती, व्यापार, फायनान्स, शासन, गॉसिप, गोपनीय माहिती सतत पुरवत असतात व त्याचे दूरगामी परिणाम आपल्या दिसून येतात. आजचे वातावरण आणि मेंदूचा ऱ्हास होण्यासाठी हे पुरेसं असते. याव्यतिरिक्त होणारे नुकसान जसे की,

१. समाजात दुही, अविश्वासाचे वातावरण. भांडणे, एकमेकांशी वादविवाद.
२. मानसिक शांती बिघडणे. नैराश्य, चिंता, अनावश्यक काळजी.
३. मानसिक व शारीरिक रोग जडणे.
४. परिवार व्यवस्था डगमगते. विस्कळीतपणा, विभागणी, कोर्ट कचेऱ्या.
५. अनावश्यक वेळ वाया गेला हे नंतर समजते.
६. आर्थिक हानी.
७. अपराधीपणाची भावना व आत्महत्येचा विचार.
८. तरुण पिढीला चुकीचा संदेश.
९. विद्यार्थ्यांचे नुकसान, अभ्यासात अडथळा. ध्येय साध्य न होणे.

त्यासाठी काय केले पाहिजे ते सर्वाना माहीत असूनसुद्धा आपण त्या चुका करत असतो.

१. ऐकीव बातमीवर विश्वासून उगीच आपल्या माणसावर राग काढणे चुकीचे. तोडगे काढले तर वाद मिटू शकतात.
२. एकाद्या वेळी अपूर्ण माहिती असेल तर तर्क न काढणे.
३. परिपक्वता मनातून हवी. उठसूट कुठलेपण मेसेज फॉरवर्ड करण्यापेक्षा गरज असेल तरच पुढे पाठवा.
४. कुणाची पण टिंगल टवाळी करायच्या आधी शांतपणे विचार करा की याचे साइड इफेक्ट काय होऊ शकतात.
५. कुणाचेही कुटुंब विस्कळीत करून आनंद मिळत नसतो.
६. मानसिक स्वास्थ्य नीट ठेवले की अशा गोष्टी होत नाहीत.
७. शक्यतो आपण भले व आपले काम भले.
८. मोठ्या थोरांना मदत, गरिबांना बरोबर घेऊन जाणारा सर्वानाच आवडतो.
९. छंद जोपासणे.
१०. विद्यार्थी मित्रांनी त्यांच्या स्वप्नपूर्ती करिता काही गोष्टी न केलेल्या बऱ्या. पालक शत्रू नसतात. मित्रांना ओळखा.

माझ्या मित्राबरोबर झालेल्या एक चर्चेतून मला काही गोष्टी कळल्या की आपली एक मस्ती काहींचे आयुष्य बरबाद करू शकते, आत्महत्या करायला मजबूर करू शकते. म्हणून वेळेवरच आपण काळजी घेतली तर आपले मानसिक आरोग्याबरोबर सामाजिक आरोग्य सुद्धा शाबूत राहायला मदत होईल. आपले कच्चे कान पक्के केल्याने सकारात्मकता वाढेल म्हणून त्यावर संस्कार रुपी मास्क वापरा.

@श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *