समुपदेशन करताना सर्वात जास्त वेळा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ती किंवा तो ऐकत नाही. बर हा प्रश्न हजारो सालापासून चर्चीला गेलाय आणि अजूनही जगभर भ्रमंती करतोय. अस का होत असाव म्हणून अनेक मानसशास्त्रज्ञांनी याचा विचार केला. आपला जोडीदार आपले म्हणणे का ऐकत नाही याची संभाव्य कारणे आहेत. वैवाहिक जीवनात आपले म्हणणे न ऐकण्याची समस्या ही आपल्या जोडीदाराच्या समस्या, आपली सांगायची पद्धत यांच्याशी संबंधित असू शकते.
आपण संभाषणाची / सांगायची पद्धत बघू :
१. आपल्याला काय म्हणायचे आहे ते सांगायला कदाचित आपण बराच वेळ घेत असाल- मुद्द्यावर या.
२. एकतर्फी बोलणे- आपल्या जोडीदारास बोलण्याची संधी द्या.
३. जोडीदारावर ओरडायचे असेल तर जोडीदार पण तशाच तयारीत असतो- त्या पेक्षा त्यावेळी या गोष्टी बोलू नका.
४. आपले म्हणणे स्पष्ट आणि न बदलणारे हवे.
५. बोलताना उपदेश, व्याख्यान किंवा प्रश्नोत्तरे करत असाल तर जोडीदार ऐकून न ऐकल्यासारखे करेल- प्राध्यापक किंवा वकील होऊन बोलू नका.
६. बोलण्यातून “नेहमी”, “कधीच नाही” आणि “सतत” असे शब्द आपल्या शब्दसंग्रहातून काढून टाका- ते शब्द बोथट होतात मग उपयोग होत नाही.
७. कदाचित जोडीदार महत्वाच्या कामात व्यस्त असल्याने तुमचे बोलणे ऐकू गेले नसेल- म्हणून अगोदर खात्री करा आणि वेळ पाहून बोला.
८. जुन्या समस्या किंवा विषय यापूर्वी बोलला असाल तर या गोष्टी पुन्हा संवादामध्ये आणू नका.
९. आपण तक्रार किंवा नकारात्मक बोलता तिथे संभाषण पुढे जात नाही-अधिक सकारात्मक व्हा.
१०. कदाचित आपण आपल्या जोडीदाराचे ऐकत नसू.
संभाषण न होण्या मागे कदाचित आपल्या जोडीदाराची स्वतःच्या वैयक्तिक समस्या असतील:
१. जो विषय बोलत आहात तो जोडीदाराला न आवडणे, लाज वाटणे. मतभिन्नता म्हणून शांत राहणे.
२. जोडीदाराची ऐकण्याची क्षमता संपणे.
३. जे सांगायचे आहे ते कदाचित जोडीदाराला माहिती असेल.
४. महत्वपूर्ण नसेल तर ऐकायची तयारी किंवा इच्छा नसणे.
५. आपला जोडीदार फक्त ऐकण्यासाठी अर्धा मेंदू वापरत असेल. “अमेरिकेतील संशोधकांना असे आढळले आहे की पुरुष फक्त त्यांच्या अर्ध्या मेंदूने ऐकतात, तर महिला दोन्ही बाजूंचा वापर करतात. डॉ. जोसेफ टी. ल्युरिटो सुचवले की स्त्रिया अधिक चांगले श्रोते नसतात परंतु स्त्रिया एकाच वेळी दोन संभाषणे ऐकू शकतात. आता भारतामध्ये काय परिस्थिती आहे ते आपल्यालाच माहीत!!!
६. आपल्या जोडीदारास आपल्याशी सहमत नसण्यास परवानगी द्या. प्रत्येकवेळी हो म्हणायची अपेक्षा करू नये.
७. काहीजण जास्त वेळ नाही ऐकू शकत. सरासरी प्रौढ व्यक्तीचे लक्ष कालावधी केवळ 7 सेकंद असते. अशा वेळी थांबा व बोला.
८. मोबाईलचा चा दुष्परिणाम.
९. शारीरिक व्याधी, मानसिक त्रास.
आता मला सांगा, प्रत्येकाला आपला जोडीदार चांगला माहित असतो. नसेल तर एकमेकांना जाणून घ्या. सवयी, आवड-निवड ध्यानात ठेवा. आदर ठेवा, तो बोलण्यातून, कृतीतून दाखवा, रुसवे फुगवे दूर करा.
शेवटी नाहीच जमलं तर आयुष्यातील काहीच काळ उरला आहे असे समजून आयुष्याकडे पहा.
@श्रीकांत कुलांगे
9890420209