काम हे घरात करा किंवा बाहेर, महत्वाचे हे की आपल्याला किती समाधान मिळते. घरी काम करणाऱ्या व्यक्ती या घरातील आणि बाहेरील पण असतात. गरज असते ती काम करण्याची जागा व वातावरण निर्मितीची. एकदा वातावरण निर्मिती झाली कि अर्धे काम कमी होते. हीच गोष्ट ऑफिसची पण असते. एकदा मला एक ड्राइवर भेटला, म्हणाला की ही कार म्हणजेच त्याचे ऑफिस आहे. आणि मला ते कार मध्ये बसल्या बसल्या जाणवले. थोडक्यात त्याची कल्पकता कि माझी कामाची जागा मला आवडली पाहिजे. याच गोष्टींबाबत मी समुपदेशन करताना चर्चा करतो कि घर जर तुमची कामाची जागा असेल तर तिला कल्पकतेने कसे वापरू शकता, ज्याने करून मन प्रसन्न राहावे व उदासीनता जवळ येणार नाही.
आपण कामाची जागा आणि व्यवस्था यामध्ये खूप सकारात्मक बदल करू शकतो. त्याकरताना मानसिक आनंदासाठी काही गोष्टींकडे जरूर ध्यान द्या:
१. आवडणारे संगीत- गाणी गुणगुणताना अत्यंत चांगल्या फीलिंग्स येतात. मग कधी काही ऑडिओ बुक, रेडिओ ऐकू शकतो.
२. वातावरण निर्मिती – आज काय मेनू करणार त्याची तयारी करणे म्हणजे बनवताना येणारी मजा काही और असते. माझ्या मित्राची बायको मेनू छोट्या फळ्यावर लिहिते. आठवड्याचा मेनू सर्वांच्या पसंतीनुसार ठरतो.
३. मानसिक आनंद – जेंव्हा आपण एखादी वेगळी गोष्ट करतो त्याचे कौतुक होते ,मनाला बरे वाटते.
४. व्यायाम – स्टेप मोजण्याचे घड्याळ येते, ते वापरले तर तुम्हाला समजेल तुम्ही किती चालला आहात. मग वजन संतुलित करायला सोपे.
५. राहणीमानाचा दर्जा उंचावतो-शांत, व्यवस्थित रचना, सुंदरता व सुसंवाद. शक्यतो अप्रिय घटना संवादातून सोडवा. कामाचे नियोजन.
६. घरातील रचना बदल -घरून काम करण्याची आजकल गरज आहे मग आहे तीच जागा ऑफिस सारखी सेट करता येते. ऑनलाईन असाल तर वेबकॅम सुरु करायच्या आधी आपल्या मागे काय आहे ते पहा.
७. उत्पन्न- घरी हाताने बनवलेल्या वस्तू ऑनलाईन विक्री करणे. थोडा पैसा संसाराला हातभार लावतो.
८. आवड – आवडीनुसार कविता, पुस्तक, ब्लॉग्स इत्यादी लिहायला हरकत नाही. पेंटिंग, हस्तकला या गोष्टी मानसिक संतुलन ठेवायला मदत करतात.
९. नोकरी-ऑनलाईन डेटा एन्ट्री चे बरेच जॉब्स असतात. आपली जर मातृभाषा मराठी असेल आणि इतर भाषेचे ज्ञान असेल तर घरबसल्या भाषांतर करायचे काम मिळते.
१०. सर्वात महत्वाचे – कुठलेही काम हे काम असते आणि ते आनंदाने स्वीकारले तरच त्याचा आपल्याला त्रास जाणवत नाही हेच आपले ध्येय हवे.
काम करण्याची जागा हि सगळ्याच ठिकाणी मनासारखी नसते. पण तिला मनासारखी ठेवण्याची आणि आहे त्या परिस्थितीत स्वीकारून बदलविण्याची तयारी मनाने करावी लागते. शासकीय ऑफिसेस हे असे एक उत्तम उदाहरण आहे. साधा टेबल आणि खुर्ची असते पण मन प्रसन्न ठेवण्याची क्रिया आपल्या डोक्यात चालते. बघा काही बदल मनात, डोक्यात, परिस्थितीत, वातावरणात सकारात्मक करता येतात का. येत असेल तर तुमचे आयुष्य सुसह्य व्हायला वेळ लागणार नाही अन्यथा रोज नशिबाच्या नावाने खडे फोडायला लागतील.
@श्रीकांत कुलांगे
9890420209
खूप चांगली माहिती. रोजची सवय लागली की नवीन काही करायची इच्छा होत नसते. त्यावर पण काही लिहा sir.
Great
ग्रेट!
सरजी क्या बात है!
दिवसेन दिवस आपली लेखनशैली अधिक प्रगल्भ बनत आहे!
आपले लेखन असंख्य लोकांना प्रेरक ठरत आहे !
लिहीत रहा!