मुलीची वागणूक अलीकडे बदलली आहे म्हणून तिच्या आईचा प्रयत्न कि ती पुन्हा प्रगती पथावर येईल पण ते काही होता दिसत नव्हते. हाच प्रॉब्लेम सगळीकडे दिसून येतोय. मुले वयात आली कि का बिघडतात म्हणून पालकांचे प्रश्न. एक काळ असा होता कि आई वडिलांनी अशा मुलांना चार रट्टे दिले कि सगळे लायनीत यायचे पण आता तो काळ राहिला नाही. मग पालकांनी काय करावे म्हणून बरेच उपाय योजले जातात, काही मुले ठीक होतात तर काही अजून बिघडतात.
पण एक गोष्ट नक्की कि मुलं कितीही बिघडली तरी पुन्हा घरी येतातच. पालकांनी अशा वेळी घाबरून ना जाता काय करायला हवे :
१. उगीच मुलांच्या मागे लागून त्यांच्याकडून अवास्तव अपेक्षा ठेऊ नये.
२. आपल्या घराला सुरक्षित आधार बनवा – मुलांना बोलूद्या, त्यांचे मित्र बना. त्यांना घरी सुरक्षित वाटले पाहिजे. तुम्ही आधार द्या.
३. नेहमीच त्यांना हे कर आणि ते कर सांगितले तर मुलं दूर जातात.
४. त्यांचं ऐका – लक्ष द्या. प्रसंगी हसा पण रागावू नका. त्यांची हिम्मत वाढेल.
५. नियमावली – सरळ, सहज, प्रसंगी बदलणारी, सर्वाना लागू असणारी. नियम का आहेत हे समजून सांगणे गरजेचे.
६. शिक्षा शारीरिक नको – जुने दिवस गेले. आताच्या मुलांमध्ये पटकन हिंसेची भावना तयार होते. समुपदेशन घ्या.
७. पालकांचे अनुकरण- आपण योग्य वागले तर मुलं आपल्याला पाहून अनुकरण करतात. आदर दिसू द्या.
८. थँक यु म्हणायला शिका व शिकवा.
परंतु मुलांचे नेमके काय होते या वयात म्हणून असे वागतात:
१. चुकीची मैत्री – अशा मुलांची एक गॅंग तयार होते आणि आपले वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न करतात. नवीन मित्र कंपनी जवळची वाटायला लागते म्हणून त्यांच्या मित्रांची ओळख करून घ्या.
२. हार्मोनल बदलामुळे वागणूक बदलते. डॉक्टर ला भेटलात तर सर्व समजेल.
३. खाण्या पिण्याच्या सवयी बदलतात, आहार जर व्यवस्थित नसेल तर व्हिटॅमिनची कमतरता निश्चित दुष्परिणाम करते.
४. मोबाइलला चिकटून राहणे सवय बनते – त्यामुळे त्यांच्या विरोधात बोलले तर चिडचिड,आक्रमकता हत्यार म्हणून वापरतात. आजकाल ऑनलाईन शिक्षणामुळे त्यात वाढ झालेली दिसते. त्यांच्या बरोबर वेळ दिला तर थोडा त्रास कमी जाणवेल.
५. कित्येकदा इमोशनल इशू असू शकतो, बोलून मनातल्या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न योग्य.
६. अभ्यासात पूर्वी चांगली असणारी मुलं काही काळानंतर पाहिजे तेव्हढी मेहनत न केल्याने मागे पडतात म्हणून ते मठ्ठ नाही होणार, थोडा वेळ जाऊ द्या, योग्य समुपदेशनाने ते ठीक होतात.
एवढं सगळं करून पण जर आपली मुलं आपल्याशी फटकून वागत असतील तर मात्र मानसोपचार तज्ञाबरोबर संपर्क करा. ते ठराविक मानसिक चाचण्या घेऊन योग्य ते निदान करून आणि थोड्या थेरपी वापरून गाडी रुळावर आणायला मदत करतील. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुलांच्या मनात आपण कुठेतरी आपल्या वागण्यामुळे उतरलो कि मुलांची पावले मित्र मैत्रिणीकडे वळतात. म्हणून स्वतःला आरशात बघा आणि ठरवा कि आपणच आपल्या पाल्यांचे चांगले मित्र बनायचे.
@श्रीकांत कुलांगे
9890420209
Wonderful message for community…keep it up.