काम व भावनिक बुद्धिमत्ता

 

या आठवड्यात आम्हाला समुद्रामध्ये येऊन चार महिने झाले आणि एक ठराविक त्रासाचा काळ गेल्यानंतर जवळपास सर्व स्टाफ हळूहळू शांत होत गेला. रागाची जागा आता सहानुभूती, आपुलकी ने घेतली आणि प्रत्येकजण एकमेकांना मदत करू लागला. जेंव्हा मी सर्वांची EQ (भावनिक बुद्धिमत्ता) चाचणी घेतली तेंव्हा ध्यानात आले की ती अतिशय उच्च होती. नंतरचा सकारात्मक बदल हा या मानसिकतेमुळे झाला. भावनिक बुद्धिमत्ता एक मौल्यवान कौशल्य म्हणून ओळखली जाते जी काम करताना संवाद, व्यवस्थापन, समस्या-निराकरण आणि एकमेकांमधील संबंध सुधारण्यात मदत करते. आनंद, राग, भीती व दुःख यासारख्या भावना आणि मनःस्थिती लोकांचे वागणे आणि त्यांच्या निर्णय प्रक्रियेवर परिणाम करते.

भावनिक बुद्धिमत्ता असणाऱ्या लोकांच्या काही सवयी असतात:

१. भावनिकदृष्ट्या हुशार लोक स्वतः आणि इतरांना काय वाटते याबाबत विचार करतात. होणाऱ्या टीकांना व्यवस्थित हाताळणे.
२. स्वतःच्या भावनांवर ते नियंत्रण ठेवतात. निर्णयशक्ती चांगली.
३. त्यांना काही करून आपले ध्येय गाठण्याचे उद्दिष्ट आणि प्रेरणा असते.
४. अशा लोकांकडे सामाजिक संबंध ठेवण्यात पारंगत असतात.
५. आपल्या प्रश्नांबाबत ते इतरांशी बोलणे व प्रश्नांच्या मुळाशी जाऊन ते सोडविण्यात सक्षम असतात.

असे अनेक गुण असल्यामुळे त्यांना अनेक गोष्टींना तोंड देण्याची तयारी असते. याविरुद्ध ज्यांच्या भावनिक बुद्धिमत्ता कमी असतील तर ते आपल्याला ओळखता आले पाहिजेत, जसे की;

१. पटकन राग येणे. इतरांबरोबर काम करायला नकार देणे
२. भावनांकडे दुर्लक्ष करणे व असंवेदनशील वर्तन.
३. मीच खरा व इतरांना दोष देणे, टीका टिपण्णी करणे.
४. परिस्थितीशी सामना करायला घाबरणे.
५. भावनिक उद्रेक, ताणलेले नाते.
६. सहानुभूतीचा अभाव.

कमी भावनिक बुद्धिमत्तेमुळे आपल्या जीवनातील बर्‍याच क्षेत्रात समस्या उद्भवू शकतात. सुदैवाने, आपल्या भावनिक बुद्धिमत्तेत वाढ करू शकतो. आपली कौशल्ये वाढविल्यास आपले वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध सुधारू शकते. काय करावे?

१. अधिक आत्म-जागरूक व्हायला हवे व स्वतः ला कसे वाटते यावर लक्ष द्या
२. स्वतःचे भावनिक सामर्थ्य आणि कमकुवतपणाचा आढावा घ्या
३. लक्षात ठेवा की भावना क्षणिक असतात.
४. स्वतःची नियमावली करून तिचे पालन केले तर कामाच्या ठिकाणी ताण कमी करणे व डोके शांत ठेऊन निर्णय घेण्यासाठी उत्तम.
५. इतर लोक काय म्हणतात, त्यांचे तुमच्याप्रती काय मत आहेत याचा अंदाज घेऊन बदल करणे.
६. आपला मत मांडायच्या अगोदर अभ्यास करा व मग बोला. स्किल डेव्हलप केले तर छानच.
७. सकारात्मक दृष्टीकोन राखून स्वतःच्या प्रेरणांचा वापर चांगल्या निर्णयाकरिता केलं तर पश्चातापाची वेळ येत नाही.

भावनिक बुद्धिमत्ता केवळ आनंदच नव्हे तर कार्यक्षेत्रात यश देते. सुदैवाने, भावनिक क्षमता वाढविण्यास वरील गोष्टींचे पालन हळूहळू केले तर त्या पुन्हा स्थापित होऊ शकतात. भावनिक बुद्धिमत्ता चाचण्या प्रत्येकाने करून घ्यायला हव्यात. त्यामुळे आपण कुठे आहोत याची जाणीव होऊन रोजचे जीवन आनंदाने व सहजगत्या जगू शिकतो. त्यातूनच कौटुंबिक व सामाजिक रचना सुधृद होऊ शकेल.

@श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *