रोजचा संघर्ष

रोजचा संघर्ष

वैतागलेली आणि चिडलेली एखादी व्यक्ती आपल्या सहनशीलतेचा अंत बघत असते. जाम चिडून मित्र फोन वर माझ्याशी दोन मिनिटं बोलला आणि धपकन ठेऊन दिला. बोलला कि सहनशक्ती संपली यार. आज मी सुद्धा काम आणि सतत च्या पावसाने थोडा सैरभर झालो होतो. शेवटी काम गेले उडत म्हणून ऑफिसमध्ये येऊन विचार करत बसलो कि एवढी चलबिचल सगळ्यांनाच का होतेय. सकाळी जप जाप, नित्य व्यायाम सगळे चांगले राहायचे फंडे वापरून सुद्धा सहनशीलतेला धोका का पोहोचतो. थोडासा विचार केला कि सगळं समजतं; जसे कि

१. बदललेली जीवनशैली, वाढलेला कामाचा व्याप, प्रचंड धावपळ, सभोवतालचे वातावरण.
२. प्रत्येक गोष्टीत तडजोड व मनाविरूद्ध होत असल्याने, नाईलाजाने काही गोष्टी कराव्या लागल्याने.
३. कमी झोप, नैराश्य, चिंता यांचा आपल्या मनावर होणारा परिणाम.
४. हा एक व्यक्तिमत्व गुणधर्म आहे कि यांना सहनशक्ती देवाने दिलीच नाही कि हि शंका येते.
५. कामाच्या ठिकाणी विनाकारण होणारी स्पर्धा सुद्धा अनेक समस्या निर्माण करते.
६. आत्मप्रौढी, जोडीदारावर अविश्वास, संशय अशा अनेक घटकांमुळे.

विचार करत बसलो तर खूप कारणं सापडतील जी आपल्याला माहिती आहेत. पण सहनशक्ती संपली कि तिथून पुढे खरा प्रश्न सुरु होतो तो म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील गोष्टीवर. उदा.
१. बारीकसारीक गोष्टींचा त्रास जाणवतो, नाही सहन होत, मग भांडणं.
२. तडजोड न केल्याने कित्येक जोडपी संकटात सापडलेली आहेत.
३. निराशेमुळे आत्महत्या करावीशी वाटणे. अमली पदार्थ आहारी जाणे.
४. काहीजणांमध्ये न्यूनगंड किंवा कमीपणाची भावना निर्माण होते.
५. शारीरिक व्याधी – ब्लड प्रेशर, शुगर, मानसिक आजार वाढू लागलेत.

मग सहनशक्ती चांगली करण्याचे उपाय काय? आहे त्या गोष्टी बदलणे आपल्या हातात नाहीत, पण स्वतःला थोडं बदललं कि त्रास कमी जाणवेल.
१. कठीण परिस्थिती स्वीकार हा एक सहकार्याचा पर्याय आहे. डिप्लोमसी.
२. स्वतःला सांगणे कि आपण त्रासदायक भावनांचा सामना करू शकता.
३. दीर्घ श्वास घेण्याची प्रॅक्टिस. जेंव्हा केंव्हा आपल्याला इतरांचा त्रास होतो तेंव्हा हि प्रक्रिया कामाला येते, विचार करायला वेळ भेटतो.
४. निराशेचा सराव करणे. अवघड काम आहे पण निराशाजनक वस्तुस्तिथीचा सामना करणे सरावाने शक्य होतं.
५. राग नियंत्रण. प्रिय व्यक्तीचे घेतल्याने रागावर नियंत्रण होते असा माझ्या मित्राचा सल्ला !
६. योग्य शिक्षण. शिकत राहा. वाचन वाढवा, निरीक्षण शक्ती तेज करा, स्वतःच्या बुद्धीने चला.

अशा परिस्थिती मध्ये आपल्याला काय प्रॉब्लेम आहे याचा खूप कमी लोकांना अंदाज येतो व ते त्याप्रमाणे आपल्यात बदल करतात. पण ठराविक व्यक्तींचा स्वभावगुण चिडखोर असेल तर मात्र थोडं कठीण असतं. आजकल यातून बाहेर पडण्यासाठी खूप व्यक्तिगत मार्ग आहेत जसे कि रिहॅबिलेशन सेन्टर, योग, प्राणायाम, समुपदेशन, वडीलधारी मंडळी बरोबर वेळ काढणे, कौटुंबिक वातावरणात रमणे, इत्यादी.

@श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *