मनाचा आवाज

 

माझ्या मित्राने मला सहज विचारले कि तु नेहमी मानसोपचार आणि समाज हे शब्द तुझ्या लेखामध्ये का टाकत असतोस. हसून त्याला म्हटले मनाचे आणि समाजाचे खूप जवळचे नाते आहे आणि जर का ते तुटले तर समाज विस्कळून जाईल. हे सांभाळायचे असेल तर मनाचे संतुलन हवे आणि जर ते नाही झाले तर गोंधळून न जाता समुपदेशक म्हणून आपल्याच समाजातील वडीलधारी मंडळीचा उपयोग होतो. तरीपण नाही झाले तर मानसोपचार. याठिकाणी काय होते ते मित्राला समजावून सांगितले.आता कुठे त्याला उलगडा झाला व म्हणाला कि वेड लागले तरच मानसोपचार घेतला जातो असा आजपण (गैर) समज समाजात आहे. किचकट गोष्टी संवादातून सुटतात. ज्या पद्धतीने नवरा बायको, सासू सून, शेजारी, मित्रांमध्ये किंवा कामगारांमध्ये आज जो नात्यातील बिघाड झालाय तो प्राथमिक स्टेज ला संपवता आला असता. मी मित्राला अजून थोडी कल्पना देत त्याची मानसिकता जागृत केली.

सर्वसामान्यपणे फरक समजावून घ्या मानसशास्रमध्ये दोन तज्ज्ञ असतात ते म्हणजे :
१. मानसोपचारतज्ज्ञ (Psychologist ) किंवा मानसशास्रज्ञ
२. मनोरुग्णतज्ज्ञ (Psychiatrist) किंवा मनोरोग तज्ज्ञ

दोघांचे कार्य वेगवेगळे असते, जसे कि,
१. जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरला आणि सायकॉलॉजिस्ट यांना मनोविकाराची औषधे देण्यास परवानगी नसते.
२.(सायकॉलॉजिस्ट) मानसोपचारतज्ञ सुमदेशन पद्धतीचा वापर करून सौम्य स्वरूपाच्या मानसिक समस्या सोडवण्यास मदत करतात, त्याला मानसिक रोगाची औषधे सुचवण्यास, ठरवण्यास परवानगी नसते. तसेच त्याहून थोड्या गंभीर समस्या मानसोपचार पद्धती psychotherapy वापरून सोडविल्या जातात.
३.मनोविकारावर औषधांचे प्रिस्क्रिप्शन देण्याचा हक्क फक्त मनोरुग्णतज्ञाला (Psychiatrist) असतो.

मग आपण कुणाकडे जावे त्याबद्दल बऱ्याचजणांना माहिती नसते म्हणून थोडे त्याबाबत जाणून घेऊ: प्रथम आपण आपल्या आई-वडिलांशी, आजी आजोबा, समंजस मित्र, शिक्षक यांच्याशी बोला. तरीपण प्रश्न नाही सुटले तर सायकोलॉजिस्ट (मानसोपचारतज्ञ्) ला भेटणे नेहमी चांगले.
कधी भेटावे त्याचे कारणे काही पण असू शकतात तरीसुद्धा खालील उदाहरण म्हणून:

१. आपणास प्रत्येक गोष्ट वेगळी वाटणे.
२. एखादी घटना घडली असेल ज्याणेंकरून आपण नॉर्मल काम करू शकत नाही, मानसिक त्रास होतो आणि याबद्दल विचार करणे थांबवू शकत नाही. विनाकारण भीती वाटते.
३. वारंवार डोकेदुखी, पोटदुखी किंवा इम्यून सिस्टम खालावत असेल तर.
४. आपण रोजच्या कामासाठी सुद्धा अमली पदार्थ वापरत असाल तर.
५. आपल्याला कामावर वाईट अभिप्राय मिळत असतील तर.
६. पूर्वी आवडणाऱ्या गोष्टी आपणास न आवडणे.
७. नातेसंबंधांमधील गुंतागुंत.
८. तुमच्या जवळच्या मित्रांना, नातेवाईकांना तुमची काळजी वाटणे.

मानसोपचार तज्ञ् आपल्याशी बोलुन, असणारी गुंतागुंत सुटसुटीत करून तुमच्या समोर मांडतो. मग त्यातून तुम्हाला तुमच्या त्रासाचा, प्रश्नाचं मूळ कुठे आहे ते समजते. त्यासाठी एक किंवा जास्त वेळा त्यांच्याकडे जावे लागते. कित्येकदा एकटे किंवा ग्रुपमध्ये समुपदेशन केले जाते.

जर आपण टाळाटाळ केली तर मात्र आपण पुढच्या स्टेज ला जातो ती म्हणजे मनोरुग्णता. यासाठी ठराविक थेरपी आणि औषधे मनोरुग्णतज्ञ (Psychiatrist) तुम्हाला देतो. दरम्यान ते आपल्याला न्यूरोसर्जन कडे ठराविक चाचण्यांसाठी पाठवून पुढील निर्णय घेतात. परंतु तोपर्यंत खूप वेळ गेलेला असतो व कौटुंबिक त्रास वाढतो. मानसिक त्रास म्हणजेच मनाचा आजार तुम्हाला थांबवायचा असेल तर पहिल्याच टप्प्यात त्याला आवरा नाहीतर तो डोईजड होतो.

@श्रीकांत कुलांगे
९८९०४२०२०९

नोट: हा ब्लॉग फक्त जनजागृतीसाठी असून त्यामागे कुठलाही व्यावसायिक हेतू नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *