आत्मघाती विचार

आत्महत्येची कल्पना समजून घेणे अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला कधी जीवन संपवण्यासारखे वाटले असेल तर तुम्ही जगात एकटे नाही आहात. काही आरोग्यविषयक परिस्थिती, अनपेक्षित घटना, दीर्घकाळ त्रास होणे किंवा एखाद्या व्यक्तीला आत्महत्येची भावना येण्याची काही कारणे असू शकतात. तुम्हाला हवं तसे आयुष्य घडले नाही असे वाटणे किंवा अनुभवणे हाही प्रामुख्याने आत्मघातास कारणीभूत घटक असू शकतो.

परंतु आयुष्य संपवणं म्हणजे निसर्ग नियमानुसार नाही हेही समजून घेणं आवश्यक. तरीही अनेकजण जीवन अर्धवट सोडून जाण्याचा विचार करतात. काही व्यक्ती त्याबाबत नेहमी विचाराधीन असतात. आत्महत्येच्या विचारांच्या लक्षणांमध्ये अनेक वर्तनांचा समावेश होतो:

१. वास्तविक आत्महत्येबद्दल चर्चा करणे किंवा जन्माला आल्याबद्दल पश्चात्ताप करणे.

२. हताशपणाची भावना.

३. एखाद्याचा निरोप घेणे.

४. एखाद्याचे जीवन संपवण्यासाठी लागणाऱ्या गोळ्या किंवा इतर वस्तू घेऊन ठेवणे.

५. अमली पदार्थांच्या वापरात वाढ आणि इतर प्रकारची स्वतःची हानी करून घेणं.

६. स्वतःला इतरांपासून वेगळे करणे.

७. मूड स्विंग आणि इतर व्यक्तिमत्व बदल

८. दैनंदिन दिनचर्येत बदल.

९. कोणत्याही उघड कारणाशिवाय एखाद्याचे व्यवहार व्यवस्थित करणे.

१०. संपत्ती किंवा जे जवळ आहे ते देऊन टाकणं.

जीवनातील परिस्थितींमुळे एखादी व्यक्ती जगण्याची इच्छा गमावू शकते. जीवन संपवण्यासाठी इच्छा बळवणारे अनेक कारणे समोर आले आहेत. जे लोक दारूचा अतिवापर करतात त्यांना नैराश्य आणि आत्महत्येचा धोका जास्त असतो. संशोधन असे सांगते की ज्या लोकांना अती दारू पिण्याची समस्या आहे त्यांना आत्महत्येचे विचार, आत्महत्येचे प्रयत्न आणि आत्महत्येमुळे मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. याचे प्रमाण जवळपास २२% असून यापासून काहीतरी शिकण्यासारखं नक्कीच आहे. मग दारू आणि आत्महत्या यांच्यातील संबंध काय? ज्यांना आत्मघात करण्याची इच्छा असते किंवा कल्पना करतात, अशा व्यक्ती जर अल्कोहोलच्या आहारी गेले तर प्रश्न गहन होतात.

१.अल्कोहोलमुळे संयम कमी होतो आणि व्यक्तीच्या स्पष्टपणे विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. याच दरम्यान आपल्या मनात असलेल्या विचारांवर ॲक्ट करू शकतात.

२. अल्कोहोलचा मूडवर देखील परिणाम होतो, ज्यामुळे लोक आत्महत्येचा विचार करू शकतात.

३. अल्कोहोल मानसिक त्रास आणि आक्रमकता वाढवते आणि आकलनशक्ती कमी करते.

४. अल्कोहोल कधीकधी लोकांना त्यांच्या आत्महत्येच्या विचारांवर कार्य करण्यास प्रवृत्त करते. तसेच इतर गोष्टींशी सामना करण्याच्या धोरणांचा वापर करण्याची त्यांची क्षमता देखील कमी करते.

जर तुमच्या सोबत खालील गोष्टी कुणी बोलत असेल किंवा त्याच्या काही सवयी तुमच्या निदर्शनास आल्यास, त्याला घेऊन डॉक्टर, psychiatric, सायकोलॉजिस्ट कडे नक्की घेऊन जा.

१. मरायचे आहे याबद्दल बोलणे.

२. नेहमी लाज किंवा अपराधीपणाची भावना व्यक्त करणे.

३. ते इतरांना ओझे वाटतात, असं मानणे.

४. निराशा, असहायता किंवा दुःखाच्या भावना व्यक्त करणे.

५. मित्र आणि कुटूंबियांकडून पैसे काढणे

६. मूडमध्ये अचानक बदल होणे.

७. झोपेच्या पद्धतींमध्ये बदल.

८. अल्कोहोल किंवा इतर पदार्थ अधिक वारंवार वापरणे.

अशा बाबतीत डॉक्टरांशी बोलणे किंवा आत्महत्याग्रस्त हेल्पलाइनवर कॉल करणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला किंवा तुमच्या प्रिय व्यक्तीला तत्काळ धोका असल्यास, लवकरात लवकर आपत्कालीन सेवांशी संपर्क साधा. त्यामुळे आपण सर्व एकमेकांना नक्कीच मदत करू शकू. कौटुंबिक कलह वेळीच थांबवा. सावध व्हा. राग आणि तणाव वाढू देऊ नका. देवानं दिलेलं आयुष्य सत्कारणी लावा.

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *