घरगुती अत्याचाराबाबत समुपदेशन घेणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढत आहे. घरगुती अत्याचार, ज्याला कौटुंबिक हिंसा किंवा कौटुंबिक शोषण असेही म्हटले जाते, हा आपल्या वागणुकीचा एक प्रकार आहे ज्याचा वापर कुटुंबातील सदस्याला दुखापत करण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी, नियंत्रण मिळविण्यासाठी केला जातो. अर्थात ज्याच्यावर अत्याचार होतो तो पुरुष किंवा स्त्री कुणीही असू शकते. त्याची व्याप्तीही वेगळी असते.
अलीकडेच परिसरात एका पुरुषाने आत्महत्या केली आणि तो अशाच एका अत्याचाराचा बळी होता. एमपीएससी ची तयारी करणारा युवक, बायको आणि आईच्या कलहामध्ये घुस्मुटून, टोमणे खावून शेवटी आत्मघात करून घेतो ही हृदय पिळवटून टाकणारी घटना होती. अशा अनेक अप्रिय घटना रोज घडत असतात. त्या थांबवायला हव्यात.
घरगुती शोषण घरातील कोणत्याही सदस्याकडून केले जाऊ शकते, जसे की नवरा बायको, पालक, मूल, भावंड, नातेवाईक किंवा कर्मचारी सदस्य.
घरगुती अत्याचाराचे अनेक प्रकार असू शकतात.
१. शारिरीक शोषण.
२. लैंगिक अत्याचार
३. भावनिक अत्याचार/मानसिक अत्याचार
४. उपेक्षा.
५. ऑनलाइन गैरवर्तन.
६. आर्थिक अत्याचार
७. सांस्कृतिक/सामाजिक अत्याचार.
८. तंत्रज्ञानाचा गैरवापर, ज्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर इतर व्यक्तीला धमकावणे, त्रास देणे, छळ करणे आणि अत्याचार करण्याचे साधन आहे.
घरगुती अत्याचार ओळखणे महत्त्वाचे आहे कारण पीडित आपले मित्र, कुटुंबातील सदस्य, सहकारी आणि शेजारी असू शकतात. घरगुती अत्याचार अनुभवणाऱ्या व्यक्तींची काही चिन्हे दिसून येतात:
१. अस्वस्थ किंवा चिडचिड होणे.
२. पटकन माघार घेणे किंवा प्रतिसाद न देणे
३. विशिष्ट लोक जवळ आले की भीती किंवा अस्वस्थतेची भावना दिसून येते.
४. वागण्यात अचानक बदल किंवा असामान्य वागणूक दर्शविणे.
५. कट, सुजलेले डोळे किंवा मोडलेले हाड यासारख्या जखमा असणे.
६. जननेंद्रियाच्या आसपास जखम, रक्तस्त्राव, फाटलेले कपडे किंवा रक्ताचे डाग असणे.
७. तहानलेली, कुपोषित किंवा नीटनेटकी राहणीमान नसणे.
८. असुरक्षित किंवा अस्वच्छ परिस्थितीत राहणे.
९. जखम झाकण्यासाठी लांब बाही असलेले कपडे किंवा सनग्लासेस घालणे.
१०. खाण्याच्या किंवा झोपण्याच्या सवयींमध्ये बदल.
११. अतिशय नम्र (अनैसर्गिक) आणि पटकन सॉरी बोलणं.
१२. दैनंदिन कामात रस कमी होणे.
१३. मित्र आणि कुटुंबापासून स्वतःला वेगळे करणे.
अशा व्यक्ती नियमित दिसत, वागत असतील तर घरगुती हिंसाचाराच्या त्या बळी आहेत असं समजण्यास हरकत नाही. यावेळी जर समुपदेशन झाले नाही तर आत्मघात करून घेण्याची शक्यता जास्त असते. त्या व्यक्तीच्या आसपास असणाऱ्यांनी वेळीच सावध राहून जागेवर वस्तुस्थिती जाणून घेतलेली बरी. अशा वेळी व्यक्ती सुरुवातीला खोटे बोलून वेळ टाळून नेतात. त्यातून त्यांना स्वतःचा बचाव करायचा असतो.
घरगुती अत्याचाराची कारणे काय असू शकतात?
१. सांस्कृतिक घटक. काही ठिकाणी अशी संस्कृती असते की मारणं, यातना देणं हे नैसर्गिक आहे असे ते समजतात.
२. कायदेशीर घटक. पोलिस अनेकदा कौटुंबिक अत्याचाराला खाजगी कौटुंबिक बाब मानतात आणि काहीवेळा हस्तक्षेप करण्यास किंवा त्यात सहभागी होण्यास कचरतात.
३. आर्थिक घटक: पैशाचा अभाव अनेकदा घरगुती अत्याचाराशी संबंधित असतो.
४. पर्यावरणीय घटक: जे लोक अपमानास्पद वातावरणात मोठे झाले आहेत आणि लहान मुले म्हणून अत्याचाराचे साक्षीदार बनले आहेत किंवा अनुभवले आहेत ते मोठे होऊन घरगुती अत्याचार करण्याची शक्यता जास्त असते.
५. सामाजिक घटक.
६. अमली पदार्थांचे सेवन.
७. अहंकारी वर्तणूक.
घरगुती अत्याचाराचा वेगवेगळा प्रभाव दिसून येतो. ज्या व्यक्तींबरोबर अशा नियमित घटना घडतात त्यांना काय वाटते?
१. मागील जन्माची फेड.
२. ते प्रेम किंवा आदर करण्यास पात्र नाहीत.
३. दोषी किंवा लाज वाटते.
४. असहाय्य आणि शक्तीहीन.
५. वापरलेले, नियंत्रणात ठेवलेलं वाटते.
६. काही नवीन करण्यास घाबरणे.
७. त्यांना झोपणे, मन एकाग्र करणे किंवा त्यांनी एकदा आनंद आसलेल्या कार्यात भाग घेण्यास त्रास होतो.
८. स्वतःची समज आणि त्यांच्या निर्णयांवर सतत शंका घेतात.
९. मनोविकार असल्याची शंका, न्यूनगंड.
१०. शरीराने दुबळेपणा येतो.
घरगुती शोषणाचा अनुभव घेतल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात ज्या अत्याचार थांबल्यानंतरही कायम राहतात.
अत्याचारित व्यक्तीला सपोर्ट देणं गरजेचं. मग आपण काय मदत करावी?
१. त्या व्यक्तीचे ऐका आणि त्यावर विश्वास ठेवा.
२. आपले मत त्यांच्यावर न लादणे.
३. मदत ऑफर करा आणि त्यांना सांगा की ते एकटे नाहीत.
४. त्यांना आठवत असलेले सर्व तपशील नोंदविण्यात मदत करा.
५. त्यांच्यासोबत घडलेल्या कोणत्याही गोष्टीसाठी ते दोषी नाहीत हे ठणकावून सांगा.
६. त्यांना व्यावसायिक समुपदेशन, वकिली सल्ला मिळविण्यास प्रेरित करा.
७. त्यांनी केलेल्या निवडीचा आदर करून आपण त्यांच्या सोबत आहोत हे सांगा.
घरगुती अत्याचार भिन्न प्रकारचे असून असून त्यांचे अनेक रूपे पाहायला मिळतात. शारीरिक जखमा, भावनिक चट्टे आणि आरोग्याच्या समस्या अनुभवणे अत्यंत क्लेशकारक असू शकते. त्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनातील प्रत्येक पैलूवर होऊन त्यांना रोजचे कार्य करणे कठीण होऊ शकते.
परिस्थिती ठीक होण्यास वेळ लागतो, परंतु होणाऱ्या गैरवर्तनाबद्दल बोलणे, अपमानास्पद परिस्थिती विसरणे आणि उपचार घेणे हे महत्त्वाचे पाऊल आहेत जे आपल्याला ठीक होण्यास मदत करू शकतात.
अमूल्य जीवन त्रासदायक बनविण्यास आपला अहंकार तर आडवा येत नाहीना याचा विचार सर्वांनी केला पाहिजे.