सुखाचा शोध

“हवं ते सुख मिळत नाही आणि नको ते दु:ख मागं लागतं.’’ सुख-दु:खाच्या या लपंडावात मानवाचं जीवन व्यतीत होत असतं, बरेचदा तर ढवळून निघत असतं. हेमांगी आपल्या सुख-दुःखा बाबत हाच विचार करत समुपदेशन साठी काही आठवड्यापासून प्रयत्न करतेय. असं का होतं की आपल्याला हवं असलेलं सुख मिळत नाही. 

१. नकारात्मक लोकांच्या आसपास राहणे.

२. आपल्या स्वतःच्या जीवनाची तुलना सोशल मीडियावर टाकलेल्या इतरांच्या जीवनाशी केली जाते.

३. स्वत: ला सामाजिक संपर्कापासून दूर ठेवणे दु: खी होण्यास मदत करतं.

४. इतरांवर दोषारोप करणं.

५. भावना नियंत्रित नसणे.

६. नेहमी तक्रारी करणं.

७. इतर लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करणे हे दु: खाचे कारण आहे.

८. नकारात्मकता नेहमीच्या सवयीप्रमाणे बरोबर असणे.

९. ध्येय निश्चित करण्यात दुर्लक्ष.

१०. मानसिक स्वास्थ्य नीट नसणे.

 

जीवन यशस्वी, संपन्न, सुखकर आणि अर्थपूर्ण करायचं असेल, तर त्याकरिता खालील गोष्टी अत्यावश्यक आहेत,

१. स्वत:च्या क्षमता आणि बलस्थाने ओळखून त्यांचा प्रगतीसाठी पुरेपूर वापर करता येणे.

२. स्वत:तील उणिवांची, मर्यादांची जाणीव ठेवून शक्य त्या उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करणे.

३. ‘घालवणे अशक्य आहे’ अशा उणिवांवर खंत करीत न बसता त्यांचा स्वीकार करून स्वत:बद्दलचा आदर कमी होऊ न देणं व त्या उणिवांसहित स्वत:ला स्वीकारून जगण्याची तयारी ठेवणं.

४. स्वत:च्या विनाशर्त स्वीकाराबरोबरच ज्या व्यक्तीबरोबर, जीवनाचा महत्त्वाचा आणि दीर्घकाळ घालवायचा आहे त्या व्यक्तीचा एक मनुष्य म्हणून स्वीकार करणं व व्यक्ती म्हणून त्यांचा आदर करणं.

५. भावनांच्या आहारी न जाता निसर्गाकडून प्राप्त झालेल्या विवेकपूर्ण विचारशक्तीच्या वापराला प्राधान्य देणे.

६. वेळोवेळी सकारात्मक व्यक्तींच्या संपर्कात राहणे, सल्ला घेणे छान.

७. मानसिक आरोग्यासाठी नियमित व्यायाम, आहार आणि समुपदेशन महत्वाचे.

बऱ्याच लोकांना अशा गोष्टी जमत नाहीत. त्यामुळे सुख आणि यश या हव्या असणाऱ्या गोष्टींना त्यांना पारखं व्हावं लागतं. हिताविरोधी वागणं आणि दु:खदायक तीव्र भावनांची अडचण प्रत्येकालाच कमी-अधिक प्रमाणात जाणवते. त्यावरील उपाय स्वत:जवळच आहेत याची जाणीव नसल्यामुळे ते मग एखादा डॉक्टर, गुरूमहाराज, अंगारा धोपारा, ज्योतिषी इ. कडे धाव घेतात.

सुख ही बाजारात पैसे देऊन किंवा इतर सामर्थ्याच्या जोरावर हस्तगत करता येईल अशी वस्तू नाही. सुखदु:खाच्या अनेक शक्यता जीवन आपल्याला उपलब्ध करून देते. आपल्या आयुष्याचं सोनं करायचं की माती हे सर्वस्वी आपल्यावर, आपल्या दृष्टिकोनावर आणि वृत्तीवर अवलंबून आहे.

 

©श्रीकांत कुलांगे

9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *