लहान मुलांचा राग

अशी अनेक कारणे आहेत जी एखाद्या मुलाला आव्हानात्मक मार्गाने राग व्यक्त करण्यास किंवा रागातून कृती करण्यास योगदान देतात. बऱ्याचदा मुलांनी इतरांना रागातून केलेल्या जखमा, खून अशा घटना पाहायला, ऐकायला भेटतात. मुलांचा वयात येणारा राग इतक्या मोठ्या स्वरूपाचा कसा असू शकतो याबाबत संशोधकांनी केलेल्या विश्लेषणाची जगभर नोंद घेण्यात आली. 

१. नात्यात अडचण. नात्यांमधील असणारा ताळमेळ बदलणं लवकर ध्यानात घेतले न जाणं.

२. कौटुंबिक जीवनात व्यत्यय. सभोवताली घडणाऱ्या घटना मुलांवर संस्कार करतात. मुलं जर दैनंदिन जीवनात व्यवस्थित तोंड देत नसतील तर प्रॉब्लेम होतो.

३. आक्रमकता. जेंव्हा मुलं त्यांच्या समस्या हाताळू शकत नाहीत, तेंव्हा आक्रमकता या शक्तीचे हत्यार वापरतात. रागाचे नियोजन होत नाही.

४. अपरिपक्व वर्तन. जसजसे मुलं वाढत जातात, परिपक्व होतात. परंतु काही मुलं शरीराची वाढ होऊनही तशीच कृत्य करतात.

५. वारंवार येणारी निराशा. मुलांचे वय वाढत असताना निराशा कमी होत जाते. परंतु काही मुलांमध्ये ती कमी न होता वाढते.

६. वातावरण. आईवडील कित्येकदा घरात नसतात व मुलं अनेकदा एकटी असतात, अशावेळेस टीव्ही किंवा मोबाईल वर ते जे पाहतात, त्यांचा परिणाम नकळत मुलांवर होतो. एकत्र कुटुंब पद्धती मध्ये अशा घटना कमी घडतात.

७. संस्कृती. नाविन्याची कास धरून चालणे आवश्यक परंतु स्वतः आपण मुलांसमोर कसं वागावं हे मोठ्यांनी ध्यानात न ठेवता चुकीचे वागत राहतात व मुलं त्यांचे अनुकरण करतात.

८. कौटुंबिक हिंसाचार. घरातून आई वडील या मध्ये होणारी भांडणे व मारामारी मुलांच्या विचारांना हिंसक बनवते.

९. मुलांचे शारीरिक बदल कित्येकदा चिडचिड आणि रागाला निमंत्रण देतात.

१०. मुलांना त्यांच्या रागाचे नियमन करायला अवघड जातं.

११. पालकांचं मुलांप्रती अतिप्रेम, फाजील लाड.

 

काळानुरुप अनेक गोष्टी आपल्याला समजतात आणि आपण स्वतःमध्ये बदल करतो परंतु कित्येकदा वेळ निघून गेलेली असते. मुलं जे शिकायचं ते शिकलेली असतात. कसलेही हिंसक कृत्य मुलांकडून होत असेल तर ते निश्चितच ते चिंताजनक आहे. त्यासाठी ठराविक गोष्टी लक्षात घेऊन पुढे चालणे क्रमप्राप्त.

 

१. पालकांनी त्यासाठी मानसोपचार तज्ज्ञाला भेटून समुपदेशन आणि रागाचे नियमन कसे करावे याबाबत चर्चा करावी.

२. पालक स्वतः घरी कसे वागतात याचे स्व विश्लेषण करणे आवश्यक.

३. मुलांच्या हरकती कित्येकदा मर्यादेबाहेर असतात तेंव्हा पालक मुलांना एकतर ते म्हणतील ते करतात किंवा त्यांना मारहाण करतात. कुठेतरी या दोन्ही गोष्टी आहेत.

४. मुलं वयात येताना होणारी शारीरिक व भावनिक वाढ, त्यांच्या विचारांना देखील बदलत असते. जर इथे काही गडबड झाली तर संतुलन बिघडते.

५. पालकांनी मुलांबरोबर नियमित संवाद साधला पाहिजे. समजाऊन सांगितले पाहिजे.

६. मूड बदल हा कॉमन फॅक्टर असतो. होणाऱ्या बदलाना सामोरं जाणं कित्येकदा मुलांना कठीण जातं. अशावेळेस पालक व शिक्षक यांनी त्यांना मानसिक रित्या आधार देणे गरजेचे.

७. काही मुलांना एकटं सोडले तर ते स्वतःला असुरक्षित मानायला लागतात. भावनिक वाढ ही याच काळात होते. त्यांना भावनिक, वैचारिक सुरक्षितता देणं हे पालकांचं काम आहे.

८. भावंडांशी नातेसंबंध प्रेमाचे राहावे म्हणून एकमेकांशी स्पर्धा किंवा उपहासात्मक बोलणे टाळावं.

९. नियमित व्यायाम हा महत्वाचा घटक आहे. त्याचबरोबर योगा खूप मदत करतं.

१०. मुलांचे त्यांच्या मित्रांबरोबर कसे संबंध आहेत हे पालकांनी तपासले पाहिजेत.

११. मोबाईल वापर कसा करावा, याबाबत सूचना आणि समुपदेशन आवश्यक.

१२. प्रेरणा महत्वाची. त्यांना प्रेरणा देऊन आत्मविश्वास वाढविणे काळाची गरज.

१३. समाजात कसे राहावे, वागावे, यांचे धडे मुलं पालकांकडून शिकतात. त्यासाठी आपण जबाबदारीने वागणे गरजेचे.

१४. मुलांचे फाजील लाड व्यवस्थित रित्या नाकारणे. त्यामागील कारणे समजून सांगण्याची पद्धत लहानपणापासून डेव्हलप केली गेली पाहिजे.

 

जेव्हा आपली किशोरवयीन मुले चुका करतात तेव्हा त्यांना कौशल्याने चुका समजाऊन पुन्हा होऊ नयेत म्हणून प्रयत्न असावेत. जर त्यांनी वारंवार त्याच चुका केल्या किंवा विशिष्ट समस्यांशी संघर्ष केला तर व्यावसायिक मदत घ्या, ज्यानेकरून वेळेवर योग्य उपचार होतील व पुढील डोकेदुखी टाळू शकु.

 

© श्रीकांत कुलांगे

9890420209

 

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *