चिकाटी आणि दृढनिश्चय

देवदत्तच्या मते चिकाटी आणि दृढता ही यश संपादन करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. चिकाटीमुळे त्याचा बराच फायदा झाला. आज तो यशस्वी व्यक्ती म्हणून समाजात वावरतो. पण हीच गोष्ट त्याच्या भावाला समजत नाही म्हणून सल्ला मागत होता. अडचण किंवा विरोध असूनही दृढनिश्चय ही देवदत्त ची मानसिकता होती आणि या सर्व गोष्टींवर मात करत जिंकत होता. मग त्याच्या भावाला हे का जमत नव्हतं? त्याला महत्व माहित नव्हते अस नव्हे परंतु त्याची विचार प्रक्रिया कदाचित त्याला साथ देत नसावी म्हणून मी त्याच्याशी बोललो. जे सत्य समोर आले ते मला नवीन नव्हते.

१. लहानपणापासून त्याने आपल्या बंधूंची पाहिलेली धडपड व त्याच्याबरोबर केलेली तुलना त्याला आवडत नव्हती.
२. हळूहळू डळमळीत होणारा आत्मविश्वास.
३. तुलने मुळे नैराश्य आणि चिंता. त्रासात होणारी वाढ व चिडचिडीत रूपांतर.
४. यश मला मिळणार नाही हा न्यूनगंड.

ही कारणे जरी वरवर वाटतं असली तरी सुद्धा महत्वाची होती आणि यातून समाजात, घरोघरी अशी होणारी हेळसांड किंवा तुलनात्मक प्रकार एकमेकांना दुरावणारा असतो. परंतु चिकाटी हा गुण ठराविक व्यक्तींमध्येच काही कारणास्तव पाहायला मिळतो, त्यांची विचार प्रक्रिया वेगळी असते, जसे की;

१. स्वच्छ आणि स्पष्ट विचारधारा – सतत मनात एक ध्येय किंवा दृष्टी असते जी त्यांना प्रेरित करते
२. तीव्र इच्छा – ते कधी निमित्त किंवा पळून जाण्याचा मार्ग शोधत नाहीत. तीव्र इच्छा त्यांना अत्यंत चिकाटीने पुढे जाण्याची प्रेरणा देते.
३. अंतर्भूत विश्वास – आतून असणारा विश्वास जो बाहेरून येणाऱ्या आक्रमणांना तोंड देण्याची क्षमता राखतो.
४. अत्यंत विकसित सवयी – प्रेरणा तुम्हाला प्रारंभ करून देते तर सवय आपल्याला पुढे नेत राहते. आपल्या सवयी आपण काळाप्रमाणे बदलणे आवश्यक.
५. स्वतःमध्ये वेळेनुसार बदल व परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता असते. काळ व वेळ स्वतः ठरवतात, प्रसंगी आपल्या कुटुंबियांशी झगडत ध्येय गाठण्याचा प्रयत्न.
६. आजीवन शिक्षण घेण्यासाठी तयारी – कोणतेही ध्येय गाठण्यासाठी योग्य वेळ, प्रयत्न, निरंतर नवीन कौशल्ये आणि विचारांची पद्धत शिकणे आवश्यक आहे. ते बदल आणि नवीन कल्पनांचे स्वागत करून आपल्या आयुष्यात समाविष्ट करतात.
७. मार्गदर्शक व्यक्ती त्यांना गरजेची असते व असे मार्गदर्शक शोधून त्यांच्या मार्गावर चालतात. आज मार्गदर्शक म्हणून, टेकनॉलॉजि, ऑनलाईन शिक्षण प्रणाली, ग्रुप डिस्कशन वगैरे खूप काही आहे.

मग ज्या व्यक्तींना वळणावर आणायचे त्यांना अगोदर काही ठराविक बाबी कराव्या लागतील: (एक तर अशा व्यक्ती काही करण्यासाठी बरेच आढेवेढे घेताना दिसतील, म्हणून आपली विचारसरणी संयमी हवी.)

१. प्रथम त्यांची तुलना बंद केली तर सकारात्मक फरक दिसून येतो.
२. त्यांच्यातील चांगले गुण शोधून त्यांना विकसित करण्यासाठी प्रोस्थाहन देणे.
३. आपले विचार त्यांच्यावर लादण्यापेक्षा त्यांची कार्य करण्याची पद्धती शोधून योग्य ती वातावरण निर्मिती करणे.
४. त्यांना समुपदेशन करून त्यांच्यातील न्यूनगंड काढणे महत्वाचे.
५. सुरुवातीला त्यांचे ध्येय हे आवाक्यातील असायला हवे.
६. चिकाटीची फक्त मनाची साथ लागते. म्हणून मन खंबीर बनले की प्रश्न सोडवण्यास मदत होते. त्यासाठी व्यायाम, योगा, मेडिटेशन अत्यंत चांगला विचार आहे.
७. चिकाटी आणि दृढनिश्चय यासाठी शिक्षणाची गरज नसते. खूप सुशिक्षित जवळ सापडतील. म्हणून हा पैलू आपल्यात शोधणे.

तुम्ही जितके अधिक टिकून राहाल, तितके तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता आणि जितके तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवाल तितके तुम्ही टिकून राहाल ही जगातील कुठलीही यशस्वी व्यक्ती सांगू शकेल. जेव्हा आपण आपले ध्येय गाठण्यासाठी अडथळ्याचा सामना करतो तेव्हा तीन गोष्टींचा विचार करा: त्याभोवती उतरा, त्या मिळवा किंवा त्याद्वारे जा व सोडू नका, कारण चिकाटी ही एक गुणवत्ता आहे जी शेवटी आपल्या यशाची हमी देते.

@श्रीकांत कुलांगे
9890420209

3 thoughts on “चिकाटी आणि दृढनिश्चय”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *