तणावाची आयुष्यातील भूमिका

पंकज हा प्रचंड तणावाखाली होता कारण सगळ्याच गोष्टी बंद होत आहेत आणि कुठलाही रस्ता दिसत नाही म्हणून काही मदत होईल का अशा विश्वासाने फोन करून विचारात होता. तात्पुरती मदत करून त्याचा तणाव कमी करायच्या प्रक्रिया बोललो. ताणतणावाच्या परिणामाबद्दल सर्वाना भरपूर माहिती आहे आणि तणाव कमी करण्याचा प्रत्येकजण प्रयत्न नेहमी करतो. आणि गमतीची गोष्ट म्हणजे हा प्रयत्नच काही प्रमाणात तणाव निर्माण करतो. म्हणून तणावाकडे कसे बघायचे हे प्रत्येकाने ठरवले तर सोपे जाते.

तणावाच्या आपल्या जीवनात काही भूमिका असतात व आपल्यावर काही परिणाम करतात.

१. चुकीचा दृष्टीकोन आपली तणाव पातळी लक्षणीय वाढवते.
२.तणावाचे काही प्रकार फायदेशीर ठरू शकतात. जसे की अभ्यासाचा तणाव, प्रेमात पडायचा तणाव.
३.जेंव्हा तणाव निर्माण होतो तेंव्हा आपल्या समोर दोन पर्याय असतात, लढा किंवा सोडा. लढायचे ठरवले तर कदाचित ताण प्रतिक्रिया थांबवू शकता.
४. छोटे छोटे तणाव देखील आरोग्यावर परिणाम करू शकतात. अल्प कालावधीत आपल्या आजारपणाची जोखीम वाढून रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
५. आपण ज्या प्रकारे विचार करतो, तो आपल्याला आजारी बनवू शकतो. नकारात्मक विचार आणि भावनिक तणाव यामुळे मानसिक व शारीरिक आजार जडतात.
६. लहानपणापासून तणावाची सवय काळात नकळत होत असते. त्याजोडीला सुरुवातीपासून जर लढा द्यायची ताकद तयार केली असेल तर आपण आपल्या जीवनात ताणतणावाचा मोठा भाग रोखू शकता.
७. तणाव आपल्याला अनेक प्रकारे लवकर वृद्धत्व आणू शकते.
८. प्रत्येकजण आपापल्या परीने तणाव अनुभव करत असतो.
९. काही ‘ताणतणाव दूर करणारे’ फंडे प्रत्यक्षात अधिक ताण निर्माण करतात.
१०. आता मला ताण नाही अशी कल्पना केल्याने काही ताण गायब होतात.

तणाव निवारणाबाबत खूप जणजागृती आहे आणि त्याप्रमाणे वातावरण निर्मिती झालेली दिसते. सामाजिक दृष्ट्या आपणच ठरवायचे की मी कुणाला माझ्या व्यवहाराने त्रास तर देत नाही ना? तणाव निर्माण झाल्यावर आपण काही गोष्टी ध्यानात ठेवल्या तर चांगले:

१. तणाव येतो तेंव्हा आपण फक्त विचार करून करून थकतो. काही सुचत नाही. अशा वेळेस शांत बसून श्वास घेण्याच्या व्यायामासारख्या तणाव मुक्तीचा अभ्यास आणि ध्यान केल्याने आपणास त्वरेने शांतता प्राप्त होते
२. येणारे प्रत्येक आव्हान वेगळे असते व ते हाताळण्यास अधिक सक्षम मन लागते.
३. वेळ सांगून येत नाही म्हणून तरी यापुढे आपण आपल्या पिढ्या सक्षमतेने घडवल्या तर त्यांना फायदा होईल.
४. पालकांनी मुलांना जास्त डोक्यावर घायची किंवा त्यांच्या मागे मागे फिरायची गरज ही त्यांच्या अविश्वासाच्या किंवा अतिप्रेमाच्या चौकटीतून बाहेर येते. नंतर मुलं तणाव स्वीकारायला तयार होत नाहीत.
५. समुदेशन पहिल्या स्टेज ला घेतले तर तणाव नियमन व्यवस्थित व्हायला वेळ लागत नाही.
६. आहार व व्यायाम, चांगली झोप, प्रचंड मेहनत घेतली तर तणावाची लढाई जिंकायला वेळ लागत नाही.

COVID19 मध्ये तणाव वाढलेला दिसून येतोय. गेले पाच महिने आपण आशेवर जगत आहोत की आता ठीक होईल. यादरम्यान काहींनी असलेले उपाय शोधून पर्यायी व्यवस्था केलीय तर काही अजुन त्रस्त आहेत. अशा अशाश्वत जगात जेंव्हा कोणी कुणाचे नसते तेंव्हा आपला कस लागत असतो. म्हणून पुन्हा एकदा सांगतो की चिंता करून प्रश्न सुटत नाहीत. योग्य निर्णय योग्य वेळी घेणे जरुरी अन्यथा अनावश्यक त्रासाला सामोरे जावे लागेल.

@श्रीकांत कुलांगे
9890420209

1 thought on “तणावाची आयुष्यातील भूमिका”

 1. वा!
  सुरेख…
  टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही !
  तणावाचे असेच !
  आधी छोटे मग मोठे तणाव सहन करत आपण तणाव समायोजन शिकत असतो!
  याला कुठेही क्लासला गेलो नव्हतो!
  पण कुणीतरी गुरुपद घेत होते, कधी आई कधी बाबा, कधी बायको, कधी मित्र, कधीतर पेशंटनीही सल्ले दिले !
  ??????

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *