मी आशावादी

 

मी आशावादी आहे आणि नेहमी सकारात्मक बोलतो म्हणून मला कित्येकजण स्वप्नातला माणूस म्हणतात. आशावादी असणे म्हणजे स्वप्न बघणे नाही पण उद्याबाबत मी नकारात्मक तरी विचार का करावा? असा माझा प्रतिप्रश्न असतो. आजच्या कष्टमय जीवनामुळे उद्या सुखकर होऊ शकतो. ज्या कुणाला चांगले अनुभव आलेत ते आशावादी जास्त असतात व त्यात अतिशयोक्ती नसते व ते ताणतणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करतात. प्रपंचामध्ये अनेक प्रश्न आपल्याला गोंधळून टाकतात व सोपा पर्याय असून सुद्धा दिसत नाही.

वर्षानुवर्षे केलेल्या संशोधनातून आशावादी आणि निराशावादी गटाचा अभ्यास करीत असताना, आशावाद चे काही फायदे आहेत हे समजले.

१. निरोगी आरोग्य – हृदयविकार ५०% कमी झाल्याचे संशोधन सांगते. निराशावादी गट हा खराब आरोग्याशी निगडित आढळला.
२. आशावादी लोकांची ध्येयप्राप्ती लवकर होते कारण त्यांना निराशादायक विचार हे प्रेरणा ठरतात त्यातून शिकून ते पुढे वाटचाल करतात.
३. चिकाटी – आशावादी म्हणून सहज हार मानत नाहीत – पुन्हा उभारी घ्यायची इच्छाशक्ती असते.
४. भावनिक आरोग्य – आशावादी राहण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या रुग्णांमध्ये भविष्यातील अडचणी अधिक प्रभावीपणे हाताळण्याची क्षमता आढळते.
५. दीर्घायुष्य – आशावादी बरेच काळ जगले असा इतिहास सांगतो. आशावादी माणसं दीर्घायुषी असतात.
६. कमी ताण – आशावादी व्यक्ती निराशावादी किंवा वास्तववादी पेक्षा कमी तणाव अनुभवतात. कारण त्यांचा स्वतःवर आणि त्यांच्या क्षमतेवर विश्वास आहे, म्हणून चांगल्या गोष्टी घडण्याची त्यांना अपेक्षा आहे. त्यांना सहजपणे मात करता येण्यासारख्या किरकोळ अडचणी म्हणून नकारात्मक घटना दिसतात , स्वतःवर विश्वास ठेवून, ते अधिक जोखीम घेतात व त्यांच्या आयुष्यात अधिक यश प्राप्त करतात.
७. भविष्यातील योजना व्यवसथित आकार घेतात.

याविरुद्ध निराशावादी मंडळी असते व त्यांना या सगळ्या गोष्टीत उलट्या दिसतात.

१. त्यांना असे वाटते की नकारार्थी गोष्ट त्यांच्यामुळेच घडतात म्हणून स्वतःला दोष देतात.
२. एखादी चूक झाली तर अजुन चुका होतील म्हणून पुढे न जाता घाबरून थांबतात.
३. आयुष्यात एखादी चांगली घटना घडली तर बाय -चान्स घडली म्हणून त्याकडे बघून व पुन्हा अशी घटना घडेल का याबाबत शंका घेतात
४. एखादे प्रोमोशन जरी भेटले तर ते “आता जास्त त्रास वाढेल” व अधिक काळजी घेणे गरजेचे असा विचार करतात.
५. स्वतःच्या स्किल्सवर शंका घेत राहणे.
६. भूतकाळातील गोष्टी जरी अशा विचारांना कारणीभूत असल्या तरी वेळीच सावरणे शक्य होत नाही.

आशावादी होण्यासाठी ठराविक प्रयत्न केले तर शक्य होईल. मानसशास्त्रात CBT नावाची थेरपी आणि प्रॅक्टिस चा वापर करून हा बदल करणे शक्य होते. COVID19 चा प्रश्न जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत निराशावाद अजुन वाढताना दिसणार. मला यामध्ये काही आशावादी पण दिसले ज्यांनी आपल्या भूमिका वेळेवर बदलल्या व मार्गस्थ झाले. आज वाईट असला म्हणून काय झाले, उद्या माझाच असेल या विचारामुळे जगण्याची उर्मी उत्पन्न होते. यशस्वी जीवनाचा मार्ग आशावादातूनच मार्गस्त होतो हे ज्यांना समजले ते नक्कीच भाग्यवंत आहेत.

@श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *