मानसिक स्वास्थ आणि चिंता

 

काल मुकुंद सांगत होता की मार्केट मध्ये जबरदस्त मंदीचे सावट पसरले आहे आणि बरेच जणांचे मानसिक आरोग्य धोक्यात आलेय. परंतु कोणी त्याबाबत बोलत नाही, विश्वास कुणावर ठेवावा ते समजेनासे झालेय. वास्तविक हीच परिस्थिती सगळीकडे आहे. त्यामुळे चिंता आणि उद्याची अनामिक भीती वाढत आहे. सध्या कुणालाही काही मार्ग सापडत नाही. कारण मानसशास्त्रीय फंडे कितीही वापरले किंवा समुदेशनानंतरही किती फरक पडेल म्हणून साशंक. अर्थात त्याला एकच सांगितलं की, समस्या सर्वांनाच असतात पण जगण्यासाठी लागणार मानसिक बळ हे आपणच तयार करायला हवं. कारण जर आज आपल्याला जगायचं असेल तर मानसिकरीत्या स्वस्थ राहणं क्रमप्राप्त आहे. एक कहावत आहे ‘सर सलामत तो पगडी पचास’, हे जरी अशक्य वाटत असलं तरी ते शक्य करण्याकरता काही गोष्टी केल्या तर आयुष्यात कमबॅक करण्याकरता आपण समर्थ असू;

१. आपल्या भावनांना व्यक्त करणं-आपले आई-वडील, मित्र मैत्रीण, समुपदेशक असे अनेक व्यक्ती आपल्या सभोवताली असतात. त्यांच्यावर विश्वास ठेवणे आज काळाची गरज आहे.
२. स्वतःला गुंतवून ठेवण्याचा निर्धार- ‘खाली दिमाग शैतान का घर’. नको त्या नकारात्मक गोष्टी आपल्या डोक्यात वास्तव्य करतात म्हणून स्वतःला गुंतवा. व्यायाम, घरची कामे, मेडिटेशन, मुलांशी चर्चा त्यांचा अभ्यास इ.
३. मेंदूला ठराविक पोषण- प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, पाणी अशा काही जेवणाद्वारे दिलेल्या गोष्टी मेंदूला हेल्दी ठेवतो. म्हणून जे आहे ते आनंदाने स्वीकारा.
४. व्यसन टाळा-अशा काळात अल्कोहोल चे सेवन जास्त केले जाते. शक्यतो दूर राहिले तर पैसे वाचतील.
५. इतरांशी संवाद – काय नवीन करू शकतो का म्हणून चर्चा केली तर नवीन उद्योग धंदा सुचू शकतो.
६. समुपदेशन-जेव्हा विचार करून थकाल तेंव्हा मदत मागा. मानसिक थकवा दूर करण्यासाठी मदत मागितली तर मन शांत होते.
७. छंद – छंद जोपासले तर खूप काही शिकायला मिळते. मनःशांती चा हमखास मार्ग.
८. स्वतःला जसे आहे तसे स्वीकारणे- उगीच इतरांकडे बघून नाराज होऊन आपलाच लॉस होतो.
९. आयुष्याचा जमाखर्च – आता हि संधी आहे. काय चुकलं, बरोबर काय याचा हिशोब करून पुढे सुधारण्यासाठी प्रयत्न करणे.
१०.विचारांचे निरीक्षण- कुठल्या गोष्टी आपल्याला चिंताग्रस्त करतात त्या लिहून घेणे व त्या का येतात, त्यासाठी पर्याय काय, हा विचार सकारात्मक आहे.
११. पैशांची देवाणघेवाण ठप्प झाल्याने कुणीही मदत करण्याच्या मानसिकतेमध्ये नाही. म्हणून नाराज न होता आहे ती वस्तुस्थिती मान्य केली तर अपेक्षाभंग होणार नाही.

मानसिक आरोग्य तंदुरस्त ठेवणे म्हणजे स्वतःची सर्वांगीण काळजी घेणे होय. शरीर, मन, बुध्दी, कुटुंब हा चौकोन महत्वाचा असून तुम्ही कुटुंप्रमुखाची भूमिका कशी सक्षमतेने लढवता यावर आपली पुढची पिढी लक्ष ठेऊन शिकत असते. Covid १९ ने आपल्याला काही शिकण्यासाठी वेळ दिलाय म्हणून तो सत्कारणी लाऊन अशी वेळ भविष्यात कधी आली तर त्याला तोंड देण्यासाठी डावपेच आताच आखून ठेवले तर जीत आपलीच असे समजा.

(कुणालाही अशा परिस्थितीत बोलण्यासाठी विश्वासू सहकारी नसेल तर मित्र समजून बोलू शकता. कदाचित तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल.)

© श्रीकांत कुलांगे
९८९०४२०२०९

1 thought on “मानसिक स्वास्थ आणि चिंता”

  1. Shashikant Khude

    sklearninghub, good afternoon.
    This is one the motivational + affirmative preach.
    Thanks a lot.
    Jai ShriKrishna.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *