कथाकथन, स्मृती आणि आरोग्य

काही व्यक्ती अशा आहेत की त्यांच्या आयुष्यातील घडलेल्या घटना ते कथेच्या स्वरूपात सांगत असतात. आणि त्यांच्या या कथा कधी संपूच नये असे वाटते. माझा एक ७० वर्षीय हॉलंडचा मित्र बिल नेहमी त्याचे किस्से इतके सुंदर सांगायचा की ऐकून आम्ही त्या घटना प्रत्यक्षात समोर पाहतोय याची जाणीव व्हायची. मग आपल्याला आश्चर्य वाटते की ही अशी कला आपल्यात का नाही. काय कारणे असावीत ज्यामुळे आपल्याला असे किस्से आठवत नाहीत किंवा सांगता येत नाहीत?

१. आकलन न होणे किंवा लक्ष नसणे – ज्या गोष्टी आसपास घडतात त्यांचे नीट आकलन होत नाही किंवा लक्ष देत नाहीत.
२. दृष्टिकोन – घटनेचे नावीन्य जाणवत नाही. त्यामुळे कुणाला काही सांगण्यासारख नसते असे वाटणे.
३. अभिव्यक्तीचा अभाव -प्रकट करायची सवय नसणे. स्वतःचं एक्स्प्रेशन दाखवता न येणे.
४. आत्मविश्वास नसणे -एखादी घटना सांगण्यासाठी लागणारा आत्मविश्वास गायब होतो.
५. गांभीर्य नसणे. पाहिलेल्या गोष्टींचे आपल्याला काही वाटत नाही की ही माहिती कुठे कामाला येईल.
६. अज्ञान – कथाकथन एक कला आहे पण कशी आत्मसात करायची ते माहीत नसणे.

कथाकथन दिसताना जरी साधी गोष्ट असली तरी ती आपल्या मानसिकता व स्मृती लक्षात येते. मग ती आत्मसात कशी करावी यासाठी मानसिकता बदलावी लागते व काही गोष्ट शिकाव्या लागतात.

१. उत्साह – कथा चांगल्या प्रतीची सांगण्यासाठी उर्जा, उत्साह लागतो. माहिती शुल्लक वाटत असेल तरी पूर्ण उत्साहाने सांगणे.
२. हास्य व हावभाव – कथा सांगताना चेहऱ्यावर हास्य हवं. त्यामुळे वेगवेगळे शब्द उच्चार व निवड, हावभाव व ते मनोरंजक बनवायला मदत करते.
३. सराव – बोलता बोलता कथा किंवा किस्से सांगण्याचा सराव केला तर तोच आपला स्वभाव बनून जातो. आत्मविश्वास येतो.
४. निवडकपणा -सांकथा, किस्से लांबलचक नसावेत. थोडक्यात आणि अर्थपूर्ण पण विषयाला धरून असावेत.
५. वेगवेगळे तपशील वापरणे – भूतकाळातील प्रसंग आठवताना त्याकाळातील कपडे, वस्तू, जागा, बोलीभाषा, ती काळानुरूप हवी. ज्यानेकरून ऐकणाऱ्याची उत्कंठा शिगेला पोहोचते. वाचन व पाहून बराच तपशील मिळतो.
६ . भावना व्यक्त करणे- वस्तुस्थितीबरोबर भावनांचा वापर केल्यास कथा मनोरंजक बनते.
७. निरिक्षणशक्ती- असलेले पात्र अजून विकसित केल्यास फायदा होतो. या ठिकाणी निरीक्षण चांगले असल्यास प्रत्येक पात्र विचार कसे करते किंवा कसे बोलते याचा वापर कथा सांगताना होतो.
८. संभाषणशैली- काय सांगतोय यापेक्षा कसे सांगतोय हे महत्वाचे.
९.नेमकेपणा- चालता बोलता आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण केले पाहिजे. असे का घडते, त्यात काय नवीन ते पाहिले पाहिजे.

ही कला आपल्याला आयुष्यात नेहमी कुठेही कामास येते जसे की,
१. आपल्याला बरेच वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक फायदे.
२. मानसिक तंदुरुस्तीसाठी, चांगल्या नात्यांसाठी, सुदृढ मेंदूसाठी कला आत्मसात करणे गरजेचे.
३. काम करताना, शिकताना, सभेत बोलताना, मित्रांशी चर्चा करताना असे लहान लहान किस्से तुमच्या बोलण्यात असतील तर तुम्हाला पटकन आपलेसे केले जाते.
४. तुमच्या सकारात्मक स्वभावाने वातावरण चांगले राहते. आणि महत्वाचे म्हणजे स्वतःला चांगले वाटते.
५. मानसिक आजार दूर करण्यासाठी चांगली मदत होते.
६. मेंदू तरूण व सक्रिय ठेवण्यास मदत होते.

खरंच आयुष्य खूप सुंदर आहे असे माझा मित्र गणेश शिंदे नेहमी म्हणत असतो. सकारात्मकता अशी ओसंडून वाहणाऱ्या नद्या सारखी असावी म्हणजे जिथून जाईल तिथे सोने पिकविल. चला काहीतरी नवीन शिकून किंवा आहे त्या कौशल्याचा वापर करून जीवनात रंगत आणुया.

© श्रीकांत कुलांगे
९८९०४२०२०९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *