वर्तमान आणि आपण

काल चार कॉलर फक्त याच बाबतीत बोलत होते – भविष्यकाळातील नियोजनाचेच विचार डोक्यात चालू असतात, भूतकाळातील आठवणी- विशेषत: वाईट-अजूनही पिच्छा पुरवत आहेत, दैनंदिन आयुष्यात अनेक वस्तू कोठे ठेवल्या, याबाबत विस्मरण होत आहे, एखादं काम सुरू असतानाही विचार वेगळेच असतात, आज, आता, इथे, याक्षणी कोणत्या भावना, कोणते विचार सुरू असतात, याबाबत जाणीव नसणं, प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी? ‘‘वर्तमानामध्ये जगण्याचं महत्त्व प्रत्येकाला माहीत आहे; पण ‘कसं?’ हीच मोठी समस्या आहे.’’ चला तर मग, वर्तमानामध्ये जगणं शिकूया.

१. आपण आता काय करतोय? कृती एक चालू असली तरी डोक्यात जेव्हा विचार भूतकाळाचे किंवा भविष्यकाळाचे असतात तेव्हा आता जगत असणारा क्षण मात्र हातातून निसटून जातो अन् जाणवतं.

२. वर्तमानात योग्य कृती केली तर भविष्यात आपोआपच योग्य रिझल्ट्स मिळतात.

३. भूतकाळातील आठवणींशी संबंधित वस्तू काढून मुक्त होणे, ज्याने करून आपल्याला वर्तमानकाळात जीवन जगण्याची उभारी देते.

४. प्रत्येक दिवस अंतहीन शक्यतांनी परिपूर्ण आहे! हसून प्रारंभ करा.

५. आजच्या क्षणांचे पूर्ण कौतुक करा. दृष्टी, आवाज, वास, भावना आपल्या सभोतालच्या वातावरणात आहेत, त्यांचा आनंद आजच लुटला पाहिजे.

६. भूतकाळातील जखमांना गोंजरून जगणे योग्य नव्हे. पुढे चालणे क्रमप्राप्त.

७. आपल्या सध्याच्या कामाचे स्वरूप नावडते असले तरी आवडून घेऊन पुढे चालणे योग्य. नंतर नवीन जॉब शोधू शकतो.

८. मोठे स्वप्न पहा. भविष्यासाठी उद्दिष्टे आणि योजना निश्चित करा. परंतु उद्याचे कठोर स्वप्ने साकार करण्याच्या दृष्टीने आज कठोर परिश्रम करणे ही पहिली पायरी आहे.

९. जर आजही तुम्ही काल बाबत बोलत असाल तर तुम्ही आज जगत नाही आहात. काल पासून शिकून पुढे चालणे यातच शहाणपण.

१०. उद्या जो येणार तो आपल्या आजच्या कर्तव्यावर. कशाला उगीच उद्याची चिंता.

११. आजचे जग इतक्या वेगाने बदलत आहे की कालची बहुतेक सोल्यूशन्स यापुढे योग्य नाहीत. नवीन उत्तरं आजच आपण शोधायची.

१२. आपल्या आयुष्यातील व्यसनं आपल्याला ओलीस ठेवतात. सोडल्यास नक्कीच फायदा.

सध्याच्या क्षणाचा अगोदर स्वीकार करा, मग कृती करा. त्याला नेहमीच सहकार्य करा. त्याला शत्रू नव्हे, मित्र बनवा असे अनेक संशोधक, विचारवंत सांगतात. नवनिर्मिती, श्वासाची जाणीव, नवनव्या अनुभवांची उत्सुकता, नवीन मित्र मंडळी, कुटुंबीय यांच्यात रमून आजचा दिवस घालवल्यास त्यातून मिळणारा आनंद अत्यंत महत्वाचा.

बघा जमतंय का, आज जगायला ला? नाहीतर जुनी म्हण आहे..”घोंगडी जास्त वेळ भिजून राहिली की वास यायला लागतो.”

© श्रीकांत कुलांगे
9890420209

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *