आनंदाची गुरुकिल्ली

आनंद कसा शोधावा हा प्रश्न एखाद्या प्रौढ व्यक्तीने विचारावा हे काही मला रुचले नाही. कारण त्यांनी आयुष्य जगलेले होते. तरीही आनंदी जीवन त्यांना अजुन समजले नव्हते का? असं त्यांना का वाटले म्हणून आम्ही चर्चा केली. 

१. मागील नकारात्मक अनुभव.

२. जुन्या आठवणी ज्या पुन्हा पुन्हा जाग्या होणे.

३. शारीरिक आणि मानसिक आजार.

४. विसरभोळेपणा त्रागा निर्माण करतो.

५. प्रिय मित्र किंवा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू.

६. घरातील त्रासदायक वातावरण.

७. मुलांनी दूर राहणं.

८. शरीरामध्ये होणारे बदल. वृद्धावस्थेमुळे सुरकुत्या, कमीपणा वाटणं.

९. दुसऱ्या आनंदी व्यक्तींकडे पाहून हेवा वाटणं. सहन न होणे.

 

अशा गोष्टी जरी व्यक्तिपरत्वे आणि उत्पन्न, आरोग्य, कौटुंबिक जीवन यावर आधारित असले तरी संशोधन सांगते की जसजसे आपण वृढावस्थेकडे जातो, आनंदी जीवन जगणे वाढत जाते व त्याला एकमेव कारण म्हणजे आपली वृत्ती (attitude) बदलणे. यात सर्व काही आले. अशा व्यक्तींचा जगभरात, असे सकारात्मक बदल कशामुळे शक्य झाले, यावर सर्व्हे केला गेला. आणि अप्रतिम सत्य समोर आले. आनंदी राहण्यास उपयुक्त अशा काही गोष्टी त्यातून दिसल्या.

 

१. जेनेटिक, आई वडिलांचे लहानपणापासून चे संस्कार व त्यांचे सहज जीवनाची अनुभूती. त्यांना नेहमी आनंदी पाहिले व हेच ते मुलांच्या मनात बसले.

२. आयुष्य परिपूर्ण नसते याबाबत खात्री. आयुष्यातील सर्वच गोष्टी किंवा घटना आपल्या मनासारख्या, आपल्याला हव्या तशाच घडणार नाहीत याची जाणीव.

३. मनात आकस किंवा अढी न ठेवता पुढे चालत राहणे. विसरभोळेपणाचा फायदा..

४. आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर माया आणि प्रेम करणं, त्यांच्या चांगल्या कार्याचे मोकळेपणाने कौतुक करणं, आपली मैत्री, भावना आणि प्रामाणिकपणा त्यांना जाणवू देणं ही वृत्ती निर्माण केल्याने आनंदी वातावरण निर्मिती होते.

५. कुठल्यातरी कामात व्यस्त ठेवणे. आपल्याला मनापासून जे करावेसे वाटते ते करा. घरच्यांनी साथ देणे गरजेचे.

६. आपले शरीर निरोगी असणे हा आनंदाचा मूलभूत पाया आहे. निरोगी शरीरातूनच निरोगी मनाची निर्मिती होत असते. आपले शरीर आरोग्यसंपन्न राहील याची काळजी घ्या.

७. आपल्याला अनेक गोष्टी करायच्या असतात; परंतु उपलब्ध साधनसामग्री, संधी आणि कार्यक्षमता यामुळे सर्वच गोष्टी आपण करू शकत नाही. म्हणून नियोजन केल्यास अतिउत्तम.

८. घरातील वातावरण पवित्र बनतं जेंव्हा आपले मन पवित्र असते, याची जाणीव.

९. मित्र बनवणे व मदत करणे हे एक आनंदी जीवनाचे संतुलन आणि रहस्य.

१०. विज्ञानाच्या मदतीने आयुष्य सुखकर करता येणे शक्य आहे.

आनंदी किंवा दु:खी राहणे हा प्रत्येकाचा सर्वस्वी निर्णय असतो. आनंदी किंवा दु:खी होण्याची निवड आपण करू शकतो. आनंद हा संसर्गजन्य आहे. आपण आनंदी झाल्यास आपल्या सभोवतालचे वातावरणदेखील आनंदी राहते. आनंदामुळे आयुष्य अधिक अर्थपूर्ण होते. सुख हे बाहेरील वातावरणावर, व्यक्ती वा वस्तूवर अवलंबून असते, तर आनंद हा आतून पाझरत असतो.

‘‘आपले आयुष्य आपण जसे घडवतो तसे ते घडत असते. आपणच आपले भाग्यविधाते आहोत’’, हे वामनराव पै यांचे नेहमी कानावर पडणारे वाक्य खरंच किती समर्पक आहे.

 

©श्रीकांत कुलांगे

9890420209

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *