संतुलन निर्मिती

 

राग, निराशा, भीती आणि इतर “नकारात्मक भावना” हे सर्व मानवी अनुभवाचे भाग आहेत. हे सर्व ताणतणावास कारणीभूत ठरू शकतात ज्या आपण टाळल्या पाहिजेत. प्रत्यक्षात नकारार्थी भावना काही अंशी चांगल्या असतात. त्यांना जर आपण व्यवस्थित हाताळले तर त्या प्रमाणाबाहेर न जाता आटोक्यात राहतात. या भावना फायदेशीर आहेत कारण त्या आम्हाला संदेश देत असतात जसे की,

 

१. क्रोध आणि चिंता, असे दाखवून देतात की काहीतरी बदलण्याची गरज आहे आणि कदाचित आपल्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

२. भीती सांगते की आपल्यात सुरक्षतेची उंची वाढवावी लागेल. मन भक्कम करा.

३. असंतोष आपल्याला नात्यात काहीतरी बदलण्यासाठी प्रेरित करतो. जे बदल आपले नाते आजुन घट्ट करते.

४. निराशा बोलते की नैसर्गिक बदल करत चला.

५. उदासीनता सांगते की तुम्ही जग नाही पाहिले तर ते पाहा. शेजारी डोकवा म्हणजे समजेल की देवाने खुप काही दुसऱ्या गोष्टी दिल्यात त्या इतरांना नाहीत.

 

मुळात, काहीतरी बदलण्याची आवश्यकता आहे आणि आपल्याला तो बदल घडवून आणण्यास प्रवृत्त करून, सतर्क करण्यासाठी नकारात्मक भावना आहेत. मुळात आपण या गोष्टींना झिडकरण्याचा, त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. नेहमी सकारात्मक राहुन सुध्दा त्रास होतो. कुठलीही गोष्ट प्रमाणानुसार व्हायला हवी. नकारात्मक भावना व्यवस्थापित करण्यासाठी सर्वोत्तम रणनीती हवी.

 

१. शिकवा आणि शिका. आत्म-जागरूकता स्वीकारणे. आपल्या शरीराचे, मनाचे वैयक्तिक ज्ञान वाढवून तणावाचे नियंत्रण करू शकतो. प्रत्येक भावनेला प्रतिसाद कसा द्यायचा ते शिकणे जरुरी.

२. जे काही येते त्याबद्दल स्वीकारण्यासाठी आपल्यात मोकळेपणा आणि कुतूहल निर्माण होणे इष्ट. त्यामुळे काहीतरी घडतंय आणि त्याला कसं हाताळायचे ते ठरवणे सोपे जाते.

३. स्वीकारा आणि मैत्री करा. त्यामुळे प्रतिकार करणे सोपे जाते. त्रास कमी जाणवतो.

४. पुन्हा मूल्यमापन आणि री-फ्रेम. यामुळे आपल्या त्रुटी काय होत्या याचे विश्लेषण करून पुढे जाणे शक्य.

५. सामाजिक समर्थन. समाजात काही भावना व्यक्त करून त्यांना धोक्याची सूचना देणे गरजेचे असते. त्यामुळे ते तयारीत राहू शकतात.

६. निरीक्षण करून, अलिप्त भावनेने एखाद्या अप्रिय गोष्टींना पाहिल्यास, विरोधाभास कमी होऊ शकतो.

७. शारीरिक आणि वर्तणुकीत बदल: विश्रांती, श्वास घेण्याचे व्यायाम आणि स्वत: ची काळजी यावर लक्ष केंद्रित करणे.

 

अप्रिय गोष्ट घडणे क्रमप्राप्त असते परंतु आपली दूरदृष्टी व निरीक्षण शक्ती शाबूत असेल तर एकाचवेळी येणाऱ्या असंख्य संकटाना सामोरे जाण्याची हिंमत नैसर्गिकरित्या येत असते. फक्त त्याची सवय अगदी सुरूवातीपासून आपण लावणे गरजेचं आहे. त्यासाठी घरात, ऑफिस मध्ये, कारखाने, गृहस्थी, अशा अनेक ठिकाणी सद्सद्विवेक बुध्दीचा वापर योग्य प्रकारे केल्यास अनेक नकारार्थी भावना तयार होणार नाहीत. अशामुळे सकारात्मक व नकारात्मक गोष्टींचे संतुलन होण्यास मदत होईल. बघा जमतंय का???

 

©श्रीकांत कुलांगे

9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *