काम करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते. औद्योगिक असो कि घरकाम, आपली नैतिकता तिथे दिसून येते. आपण कसे काम करतो त्यावर आपले व्यक्तिमत्व दिसून येते. आपले व्यक्तिमत्व चांगले असेल तर काम तुम्ही अगदी काटेकोरपणे, कौशल्यतेने, वेळ वाचवणारी प्रणाली, नाविन्याची कास अशा अनेक गोष्टी काम करताना दिसून येतात. मग सांगा, आपली काम करण्याची पद्धती खरेच नैतिकतेला धरून आहे का? थोडा विचार केला की उत्तर मिळेल. खूप कमी लोकांना काम केल्याचा आनंद मिळतो. हा फंडा, घरी दारी, ऑफिस, शाळा, कॉलेज, विद्यार्थी, शिक्षक, मालक किंवा कामगार सर्वांना लागू होतो.
आपली कामाप्रती नैतिकता (work ethics) अतिशय महत्त्वाची असते. अशा नैतिकतेचा फायदा आपल्याला होतो. जर तुमची नैतिकता चांगली असेल तर तुमच्याबाबत काही चांगल्या बाबी इतरांच्या समोर येतात. जशा की,
१. आपले स्वरूप: योग्य पोशाख, सौंदर्यप्रसाधना – स्वच्छता आणि शिष्टाचार दर्शविते.
२. उपस्थिती: कामावर हजेरी – वेळेवर येणे आणि निघणे, नियोजित सुट्टीची ची कल्पना, आणि असाइनमेंट त्वरित करणे.
३. आपली वृत्ती: एक सकारात्मक दृष्टीकोन दर्शवितो, आत्मविश्वास प्रकट होतो, आदर वाढतो.
४. आपले चरित्र – निष्ठा, प्रामाणिकपणा, विश्वासार्हता, पुढाकार आणि आत्म-नियंत्रण प्रदर्शित करते.
५. आपापसातील संवाद आणि इतरांप्रती आदर: सर्वांशी व्यवस्थित व्यवहार, समजदारी आणि सहनशक्ती दिसून येते. योग्य शब्दांचा वापर आणि समोरच्याच ऐकणे आपली परिपक्वता दाखवते.
६. सर्वाना सहकार्य – आपल्यातील नेतृत्व कौशल्य दाखवते, टीका, विरोधाभास आणि तणाव व्यवस्थित हाताळते; सहकाऱ्यांबरोबर योग्य संबंध कायम ठेवणे आणि चेन ऑफ कमांडचे अनुसरण करणे.
७. संस्थात्मक कौशल्य: मॅनेजमेंट स्किल, कशाला प्राधान्य देणे आणि बदलाशी संबंधित व्यवहारांमध्ये कौशल्य दर्शवते.
८. उत्पादकता: काम करताना सुरक्षा महत्वाची, सूचनांचे पालन करणे.
९. सांघिक कार्य – इतरांच्या अधिकाराचा सन्मान, सगळ्यांवर विश्वास, ग्राहक सेवा वृत्ती आणि सतत शिकणे व शिकवण्याचा प्रयत्न करणे.
आपण स्वतः आपल्या कामाची पत कशी आहे ते समजून घेऊ शकता. वरील क्वालिटी तुमच्यात आहेत का? नसतील तर त्या डेव्हलप करायला वेळ लागणार नाही. फक्त आणि फक्त तुमचा अभ्यास, त्याचा उपयोग, तुमची विल पावर आणि परिश्रम. बस एवढेच खूप झालं. त्याचा फायदा तुम्हाला आयुष्यात खूप चांगला दिसून येईल. परिश्रम कसे घ्यायचे ते ठरवा किंवा प्रयत्न करूनही होत नसेल तर यामध्ये काय अडचणी आहेत ते पहा. अशा अडचणींना आपल्याला तोंड द्यावे लागते. धडपड करा पण शिकाच… कारण त्याशिवाय जगणं, जगणं नाही.
© श्रीकांत कुलांगे
9890420209
वा खूपच छान