क्षमाभाव

क्षमा करण्याचा सराव ही आध्यात्मिक विकासात सर्वोच्च स्वयंशिस्त आहे. क्षमाशीलतेच्या नियमाप्रमाणे तुम्हाला ज्या कोणी कोणत्याही प्रकारे दुखवलं असेल, त्यांना तुम्ही मोकळेपणाने क्षमा करू शकत असाल, तर त्या पातळीपर्यंत तुम्ही मानसिक आणि भावनिकदृष्ट्या निरोगी असता.” प्रत्येक व्यक्तीने – तुमच्यासह – इतरांकडून विनाशक टीका, नकारार्थी शेरे, दुष्टपणा, उद्धटपणा, विश्वासघात आणि अप्रमाणिकपणा ह्यांचा वर्षानुवर्षं अनुभव घेतला असेल. हे प्रसंग दुर्दैवी असतात, पण ते न टाळता येण्यासारखे आणि आपण मनुष्यजातीत जन्मल्याचा भाग म्हणून अपरिहार्य असतात. हे प्रश्न, अडचणी आणि व्यस्त समाजात राहायचा त्रास वाचवायचा असेल, तर एका गुहेतच जाऊन राहायला पाहिजे. नकारात्मक अनुभव आल्यानंतर तुम्ही विचारण्याची आणि उत्तर देण्याची गरज असलेला एकच प्रश्न म्हणजे, “ह्या प्रसंगातून मी बाहेर पडायला आणि माझं आयुष्य जगायला – किती काळ जावा लागेल?” हा एक निर्णय असा आहे जो फक्त तुम्हीच घेऊ शकता. तुम्हाला जर खरोखरच आनंदी व्हायचं असेल, तर सर्वात महत्त्वाच्या निर्णयांपैकी तो एक आहे. अधिक म्हणजे, तुमच्या मानसिक आणि आध्यात्मिक शिस्तीची ती एक खरीखुरी परीक्षा आहे.
प्रत्येक व्यक्तीला एक ‘विसरण्याचं वळण’ असतं किंवा ज्याला बहुतेक वेळा ‘क्षमा करण्याचं वळण’ म्हणण्यात येतं. तुम्ही मानसिक आणि भावनिकदृष्ट्या किती निरोगी आहात, हे निश्चित करणं, तसंच, तुम्ही एखादा नकारात्मक अनुभव किती लवकर विसरता आणि किती लवकर विसरता आणि किती लवकर त्या व्यक्तीला क्षमा करता, ह्याचं मोजमाप त्या वळणावर होतं.

हे वळण सपाट असू शकतं किंवा उतरतं असू शकतं. तुमचं क्षमा करण्याचं वळण एक तर सपाट असेल, तर त्याचा अर्थ होतो तुम्ही दीर्घकाळपर्यंत रागावलेले राहाणं चालू ठेवता, कधी कधी वर्षानुवर्षं किंवा दशकं देखील, त्याच पातळीवर, जेव्हा ती घटना घडली होती.

असंतुष्ट लोकांबरोबर काम करणारा प्रत्येक मानसशास्त्रज्ञ आणि मनोविकारतज्ज्ञ ह्यांना काम असतं, कारण त्यांच्या रुग्णांची क्षमा करण्याची वळणं सपाट असतात. त्यांचं उपचारांच्या वेळी प्राथमिक संभाषण, हे भूतकाळात त्यांचाबरोबर कोण कसं वागलं किंवा वागलं नाही ह्याबद्दल बोलणं हे असतं – आणि आजच्या घडीला त्या व्यक्तीला अजूनही त्याबद्दल कसं दुःख वाटतं, ह्याबद्दल असतं.

क्षमाशीलता ही पूर्णपणे स्वार्थी कृती आहे. दुसऱ्या व्यक्तीशी क्षमाशीलतेचं काहीही देणंघेणं नसतं. तुम्ही भावनिकदृष्ट्या मुक्त व्हावं, म्हणजे तुमच्या उरावर ओझं घेऊन तुम्हाला वावरावं लागणार नाही, ह्यासाठी तुम्ही इतरांना क्षमा करता.

तुमचं मन फार सुंदर आहे. तुम्ही अविश्वसनीयरित्या बुद्धिमान आहात आणि तुम्हाला चांगली समज आहे. तुम्ही त्या मनाचा उपयोग आनंदी आणि प्रफुलित राहायला मदत करण्यासाठी करू शकता किंवा ते तुम्ही स्वत:च्या विरोधात वापरू शकता. उच्च पातळीवर तुम्ही तुमचं मन इतरांना क्षमा करण्यासाठी कारणं शोधण्यासाठी वापरू शकता. कोळसा उगाळत रहाण्यापेक्षा आणि भूतकाळात घडून गेलेल्या प्रसंगाची चिरफाड करत बसण्यापेक्षा, समर्थन शोधण्यापेक्षा, वागण्याला पुष्टी देणारी कारणं शोधण्यापेक्षा आणि स्वत:च्या अंगावर काहीतरी ओढवून घेण्यापेक्षा, जबाबदारी स्वीकारण्यासाठी आणि नकारात्मक परिस्थिती सोडून देण्यासाठी, तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करणं हितावह.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *