तिरस्कार स्वतःचा

“मी स्वतःचा तिरस्कार करतो” असा विचार माझ्या मनात वारंवार येतो आणि माझी घुसमट होते असं म्हणत एक व्यक्ती समुपदेशन साठी आली होती. अशा विचारांच्या अनेक व्यक्ती आपल्याला रोज भेटत असतात. जर आपण आत्म-द्वेषाच्या भावनांनी भरलेले असाल, तर ते किती निराशाजनक असू शकेल हे आपल्याला माहीत आहेच. आपण आयुष्यात काय मिळवू शकतो हे केवळ आत्म-द्वेष मर्यादित करत नाही तर चिंता आणि नैराश्य यासारख्या मानसिक आरोग्याची स्थिती देखील बिघडवते.

काही व्यक्ती अशा ही आहेत ज्या स्वतःचा तिरस्कार करीत नाही, पण स्वतः वर प्रेम पण करत नाहीत. “मी एकटाच आहे, माझ्या मागे, सोबत कोणी नाही” ही सतत जाणीव होत राहते व त्यामुळे नैराश्य येतं व भिती वाटत राहते.

आत्म-द्वेषाच्या भावनांवर मात करण्यासाठी, याची लक्षणे ओळखणे, मूळ कारणे आणि ट्रिगर समजून घेणे, आपल्या जीवनावर त्याचा प्रभाव लक्षात घेणे आणि शेवटी, स्वतःच्या भावनांवर मात करण्यासाठी एक योजना तयार करणे महत्वाचे आहे.

स्वतःचा तिरस्कार करण्यासंबंधी लक्षणं ओळखणे शक्य आहे, जसे की;

१. आपण जीवनाची फक्त एकच बाजू बघतो, एकतर चांगली किंवा वाईट. यामध्ये काही नाही.

२. तुमचा दिवस चांगला असला तरीही, तुम्ही त्याऐवजी घडलेल्या वाईट गोष्टींवर किंवा काय चूक झाली यावर लक्ष केंद्रित करण्याचा कल असतो.

३. तुम्ही तुमच्या भावनांना खरं मानता. जर तुमच्या लक्षात आले की तुम्हाला वाईट वाटत आहे किंवा अपयश येत आहे, तर तुम्ही असे गृहीत धरता की तुम्ही वाईट आहात.

४. आत्मविश्वासाचा अभाव. इतरांशी तुलना करून आत्मविश्वास गमावतो.

५. छोट्या गोष्टी असो व मोठ्या, बऱ्याचदा निर्णय घेताना इतरांची मदत लागते.

६. प्रशंसा स्वीकारू शकत नाही. प्रशंसा करणाऱ्या व्यक्तीकडे संशयाने बघितले जाते.

७. स्वतःला वेगळे किंवा एकटं वाटतं राहणं किंवा ठेवणं. असं वाटतं की लोकांना मी आवडत नाही.

८. वैयक्तिकरित्या टीका घेणे:

९. अनेकदा मत्सर वाटणे.

१०. सकारात्मक संबंधांची भीती वाटणे.

११. मोठी स्वप्ने बघायला घाबरणे.

१२. निंदक दृष्टीकोन.

मग आपण आपला तिरस्कार का करतो? आपल्याला या प्रश्नांची उत्तरे कदाचित लगेच नाही मिळणार. त्यामुळे विचार करण्यासाठी थोडा वेळ घेणे महत्त्वाचे आहे. खाली विचारात घेण्यासाठी काही संभाव्य कारणे दिलेली आहेत:

१. स्वतःमधील नकारात्मक समीक्षा किंवा भूमिका.

२. बालपणीचे अनुभव. घरातील तंग वातावरणामुळे लहानपणी झाले आघात कारणीभूत ठरू शकतात.

३. वाईट संबंध. काही हितसंबधांमध्ये वाईट अनुभव आलेले असतात.

४. गुंडगिरी मुळे. आपण शाळेत, कामावर किंवा इतर नातेसंबंधात गुंडगिरीला बळी पडतो.

५. अत्यंत क्लेशकारक घटना घडल्या असतील तर.

६. सभोतालच्या परिस्थिती मुळे आपल्याला पुन्हा पुन्हा नकोशा त्या आठवणींना उजाळा मिळतो तेंव्हा.

७. नकारात्मक स्व-संकल्पना. जेव्हा आपल्या मनात आत्म-द्वेषाचे विचार येतात, तेव्हा लहान समस्या, मोठ्या समस्यांमध्ये बदलल्या जाऊ शकतात.

८. मानसिक आरोग्य स्थिती. आत्म-द्वेषाची भावना ही नैराश्य किंवा चिंता यासारख्या मानसिक आरोग्य स्थितीचा परिणाम असू शकतो.

आत्म-द्वेषाचे परिणाम अनेक आहेत. जेव्हा आपले विचार सतत आत्म-द्वेषाला बळकटी देतात तेव्हा कोणते परिणाम आपल्यावर होऊ शकतात हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. खाली काही संभाव्य परिणाम आहेत:

१. आपले ध्येय साध्य करण्यात बाधा निर्माण होऊ शकते .

२. अमली पदार्थांच्या नादी लागू शकता.

३. अन्नाचं अतिसेवन किंवा खूप कमी खाणं, अती झोप इत्यादी.

४. तुमचे चांगले मित्र जाऊन नकारात्मक मित्र किंवा त्या विचारसरणीचे नवीन मित्र जवळ करण्याचा प्रयत्न. जे तुमच्या या स्वभावाचा गैरफायदा घेऊ शकतात.

५. तुम्हाला कमी आत्मविश्वास आणि कमी आत्मसन्मानाचा सामना करावा लागू शकतो.

६. निर्णय घेण्यात आत्मविश्वासाचा अभाव.

७. तुम्ही दैनंदिन समस्यांबद्दल किंवा तुमच्या भविष्याबद्दल जास्त काळजी करू शकता.

८. स्वतःमधील चांगल्या गोष्टींचा विसर पडणे.

खरंच का आयुष्य इतके खराब आहे? काही गोष्टी परमेश्वर कमी जास्त देतो ते पदरात घेऊन पुढे मार्गस्थ होण्यात शहाणपण. स्वतःला दोष देण्याने कुटुंबात, कामाच्या ठिकाणी, मित्रांमध्ये आपला मान राहत नाही, विश्वास राहत नाही. यातून बाहेर पडायचं का? तर मग हे कराच.

१. सर्वात पहिलं, नीट व्हायचं किंवा या विचारातून बाहेर पडायचं हे नक्की ठरविणे.

२. समुपदेशन घेणं. त्यांनी सांगितलेल्या सूचना तंतोतंत पाळणे. ते तुमच्या अशा विचारांचे मूळ शोधण्यासाठी मदत करतील.

३. व्यक्तिमत्व विकास करून घेणं.

४. हळूहळू व्यायाम, योगा करणे.

५. तुम्हाला मोटीव्हेट करणाऱ्यांबरोबर राहणं.

६. सोशल मीडियाचा कमी वापर.

७. जर्नल लिहा.

अनेक पर्याय उपलब्ध आहेत फक्त बदलण्याची इच्छा हवी. एकदा का मेंदूला चांगल्या सूचना घ्यायची सवय जडली की आपोआप विचार बदलायला लागतात. दिवसाच्या शेवटी, “मी स्वतःचा तिरस्कार करतो” यापेक्षा “मी उद्या अधिक चांगले कसे करेन” हे शिकणे आपले विचार हवेत. त्यासाठी कौशल्य आत्मसात करून त्यांचा वापर करून तर बघा.

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *