उद्याची काळजी आणि आपण

किती काळजी करणार उद्याची असं आपण एकमेकांना नेहमी म्हणत आज जगण्यासाठी प्रेरित करत असतो..काळजी, चिंता आणि शंका हे आपल्या जीवनाचे अविभाज्य घटक बनले आहेत. आपल्यावर त्यांचा परिणाम होत असतो. जेंव्हा कधीतरी जाणवणारी काळजी जर वाढली आणि वारंवार होऊ लागली तर ही चिंताजनक बाब आहे. मागील दोन चार दिवसांमध्ये ज्यांच्याशी बोलणे झालेय त्यांना उद्याची काळजी अधिक प्रमाणात होती. काय होत जेंव्हा आपल्या काळज्या अधिक प्रमाणात वर येतात?

१. कायम काळजी, चिंता, नकारात्मकता आणि नेहमी वाईट गोष्टींचा विचार हे आपल्याला भावनिक, मानसिक व शारीरिक हानी करत असतात.
२. मनाची एकाग्रता भंग पावते, डोकेदुखी, पोटाचे आजार वाढतात.
३. काही व्यक्ती नशेच्या आहारी जातात.
४. टेन्शन, नर्व्हसनेस, नैराश्य, फ्रेश ना वाटणं.

असे का होते की आपण काळजी करणं का थांबवत नाही?
१. स्वभाव गुणधर्म.
२. आसपासचं वातावरण आणि मानसिक आजारपण.
३. दुसऱ्यांचे ऐकून विश्वास ठेवायची सवय.
४. सोशल मीडियाचा अतिवापर, त्याबाबत अनावश्यक चर्चा.
५. आर्थिक टंचाई व कौटुंबिक / सामाजिक समस्या.

आपल्याला येणाऱ्या अडचणी बऱ्याचदा थांबवू शकत नाही. पण त्यातून थोडावेळ मेंदूला आणि मनाला भरकटू न देता, आपण आजच्या घडामोडीचा आनंद का घेऊ नये. आपण काही गोष्टी करू शकतो ज्याने करून तात्पुरती मलमपट्टी किंवा कायमस्वरूपी उपाय होऊ शकतो.

१. ज्या काळज्या आपल्याला जाणवतात, त्या लिहून काढणे. त्याचे विश्लेषण करून मूळ शोधता येते.
२. काळजी लिस्ट एकदा बनली की त्यावर आपण काय करू शकतो याबाबत घरात, मित्रांबरोबर चर्चा करू शकतो. लहान गोष्टी दुर्लक्षित कराव्यात.
३. स्वतःवरील विश्वास वाढवून विचारांचे व्यवस्थापन नीट करायचं. हसत राहिल्याने चांगला परिणाम होतो.
४. शक्यतो सोशल मीडियाचा वापर चांगल्या गोष्टी साठी केला तर छान.
५. इतरांचे किती ऐकायचे किंवा गॉसिपिंग वर किती विश्वास ठेवायचा यावर कंट्रोल हवा.
६. आपल्या तर्कांना काही पुरावा पाहिजे तो शोधा आणि मगच विश्वास ठेवला तर चालेल.
७. उद्याची चिंता जास्त पारदर्शी असावी. कुठल्याही प्रकारची चुकीची चिंता घातक.
८. समुपदेशन, डोके शांत ठेवण्यासाठी मेडीटेशन माइंडफुलनेस मेडीटेशन सेंटर मध्ये.

सकारात्मतेने खूप विचार बदलतात. चांगले होईल असा विश्वास नेहमी बाळगला तरी आपण आपली मानसिकता बदलू शकतो.
चला तर मग आपण काळजी करण्यापेक्षा काळजी घेऊ या.

@श्रीकांत कुलांगे

९८९०४२०२०९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *