नकार पचवणं ही एक कला आहे असं एक मित्र सांगत होता. मग त्याने ते आम्हाला समजावुन सांगीतलं की खरंच किती सोपे आहे. अर्थात मला हे नवीन नव्हत, पठ्याला खूप नाकारून सुध्दा शेवटी लग्नासाठी पोरगी पटली होती. याला आयुष्यात बऱ्याचदा नकार पाचवावा लागला होता तरीसुद्धा त्याला आम्ही डिप्रेशन मध्ये गेलेलं पाहिलं नव्हतं.
कसं त्याने ते हॅण्डल केलं ही एक सहज प्रक्रिया होती.
१. नकाराला सकारात्मतेने पाहिले तर वाईट वाटत नाही. ती गोष्ट माझी नाही असे समजून चालले की दुखः होत नाही.
२. झालेल्या घटनेबाबत चर्चा करून मन मोकळे केले व हसले की नकार देणारे असतात असा गोड गैरसमज करून घेऊनशांत राहणे.
३. नकारातून योग्य धडा शिकून पुढे चालायचं.
४. नकार म्हणजे यशप्राप्ती ची शिडी असे समजले की चांगले.
५. आपल्याला कुणी दूर करत असेल तर कारणे शोधून, त्रुटी दूर करायला हरकत नाही. त्याचा होणारा परिणाम किती आहे त्याबाबत विश्लेषण करणे.
६. नकारामुळे होणाऱ्या मानसिक त्रासाला योग्य प्रकारे हाताळता येते. त्यामुळे मना विरूद्ध काही घडले तरी, दुसरे वाईट विचार मनात डोकावत नाहीत.
७. समुपदेशन घेतले तर मार्ग निघतील.
नकार आपल्याला कित्येकदा निराशेच्या खाईत लोटत असतो. त्यातून पुन्हा रुळावर आणण्यासाठी उपाय असतात. तसं पाहिलं तर नकाराचे प्रकार कुठले?
१. कौटुंबीक – कुटुंबातून विभक्ती, प्रेमाची माणसे दूर जाणे आयुष्यात कायमचा आघात करून जातात. एखाद्याला दूर करणं व होणारा मनःस्ताप न भरून येणारा असेल तर मानसिक आरोग्य धोक्यात येते.
२. सामाजिदृष्ट्या विलगिकरण – समाजातून बहिष्कृत होणे हे अपमानास्पद असते. यातून सूडाची भावना निर्माण होते किंवा अपमाना मूळे आत्महत्येचे विचार, निराशेची भावना निर्माण होते.
३. प्रेमातून नकार मिळाल्याने कित्येकांनी आत्महत्या केल्यात, काहींनी एकमेकांना शारीरिक इजा केल्या, काही मानसिक आजारातून बाहेर येत नाहीत.
४. मैत्रीतून नकार – हा आयुष्यात कधी न विसरणारा प्रकार असतो. कारण काय होते हे आपण शोधतो पण वेळ गेलेली असते.
५. कामावर मिळणारी नकारात्मक वागणुक – आत्मविश्वास कमी होतो.
म्हणुन मनस्तापाला चेकमेट द्यायचा असेल तर,
१ कुणालाही दोष न देता, चुकले असेल तर माफी मागणे किंवा इतरांचे चुकले असेल तर त्यांना माफ करून पुढे चालले तर सकारात्मकता यायला वेळ लागत नाही.
२. शांतपणे विचार करून ठरवा, कुणाला माफ करणार की कुणाची माफी मागणार.
3. कुणालाही न दुखावता व दुःखी न होता जगता येते. गौतम बुध्दांनी दिलेले विचार कामी येतात. आपण उदाहरणार्थ कोह समीतच्या सहलीवर जाऊ शकता आणि प्रत्येक गोष्टीबद्दल विचार करू शकता.
सर्व प्रकारच्या नकाराला आपण तोंड देत असतो. दुःखी, कष्टी बनतो, यातून सूडाची भावना बदलून आत्मविश्वास वाढेल असे प्रयत्न वेळेत केले तरच आयुष्य सुरळीत होते अन्यथा आपल्याला शारीरिक व मानसिकदृष्ट्या अपंग व्हायला वेळ लागत नाही.
©श्रीकांत कुलांगे
9890420209