सावधान कसं राहावं हा प्रश्न मला विचारला गेला. त्याबाबत चर्चा करताना आम्ही काही मुद्दे शोधले. प्रश्र्नकरत्याला एकच सांगितलं की तुमच्याबाबतीत अचानक काही घडत नाही हे लक्षात घ्या. सिनेमाच्या अगोदर दाखविल्याप्रमाणे तुम्हाला अगोदर सावधानतेचा इशारा मिळालेला असतो; कधी उघड खुणेच्या रूपाने, कधी इतरांच्या प्रतिक्रियेतून, कधी आतल्या आवाजाकडून तर कधी अंत:प्रेरणेने तुम्हाला संभाव्य संकटाचा इशारा मिळत असतो आणि नको असलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळही मिळत असतो. प्रत्येक वेळी तुम्हाला सावधानतेचा इशारा मिळत असतो.
सावधानतेचे काही बाह्य इशारे म्हणजे :
१. तो दारू पिऊन उशिरा घरी येणे चालूच ठेवतो.
२. अशिलाचा पहिला धनादेश वटत नाही.
३. तो त्याच्या सेक्रेटरी, कामगारांवर वर ओरडतो.
४. आपल्या आईने आपल्याला सावध केलेले असते.
५. तुमच्या मित्रांनी तुम्हाला सावध केलेले असते.
६. देहबोली, कार्य शैली.
७. स्वभावातील, बोलण्यातील बदल.
सावधानतेचे आंतरिक इशारे पण असतात.
१. ती आतली भावना.
२. तुमच्या मनात चुकचुकलेली संशयाची पाल.
३. तुमच्या मनात आलेला ओझरता विचार.
४. तुमची अंत:प्रेरणा.
५. तुम्हाला वाटलेली भीती.
६. मध्यरात्री तुम्हाला झोपेतून जागे करणारे स्वप्न.
संपूर्ण भाषाच आपल्याला पूर्वसूचना देत असते. जसे की.
१. अंदाज, संशय, सूचना.
२. भिंतीवरच लिहून ठेवलं आहे.
३. मला असे वाटते की…
४. मला ते आधीच दिसत होतं.
५. माझ्या ‘आतल्या आवाजा’ने मला सांगितले.
हे इशारे आपल्याला घटना + प्रतिसाद = परिणाम, या सूत्रातील प्रतिसाद बदलण्यासाठी पुरेसा वेळ देतात. परंतु, पुष्कळ लोक या धोक्याच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात. कारण त्या इशाऱ्यांप्रमाणे कृती करणे त्यांना नकोसे वाटते.
एखादी नियोजित योजना यशस्वी होणार नाही हे कळणारे तुमच्या स्टाफमध्ये जेव्हा तुम्ही एकटेच असता तेव्हा त्याबाबत बोलतात. स्टाफ मीटिंगमध्ये बोलणे सोपे नसते. ‘माझा तुमच्यावर विश्वास नाही.’ असे एखाद्याला सांगणे अवघड असते.
यातून बोध घेऊन काही गोष्टी केल्यास संभाव्य धोके टाळून आपले मानसिक स्वास्थ्य राखू शकतो..
१. काही आत्मपरीक्षण.
२. स्वत:चे विश्लेषण करणं.
३. आपला भूतकाळ पाहून निर्णय घेणं.
४. जीवनात लक्ष केंद्रित करणं.
५. आयुष्यात योग्य ध्येय ठेऊन आज नीट जगणं.
६. सकारात्मक बोलून व काम करत चालत राहणं.
७. मित्र, परिवार यांच्यावर मनापासून प्रेम आणि विश्वास.
सावधानतेचे इशारे निसर्ग नेहमीच देतो परंतु आपल्याकडे ते इशारे ओळखण्याचे तंत्र अवगत हवे. जे आपल्याला, अनुभवातून, गुरूंकडून, वरिष्ठांकडून, कुटुंबातील व्यक्तींकडून मिळत असते. प्रश्न फक्त त्यावर आपण काय प्रतिक्रिया देतो त्यावर निर्भर असते ते आपले हसणे किंवा रडणे.
©श्रीकांत कुलांगे.
9890420209