नात्यांतील समजूतदारपणा

प्रेग्नन्ट अनु विचारात होती कि माणसाने समजूतदार दाखवायला काही सीमा असतात का? मला आधी घरी, आता सासरी सहन करावे लागतेय. सहनशक्ती आकलनाच्या पलीकडे गेलीये. तिची अगतिकता मनाला भिडली. सर्वसाधारण, समजूतदारपणा म्हणजे दुस-याच्या कोणत्याही बोलण्याला व वागण्याला होकार दयायचा. पण अनुच्या स्वभावाला काही जणांनी गृहित धरले आणि काहींनी तर त्यांच्या आवडी-निवडीप्रमाणे किंवा स्वभावाचा उद्रेक होईपर्यत वागविले. मग अनुने समजूतदारपणा दाखविला असे होते का ? नाही समजूतदारपणा हा वेगळा असतो आता तो प्रत्येकाच्या, घराच्या, संस्कारांच्या, आजू बाजूच्या परिस्थितीने तो सूचकपर असतो व होतो. अशा व्यक्तींशी संबंध आपण तोडू इच्छित नसतो पण त्यांना तितक्याच धीराने सामोरे जाणे गरजेचे असते.

१. सर्वात महत्वाचे त्याच्या मतांचा आदर करणे. ( Don’t React immediately)
२. हळूहळू तिला त्याबाबतचे कालानुरूप होणारे आर्थिक व कौटूंबिक परिणाम काय होणार याची जाणिव करुन दयावी.
३. जर त्या व्यक्तीला काही अडचणी असतील तर प्रथम त्या ऐकून समजून घ्याव्यात.
४. आपल्याला ते कसे जमणार नाही किंवा असे का करु नये वा चुकीची शिकवण / संस्कार किंवा सवय आहे हे त्याला पटेल अशा भाषेत हळूच सांगून तुमच्यापुढे उपलब्ध असलेले पर्याय आहेत का ते तपासून पहा…
५. मनाची ‘सौम्यता म्हणजे भित्रेपणा’ असा अनेकांचा समज आहे. मन शांत ठेऊन उत्तर दिले तर खंबीरपणा दिसून येतो.
६. धार्मिक मनुष्य विचार करून उत्तर देतो. पण दुर्जनांचे मुख वाईट गोष्टी बाहेर टाकते. आपण धार्मिक पद्धत निवडू शकता.
७. सकारात्मक दृष्टीकोन आणि थोडा समजूतदारपणा उपयोगात आणला तर ही समस्या सोडवता येईल.

अनुला सांगितले कि सासू व सून यांच्यातील संबंध जुन्या रूढीनुसार आता कितपत ताणायचे ते समजुतीने घेतले तर ताणतणाव कमी होतील.
नातेसंबंध मधुर, स्वस्थ आणि सुदृढ करायचे असतील, तर :

* नकारात्मक विचार करणार्‍या लोकांपासून सावध राहा. न अडकता नात्यांमध्ये समजूतदारपणा दाखवा.
* सोनेरी नियमाची (गोल्डन रूल्स) अंमलबजावणी करून नात्यांत त्यांचा चमत्कार पाहा.
* तिरस्काराचा दुर्गंध नष्ट करून क्षमेचा सुगंध सर्वत्र दरवळू द्या.
* सर्वांत आधी काय? अहंकार की प्रेम?
* कुटुंबातील वादविवाद संपुष्टात आणा, संवादमंच बनवा.
* नाती रडत-खडत नव्हे, तर गुणगुणत सुदृढ करा. जुन्या रूढी परंपरा आता काही अंशी कालमय होत आहेत……..

कित्येक कुटुंबात सतत तणावग्रस्त वातावरण असतं, नेहमी वादविवाद होत राहतात. आपल्या कुटुंबात असं होऊ नये, असं वाटत असेल, तर आधीपासूनच याची काळजी घ्या, म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्य परस्परांशी सलोख्याने वागतील. अर्थात, तहान लागल्यावर विहीर खणण्याऐवजी आधीच आपण पाण्याची व्यवस्था केली, तर कोणत्याही समस्येवर योग्य उपाय, योग्य वेळीच आपल्याला गवसेल.

“विचार बदला, नात्यांमध्ये व्यवहार बदलेल”

©श्रीकांत कुलांगे
९८९०४२०२०९
( हा ब्लॉग लेखकाच्या नावासह शेअर करायला हरकत नाही.)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *