कळुन न वळणं व वैफल्यता

 

नुकताच तारुण्यात प्रवेश केलेला वैशालीचा मुलगा सतत चिडचिड करतो. वैशालीला आई म्हणून आपली भूमिका व महत्व यांची पूर्ण कल्पना आहे. मुलाची चिडचिड सुरू झाली की आपण कुठल्या चुकीच्या प्रतिक्रिया देतो याची जाणीव असून सुद्धा त्यात बदल न करता पुन्हा तीच चूक करते व त्यामुळे तिची अस्वस्थता अधिक वाढते. अशावेळेस जर ती शांत राहिली तर कदाचित तिला एवढा त्रास झाला नसता. त्याचा परिणाम म्हणून घरात अशांतता. नवरा बायकोला प्रश्न पडला आहे कि त्यांना हे सर्व कळतंय कि चुकतंय कुठे, पण वळत का नाही? माझा काय प्रॉब्लेम आहे?
मानसशास्त्रमध्ये कळुन न कळणे म्हणजे आतर्ककीकता. आतर्ककीक व्यक्ती शहानिशा न करता, निर्णय घेऊन तसे वागतो, त्याचा परिणाम त्याच्या मानसिकतेवर दिसून येतो. मनुष्याला सर्व सोपे, चटकन हवे असते. कळणे सोपे पण वळणे वेदनादायी असते. त्यासाठी शरीराला व मनाला नवीन सवयी परिश्रमपूर्वक जडवून घ्याव्या लागतात.
हे आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत वेगवगेगळ्या प्रसंगात कमी-अधिक प्रमाणात घडत असते. या अवस्थेस, ‘कळण्याचा पण वळण्याचा आभास’ म्हणतात. आभास यासाठी म्हटले जाते कारण ही अवस्था अनुभवताना, ‘कळणे’ आणि ‘वळणे’ या दोन भिन्न गोष्टी आहेत, हे आपण ध्यानात घेत नाही. आपण गृहीत धरतो की एखादी गोष्ट आपल्याला माहीत असेल तर त्या माहितीमुळे आपण ती आपोआपच कृतीत आणू. कळण्यामध्ये आपोआप वळण्याचे बळ नसते, तर स्वत:ला वळविण्यासाठी मुद्दाम वेगळे प्रयत्न करावे लागतात.

मनोविश्लेषक म्हणतात की,
१. कळूनही वळत नसेल तर तुमची अंतर्दृष्टीच कमकुवत आहे. ती प्रगल्भ करायला हवी. स्वत: च विश्लेषण करा.
२. वैफल्य, निराशा सहन करण्याची क्षमता वाढविणे. सोपं नाही. कारणे शोधून त्यावर उपाय करणे. समुपदेशन घेऊ शकता, घ्यान धारणेने फरक पडेल.
३. कृतीसाठी मुद्दाम प्रयत्न करा- स्वत:च्या वर्तनात परिवर्तन करण्यासाठी त्यांनी ठोस पावले उचलणे. (द सीक्रेट नावाचे पुस्तक) – चांगले विचार चांगल्या कृती करून घेते.
४. खूप मोठे उद्दिष्ट ठेवू नका. ते पायऱ्यापायऱ्यांत विभागा, पायरी छोटी असली तरीही ती आपोआप जमेल असे नाही. तर ती गाठण्यासाठी त्यांनी स्वत:ला सातत्याने उत्तेजन आणि प्रोत्साहन देणे.
५. परिपूर्णतेचा अट्टहास सोडा- आपल्या हातून काही चुका घडतील किंवा एखाददुसरा दिवस त्यानुसार कृती होणारही नाही, काळजी नसावी.
६. एका वेळी एकाच मार्गावर लक्ष केंद्रित करा. म्हणजे कृती करताना जर त्यातून फायदा होत असेल तर त्यात पारंगत व्हा.

सद्ययुगातील काही आव्हाने ही वैयक्तिक व्यवहारांपुरती मर्यादित न राहता संपूर्ण समाजाला व्यापून राहिलेली दिसत आहेत. नैराश्य व चिंतेचा समाजमनावरचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसतो आहे. एका बाजूला वैश्विक होत जाताना दुसऱ्या बाजूला संकुचित होत जाणारी सामाजिक मानसिकता अनेक प्रसंगांतून प्रत्ययाला येत आहे. प्रत्येकाने आपल्या जीवनात “हेतू” काय आहे हा शोधायला हवा व त्यानुसार जबाबदारी घेतली तर चिडचिड, त्रागा आपोआप कमी होईल. म्हणूनच मानसिक आरोग्य व आत्मव्यवस्थापनाची काळजी घेणे काळाची गरज आहे.

@श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *