निर्णय घेताय?

 

बऱ्याच काळापासून आपण तार्किक आणि विचारपूर्वक निर्णय घेतो आहोत. परंतु अलीकडील काळामध्ये, संशोधकांनी असे दाखवून दिलेय कि आपल्या पुष्कळशा मानसिक चुका, चुकीच्या निर्णयाला कारणीभूत आहेत. बरेच वेळा आपण भावनिक, असमंजसपणाचे आणि गोंधळात टाकणारे पर्याय निवडतो. मानसिक आरोग्य विकारांचे परिणाम निर्णय घेण्याची प्रक्रिया बदलू शकतात आणि लक्षणे वाढवू शकतात.

खाली काही सामान्य मानसिक चुका आहेत :

१. आपण इतर व्यक्तीचे अनुकरण करतो. समान धोरणे, युक्ती आणि सल्ले बहुतेक लोकांसाठी मदत करत नाहीत. उदा. रिचर्ड ब्रॅन्सन, बिल गेट्स आणि मार्क झुकरबर्ग यांनी शाळा सोडल्या आणि अब्जाधीश झाले! यशस्वी होण्यासाठी आपल्याला शाळेची आवश्यकता नाही असे म्हणून कुणीही शाळेत जाणे बंद करू नये.
२. आपले नुकसान टाळण्याच्या प्रवृत्तीमुळे आपण मूर्खपणाचे निर्णय घेतो. जसे कि आपल्याकडे असलेल्या गोष्टी सांभाळण्यासाठी खर्च करतो पण तिचा वापर करत नाही. देखरेखी वर जास्त लक्ष केंद्रित होते, खर्च होतो जो अजून नुकसान करतो.
३. भविष्यात बदल होणार म्हणून काहीही कारण नसताना निर्णयात बदल करणे. पुष्कळ वेळ आहे – आरामात निर्णय घेऊ शकतात.
४. प्रत्येक नवीन कल्पना चांगली कल्पना आहे याकडे कल असणे.
५. आपण घेतलेले निर्णय योग्य आहेत (नसूनसुद्धा) हे समजणे व त्याचे समर्थन करणे.
६. आपण केलेल्या कल्पना वास्तववादी आहेत असे समजून निर्णय घेणे. वास्तवात त्या नसतात.
७. “नाही म्हणायला” कौशल्याचा अभाव. काही लोकांना नाही म्हणवत नाही आणि भावनात्मक निर्णय घेतात.
८. केवळ आपल्याशी सहमत असलेल्यांचे ऐकणे.

असे एक न अनेक निर्णय चुकण्यामागे मानसशास्त्रीय काय करणे आहेत याबाबत बरेच संशोधन केले गेले आहे.
काही मानसिक कारणे खालील प्रमाणे :

१. मानसिक आरोग्य नीट नसेल तर नकारात्मक निर्णय घेतले जातात.
२. ताणतणावामध्ये घेतलेले निर्णय. ते बहुतांशी भावनिक असतात.
३. पटकन कुणावर विश्वास ठेवण्याची वृत्ती. भावनात्मक गुंतवणूक.
४. निराशेचा आपण घेतलेल्या निर्णयावर परिणाम अनेक प्रकारे होतो.
५. चिंता वाईट निर्णय घेण्यास प्रवृत्त करते.
६. भीती माघार घेण्यास प्रवृत्त करते. निर्णय क्षमतेवर परिणाम.

निर्णय प्रक्रियेच्या पायऱ्या :

१. निर्णयविषय समजून घेणे, वस्तुस्थिती जाणणे
२. निर्णय घेण्यासाठीचे आधार, निकष ठरवणे
३. निर्णयासाठी अनेक पर्याय शोधणे
४. निकषांच्या आधारे पर्याय तोलणे
५. उत्तम पर्याय निवडणे, त्यानुसार कार्यवाही कारणे.
६. निवडलेल्या पर्यायाचे परिणाम कालांतराने पडताळून पाहणे.
७. निर्णय प्रक्रियेमध्ये सुधारणा करत राहणे.

मग या सगळ्या गोष्टी सुस्थितीत कशा आणायच्या, चांगले निर्णय कसे घ्यायचे हि साधी सोपी गोष्ट आहे. सशक्त मन, आपली निर्णय क्षमता वाढवते. जर घेतलेले निर्णय योग्य असतील तर मानसिक बरोबर आर्थिक आरोग्य सुद्धा चांगले राहते. म्हणून मनाची काळजी घ्या, त्यासाठी आपल्या जीवनशैलीवर नियंत्रण ठेवा.

@श्रीकांत कुलांगे
9890420209

 

(वरील ब्लॉग लिहिण्यापाठीमागे पार्श्वभूमी:
काल शिपवर विलक्षण घटना घडली त्यातून बऱ्यापैकी विचार केल्यानतर वाटलं की याबाबत लिहावं. इथे एक ऑफिसर राजीनामा देतो
त्याला जाण्यासाठी विमान नाही, हॉटेल नाही. मग company tyala म्हणते तू राजीनामा दिलाय तर तू आता shipwar राहायचे खायचे बिल देणे, जोपर्यंत लॉक डाऊन उठत नाही. आली का पंचाईत. आता वैतागून राजीनामा मागे घेतला. म्हणजे निर्णय घेण्याची घाई त्याला जवळपास १० हजार USD इतकी गेली असती. :-))

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *