विचार सरणी

गेल्या काही दिवसापासून कामानिमित्त अनेक ठिकाणी भेटी दिल्या, अनेक यशस्वी लोकांना भेटून मी त्यांचं निरीक्षण केलं, लोकांशी चर्चा केली आणि यश नेमकं कशामुळे मिळतं, या गोष्टीबद्दल अधिक खोलवर जाऊन चर्चा केली, तितकी एक गोष्ट स्पष्ट होत गेली. “तुमचं बॅंकेतलं खातं, तुमचं आनंदाचं खातं आणि तुमच्या सर्वसाधारण समाधानाचं खातं, ही सर्व खाती किती मोठी आहेत, त्यांचा आकार किती मोठा आहे, हे तुमच्या विचारांच्या आकारावर अवलंबून असतं. भव्य विचार करण्याची किमया ती हीच.”

मोठा विचार करण्यामुळे एवढं, सगळं साध्य होतं, तर मग सगळेच जण तसा विचार का करत नाहीत?

१. आपल्या नकळत, आपण आपल्या भोवतालच्या विचारांनी घडलेले असतो. आणि हे भोवतालचे विचार बरेचदा लहान असतात, खुजेपणाचे असतात, भव्य नसतात.

२. आपल्या अवतीभोवती जे वातावरण आहे, ते आपल्याला मागे ओढत असतं, दुय्यम दर्जाच्या मार्गाकडे ढकलू पाहत असतं.

३. विचारांची जडणघडण योग्य पद्धतीने होत नाही व त्यातून चुकीचं पाऊल उचलले जाते.

४. योग्य विचारांचा अयोग्य वापर.

५. परिस्थिती अनुकूल नसल्याने विचार वृध्दींगत होत नाहीत.

६. नकारात्मक भूमिका व मानसिकता. त्यातून नको त्या विचारांना प्राधान्य दिले जाते.

 

काही विचार आपल्यावर बिंबवले जातात, जसे की,

‘ठेविले अनंते तैसेचि राहावे’ तुमचं नशीब तुमच्या हातात नाही, ‘नियती’ हीच तुमची कर्ती-करवीती असते. त्यामुळे, तुमची ती स्वप्नं विसरा, ते छान घर, तुमच्या मुलांचं चांगलं शिक्षण, अधिक चांगलं जीवन डे सर्व विसरून जा. परिस्थितीला शरण जा. आहे त्यात समाधान माना. “

याउलट, वेगळी विचारसरणी आपल्याला नवीन ठिकाणी घेऊन जाते असे पाहायला भेटते. यशस्वी कोण हे तुमचे विचार ठरवते. मग या विचारानं नेमकं कसं वृध्दींगत करायचं?

१. अस्वस्थते बरोबर मैत्री करणं. ही एक गोष्ट आहे जी आपल्या विचारांना चालना देत नाही. म्हणून दूर पळून जाण्याऐवजी मैत्री केलेली बरी असे मानसशास्त्रज्ञ सांगतात.

२. यशाची व्याख्या समजून घेणं महत्वाचं. ध्येय म्हणजे यश नव्हे. विचारांना त्या पद्धतीत आकार द्यावा लागतो.

३. योग्य मित्र, गुरु असणं म्हणजे आपल्या विचारांना व्यवस्थित खतपाणी घालणारे घटक.

४. असं बनायचं जिथे इतरांना सुद्धा तुम्हाला मदत करण्याची इच्छा व्हावी.

५. असलेल्या विचारांना पद्धतशीर आणि प्रभावीपणे मांडणे ही एक कला.

६. प्रवाही विचार असावेत. विचारांची दिशा योग्य ठेवल्यास यश मिळते.

७. मतभेद आणि वैचारिक दृष्टिकोन हे सवंगडी असतात. त्याशिवाय विचारांना योग्य दिशा मिळत नाही.

८. चांगल्या विचारासाठी योग्य आहार, नियमित ध्यान धारणा, व्यायाम व अध्यात्म नक्कीच महत्वाचं असतं.

९. सर्वात महत्त्वाचं, मन ताब्यात ठेवून योग्य विचारांची अमलबजावणीसाठी प्रयत्न करणे.

 

अनेकजण हेच म्हणतात की हे कसं करायचं बुआ? सगळं आपल्या हातात असत तर किती छान झालं असतं. अशा प्रकारच्या विचारांमुळे जगभरात उच्च पदस्थ नोकरिकरिता कमी माणसं मागणी करतात परंतु ७५% मागणी ही खालच्या दर्जाच्या पदासाठी असते.

जर डोळे उघडून पाहिलं तर हा फरक का होतो यावर उत्तर लगेच मिळेल. जो उच्च प्रकारचे स्वप्न बघतो, ते मिळवण्यासाठी धडपड करतो, त्याला आपण खूप कमी सहकार्य करतो. विचारांची देवाणघेवाण करणं आणि सकारात्मक भावना व त्यावर विश्वास ठेऊन पावलं उचलणे हे प्रमुख ध्येय असेल तर यश निश्चित हे आपल्याला सभोवतालच्या यशस्वी लोकांवरून दिसून येते.

 

©श्रीकांत कुलांगे

9890420209

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *