मजबुत मानसिकता

 

मला काही वाचकांनी विचारलं कि एखाद्याने मानसिकदृष्ट्या कसे मजबुत व्हावं. प्रथम त्यांना समजावून सांगितले की मानसिक बळकटी म्हणजे काय. जो मनुष्य मानसिकदृष्ट्या बळकट आहे तो स्वतःच्या शरीराशी, विचारांशी सुसंगत असतो आणि जीवनातील बर्‍याच गोष्टींमध्ये सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्यास सक्षम असतो. निर्भय आणि मानसिकदृष्ट्या बळकट व्यक्ती बनण्यासाठी त्यांना काही गोष्टी सांगितल्या. अधिक भावनिक स्थिरता, आत्मविश्वास आणि आनंदी होण्यासाठी आपण दररोज सराव करू शकता.

१. मानसिकदृष्ट्या सुदृढ का व्हायचे ते ठरवा. कशासाठी हे करायचं. फायदे जाणून घ्या मनाची तयारी आपोआप होते.
२. संतुलन करायला शिकणे – कभी ख़ुशी कभी गम..
३. निर्णय घेताना भावनात्मक विचार नसावा. त्यामुळे कदाचित निर्णय चुकतात, त्याला बुद्धीची जोड द्या.
४. मदत कशी घ्यावी हे शिकणे. प्रत्येक गोष्ट माहित नसते, मदत घेणे कमीपणा नाही.
५. ज्या गोष्टीवर आपले नियंत्रण नाही त्यांना स्वीकारणे.
६. रोज मानसिक ताकदीवर ध्यान देणे. आज म्हणजे वर्तमान.
७. दयाळूपणा कसा करावा ते शिकणे. तुमचे आनंदी विचार इतरांना देणे.
८. मानसिकदृष्ट्या भक्कम ध्येय सेट करणे. जितके ध्येय मोठे तितका तुमचा प्रयत्न मोठा.
९. आपण बदलू इच्छित असलेल्या गोष्टींची एक सूची तयार करणे. भरकटणे बंद होईल. वेळ वाचेल.
१०. भूतकाळातून शिकून पुढे जायचे ठाम पावले उचलणे. चुका पुन्हा होणार नाहीत. रोजनिशी (डायरी) लिहिणे
११. वाचन, नित्य व्यायाम, नाविन्याची आस, खरं बोलणे, वागणे आणि सकारत्मक समुदाय जवळ असणे.

या गोष्टी सरावाने साध्य होतात म्हणून निराश न होता वरील गोष्टीत नित्य जीवनाचा भाग बनवला तरी खूप झालं. जेंव्हा एखादी व्यक्ती मानसिक दृष्ट्या सशक्त होते तेंव्हा त्याचे फायदे प्रचंड होतात:
१. आपले विचार व्यवस्थापित करते, आपल्या भावनांचे नियमन होते.
२. आपली कार्यशक्ती वाढते. पद्धत सुधारते. आत्मविश्वास वाढतो.
३. आपण सर्वात महत्त्वाच्या गोष्टींवर आपले प्रयत्न आणि शक्ती केंद्रित करू शकाल.
४. संकटसमयी संयम ठेवण्यात यशस्वी होतात.
५. निर्णय क्षमता चांगली असल्याने अयशस्वी झाले तर हार न मानता दुसरा पर्याय निवडून वाटचाल शक्य करतात.

आयुष्यात जे हवे ते प्राप्त कित्येकदा नाही होत म्हणून नैराश्य येते व त्यातून एखाद्याचा अंत होतो, देशोधडीला लागतात, कुटुंब व्यवस्था मोडकळीस येते. अशा वेळेस जर आपली मानसिक निडरता शाबूत असेल तर टोकाची भूमिका न घेता डोक्याला पटतील असे निर्णय घेणे शक्य होते. वाईट व चांगला काळ येतील व जातील – त्यात तोच टिकतो जो खंबीर असेल. जर जमत नसेल तर मानसोपचार, आर्ट ऑफ लिविंग, योगा असे अनेक पर्याय आपल्या समोर असतात फक्त आपले इच्छाशक्ती हवी.

@श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *