व्यक्तिमत्व – एक काळजी उद्याची

काल मला विजयचा फोन आला आणि त्याने त्याच्या बायकोशी व इतरांशी जुळत नाही यावर भरभरून बोलत राहिला. त्याचे त्यालाच समजेनासे झाले कि नेमकं काय होतंय. काही जुजबी प्रश्न विचारून मला हवी ती माहिती मी मिळवली. त्याचं एकंदर व्यक्तिमत्व बाह्यरूपी जरी चांगलं असलं तरी मनातून संशय, भांडखोर वृत्ती, प्रचंड राग व चिडचिड हा त्याचा स्वभाव त्याच्या बाह्यरुपाशी मेळ खात नव्हता. हा एक विस्कळीत व्यक्तिमत्चाचा किंवा व्यक्तिमत्त्व विकाराचा प्रकार म्हणून ओळखला जातो.

व्यक्तिमत्व म्हणजे विचार, भावना आणि आचरण यांचे संयोजन जे आपल्याला आपली “ओळख” बनवत असते. बाह्य जगाकडे आपण कसे पाहतो, समजून घेतो आणि संबंधित राहतो, तसेच, आपण स्वत: ला कसे पाहतो, त्याचा हा मार्ग आहे. बालपणापासून या भावना आपल्याशी जुळत असतात व आकार देत असतात. पण जर यामध्ये काही गोंधळ झाला तर मात्र आपली ओळख हि चुकीची बनून जाते.

व्यक्तिमत्त्व विकार हा मानसिक विकृतीचा एक प्रकार आहे ज्यामध्ये स्वतः चे विचार, कार्य करण्याची पद्धत, कठोर वागण्याची सवय हि शरीरासाठी घातक असते. व्यक्तिमत्त्व विकार असलेल्या व्यक्तीला परिस्थिती आणि लोकांशी संबंधित भावनांना समजून घेण्यात आणि संबंध स्थापन करण्यात त्रास होतो. यामुळे संबंध, सामाजिक कामकाज, नियमित कार्य आणि शिक्षण यामधील महत्त्वपूर्ण समस्या आणि मर्यादा उद्भवतात. कित्येकदा अशा व्यक्तींना आपल्याला हा प्रॉब्लेम आहे हे समजत नाही आणि ते इतरांना दोष देत बसतात. अशा व्यक्तींना दररोजच्या ताणतणावांसह इतर समस्यांना सामोरे जाण्यास त्रास होतो. विजयच्या बाबतीत नेमका हाच प्रकार होत होता व त्याला आपल्या या सवयी नॉर्मल वाटत होत्या.

असं का होतं?
व्यक्तिमत्त्वाचे विकार सहसा किशोरवयीन वयात किंवा वयस्क झाल्यापासून सुरू होतात. व्यक्तिमत्व विकारांचे अनेक प्रकार आहेत. कित्येकदा ते लवकर लक्षात येत नाहीत. व्यक्तिमत्व आपल्याकडे आपल्या जीन्स द्वारे किंवा आपल्या सभोवतालच्या परिस्थिती यामुळे येत असतात.

आपण काय करू शकतो?
या व्यक्तींसाठी सायकोथेरपी, ज्याला टॉक थेरपी देखील म्हणतात, हि प्रमुख उपचार पद्धती आहे. परंतु कित्येकदा त्यांना मन ताब्यात ठेवण्यासाठी काही मेडिसिनचा देखील वापर केला जातो ज्याने करून त्यांच्या वागण्यात स्थिरता येते. काही थेरपी व्यक्ती कुठल्या स्टेज मध्ये आहे त्यावर ठरतात. ध्यान धारणा, सौम्य आवाजात बोलण्याची सवय लावणे, हास्यप्रयोग व बोलताना इतरांवर टीका न करणे इत्यादी गोष्टींचा उपयोग केल्यास फायदा होतो.

अजून ही विजय ला वाईट सवयी लागली नाही म्हणून तो लवकर समोपदेशाने बरा होईल याची ग्वाही देत त्याला थेरपी घेण्यासाठी भाग पाडले ज्याने करून त्याचे कुटुंबीय, मित्र परिवार पुन्हा एकदा आपल्यात घेऊ शकतील. आजही आपल्या सभोवताली अशा अनेक व्यक्ती आढळून येतात परंतु माहिती अभावी त्यांच्या कडे दुर्लक्ष केले जाते. लवकर मानसशात्रीय उपचार मिळाल्यास त्यांना त्याचा फायदा होईल व समाज सशक्त व्हायला वेळ लागणार नाही.

लक्षात ठेवा, समाज चांगला तर देश चांगला.

श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *