आपली जबाबदारी

 

जबाबदारी बाबत बऱ्याचदा आपण पाहिजे तेवढे सक्षम पाऊल उचलत नाहीत त्यामुळे खूप नुकसान होते. जेंव्हा हे कळतं तेंव्हा वेळ निघून गेलेली असते. नैतिक आणि वैयक्तिक जबाबदाऱ्या या दोन्ही महत्वाच्या आहेत. जबाबदारी म्हणजे सामान्य ज्ञान, अधिकार, नेतृत्व आणि परिपक्वता; आपल्याला त्याकरिता विचार करणे आणि वेळेवर निर्णय घेणे चांगले. मग असे कुठले घटक आहेत ज्यामुळे आपली जबाबदारी घेऊ शकू:

१. प्रामाणिकपणा, २. करुणा / आदर, ३. औचित्य, ४. जबाबदारी आणि ५. हिंमत.

सर्वानाच हे का शक्य नाही होत? जबाबदारी सुधारण्यासाठी काही कौशल्य लागतात, जसे कि,
१. स्वतःला प्रवृत्त करणे – कठोर परिश्रम, उत्साह, स्वतःला सुधारण्यासाठी सतत प्रयत्न, लवकर उठणे, स्वतःला बक्षीस देणे.
२. नैतिक असा – सत्य सांगणे, नियमांचे पालन आणि दिलेले वचन पाळणे.
३. वेळेचे व्यवस्थापन करा – पुढचे नियोजन. नोट्स, कामाची यादी.
४. पैसे व्यवस्थापण – जमाखर्च संतुलन आणि कर्ज भरण्यास सक्षम आहात याची खात्री कर्ज घ्या. राखीव रक्कम.
५. निर्णय क्षमता.

जीवनात जबाबदारी का हवी हेच कित्येकांना माहीत नाही. थोडक्यात सांगतो,

१.जबाबदारी स्वीकारल्यास आपल्या जीवनात सकारात्मक बदल करण्याची शक्ती मिळेल.
२.आपण इच्छित असलेल्या गोष्टी करू शकता. स्वप्नपूर्ती.
३. आपली प्रतिमा समाजात उंचावते. तुमच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलतो.

आपल्या संतुलित जीवनासाठी जबाबदारी घेण्याचे काही मार्ग आहेत. आपण प्रयत्न केला तर ते सहज शक्य आहे.
१.आपले विचार, भावना, शब्द आणि क्रियांची जबाबदारी घ्या.
२. दोष देणे व तक्रार करायचे थांबवा.
३. मनाला वाईट वाटून घेऊ नका.
४.स्वत: ला आनंदी बनवा व आज जगा.
५. आपला हेतू हीच शक्ती आहे असे मानून चला. यामुळे शांतता आणि आत्मविश्वास येईल. वेळेवर निर्णय घ्या.

जबाबदारी घेतली तर कौटुंबिक व्यवस्था रुळावर चालते अन्यथा नेहमी तडजोड करावी लागेल आणि मनस्थाप. त्यापेक्षा जबाबदारी घ्याच; मुलांनी त्यांची, पालकांनी स्वतःची, मित्रांनी व सहकाऱ्यांनी एकमेकांची, संस्था व औद्योगिक व्यवस्थापन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची आणि प्रत्येकाने आपली जबादारी स्वीकारायला हवी. सोशिअल मीडिया वर जबाबदारीने पोस्ट टाका. उगीचच मला त्रास होतो म्हणून इतरांना द्यायचा प्रयत्न बालिश असतो. कित्येकांना आपल्या कौशल्यावर, स्वतःवर विश्वास नसतो अशावेळेस समुपदेशन किंवा मानसोपचार आपल्याला मदत करतात. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल व एक जबाबदार नागरिक बनण्यास तुम्ही तयार असाल कारण शेवटी…

एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ.

@श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *