मानसिक आजार आणि पुरुषांची मानसिकता.

काल एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली ती म्हणजे पुरुषांची मानसिक स्वास्थ्य तपासणी करून घेणे अथवा त्यावर उपचार घेणे हे प्रमाण थोडे कमी दिसते. एक मानसिक स्वास्थ्य टेस्ट मी मित्रांना ऑनलाईन पाठवली आणि ४००० पुरुष मित्रांपैकी फक्त ११० जनांनी ती सबमिट केली. असे का होतं की पुरुष या गोष्टींपासून दूर राहतात. पुरूषांनी याबाबत थोडे जागरूक का राहिले पाहिजे?

१. पुरुष मंडळी मद्यपान, ड्रग्स, तंबाखू व इतर अमली पदार्थांचे सेवन अधिक करतात, त्यामुळे जास्त प्रमाणात मृत्यू पावतात.
२. आज पुरुष मंडळी स्त्रियांपेक्षा जास्त प्रमाणात मनोविकाराने त्रस्त आहेत. (WHO)
३. आत्महत्या करणारे पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त आहेत. डिप्रेशनमध्ये असणारे पुरुष कुणाशी जास्त बोलत नाहीत. त्यातून आत्महत्या हा पर्याय निवडला जातो.
४. पुरुषांचा असणारा चुकीचा समज की मला काही होणार नाही किंवा गैरसमज. माहितीचा अभाव.
५. शारिरीक स्वास्थ्य खराब असणे.

आजकाल सगळी माहिती असूनसुद्धा काही पुरुष मानसिक आजारी आहेत हे लवकर स्वीकारत नाही. तिथून खरी अधोगती सुरू होते. काय होईल जर आपण वेळीच काळजी नाही घेतली तर,

१. जास्त वेळ मानसिक विकार राहिला तर आपण अधिक डिप्रेशन मध्ये जातो.
२. निर्णयप्रक्रियेत अडथळे येतात.
३. नात्यांमध्ये दुरावा येतो. कामावर परिणाम होतो
४. थोडक्यात ठीक होणारा आजार पुढे लांबतो. त्यातून मधुमेह, हृदयविकार सुरू होतात.

ओळखायचे कसे मानसिक आजार?

१.मूड पटकन बदलतात. नॉर्मल रिअँक्शन नसणे.

२. कामावर असताना आपले नाव खराब होणे.
३. वजनात बदल जाणवतात.
४. दुःखी, निराशा जाणवणे. आनंद कमी वेळा दिसतो.
५. नेहमी डोकेदुखी किंवा पोटदुखी असे शारीरिक आजार.

मग काय करावं पुरुषांनी? दोन रस्ते दिसतात. वास्तव स्विकारावे. स्वीकारले तर काय करावे?

१. मानसिक आरोग्य नीट ठेवण्यासाठी अधिक माहिती घेणे.
२. मानसोपारतज्ज्ञ ठराविक चाचण्या घेऊन आपली मानसिक पातळी सांगू शकतात.
३. निरोगी राहण्यासाठी दिनचर्येत थोडासा बदल.
४. व्यायाम, योग. नित्य आनंदी वातावरणात रहा.
५. अमली पदार्थांपासून थोडे दूर बरे. अनेक व्याधी कमी होतील.
६. निर्णयप्रक्रिया सुधारेल व त्यातून नात्यांची विण चांगली राहते.

खूप काही बोलण्यासाखं पण मित्रांना मी आजुन कसे समजाऊन सांगू की मित्रांनो, या आणि स्वतःला प्रामाणिकपणे मनाच्या आरशात डोकवा आणि पहा आपण कुठे आहोत.

©श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *