वयस्कर व्यक्ती व सामाजिक चिंता

जसजसं आपलं वय वाढत जातं तसे आपल्यात शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. ज्या घरामध्ये वयस्कर मंडळी आहेत त्या घरातील व्यक्तींनासुध्दा मानसिक व शारीरिक त्रास जाणवतो. काही जण शांतपणे घेतात तर काहींना विलक्षण मनोविकार जडतात. वयस्कर मंडळी मात्र यादरम्यान सामाजिक चिंतेमध्ये गुंतून जातात. वृद्ध व्यक्ती चिंताग्रस्त होतो जेंव्हा:

१. अविवाहित असतो.
२. जेंव्हा जोडीदाराचा मृत्यू व नंतरच्या घटनांमुळे.
३. प्रकृतीची अथवा आर्थिक काळजी.
४. आयुष्यातील काही जुना वाईट काळ जो त्यांना आठवत राहतो.
५. मुलांनी दिलेली वाईट वागणूक.

जरी काही वयक्तिक चिंता कमी झाल्या तरी सामाजिक चिंता सतावत असतात, जशा की,

१. भीती – समाजातील त्यांच्या प्रती असणारी नकारात्मकता – अशी त्यांची धारणा.
२. इतरांसमोर बोलताना अडखळणे.
३. इतरांसमोर खाण्याची भीती.
४. पब्लिक बाथरूम वापरायची भीती.

अशा व्यक्तींना तरुणांची मदत घ्यायला संकोच किंवा भीती वाटते. वृद्धांना दम लागणे, स्पंदन वाढणे, श्वास घ्यायला त्रास होणे असे काही प्रकार विनाकारण जाणवल्या सारखे वाटते. अशावेळेस वृध्दांनीं काय करावे हे कितेकदा समजत नसते. अशावेळी,

१. डॉक्टरला भेटून रेगुलर चेक अप. घरच्यांना समजून घ्या,
२. समाजातील किंवा ज्यांच्याशी आपली मैत्री जमते अशा लोकांशी बोलणे. भेटणे, विरंगुळा, योगा, इत्यादी मन रमण्यासाठी मदत करतं. सामाजिक आणि घरकामात किंवा इतरत्र मदत.
३. सकारात्मक विचासरणी. कशात तरी मन गुंतवणे, शारीरिक आणि बौद्धिक कामे केल्यास आनंदी राहाल. वाचन, छंद, गाणी ऐकणं, नातावांबरोबर खेळणे, – खुश राहाल.
४. समुपदेशन वाटेल तेंव्हा घेणे. जरूर भेटा व आपले मन मोकळे करा.

ज्या घरात अशी मंडळी आहे त्यांनी काय करणे अपेक्षित आहे;
१. आपल्या वयस्कर व्यक्तीला डॉक्टर कडे नेऊन रेगुलर चेक करणे. त्यांच्या गोळ्या वेळेवर देणं.
२. मोठ्या आवाजात बोलतील, प्रसंगी रागवतील, फटकून – टोचून बोलतील,  ऐकणार नाहीत म्हणून सबुरीने घेणे योग्य. अशा वेळी त्यांच्या कलाने घेतले तर छान.
३. आपण जेंव्हा वृद्धांची काळजी घेतो तेंव्हा चेहऱ्यावर आनंद असूद्या. कारण तुमची मुलं तुम्हाला पाहत असतात. जर दुःखी कष्टी झालात तर मुलं तुमच्या पासून दूर पळू शकतात.
४. त्यांना वेळ दिला तर बरे वाटेल. गप्पा मारा.
५. शक्यतो त्यांच्या भावना समजून घ्या. रागावू नका त्यांच्यावर. खुश रहा व ठेवा.
६. जेवणाची व्यवस्था चांगली असेल तर शारीरिक व्याधी दूर राहते.

वास्तविक आज आपण covid मूळे घरात आहोत आणि वृध्दांना मदत करतो आहोत. पण काही जण मात्र त्यांच्या त्रासाने वैतागुन गेले आहेत. वैतागून कसे चालेल? जेंव्हा आपण लहान होतो, त्यांनीं नाही का आपल्याला सांभाळून घेतले? आज आपली वेळ आहे ते ऋण फेडण्यासाठी. वयोवृद्ध मंडळींची काळजी घेणे आपले व सामाजिक कर्तव्य आहे. विसरू नका, कायदा तेच सांगतो…

 

©श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *