विचलीत मन

माझं कामावर लक्ष केंद्रित होत नाही आणि सहज विचलित होतो. मी कसं मन केंद्रित करू तेच समजत नाही म्हणून मित्र विचारत होता. आज बसल्या बसल्या एका सेकंदात असे मन विचलीत करणाऱ्या गोष्टी अगदी जवळ असतात, मग तुम्ही कितीही शांत ठिकाणी असा. धेयप्राप्तीसाठी एकाग्रता जरुरी असते. लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेचा संबंध थेट यश आणि अपयश याच्याशी असल्याने विद्यार्थी, कामगार वर्ग, गृहिणी, व तरुण वर्ग कित्येकदा भरकटलेला दिसतो. लक्ष केंद्रित होऊ शकते परंतु ते एका दिवसात शक्य नाही. त्यासाठी मानसिक तयारी, सातत्य हवे. याबाबत काही तथ्य आहेत.

१. एकदा विचलित झाल्यावर पुन्हा लक्ष केंद्रित करण्यासाठी ५-२५ मिनिटे लागतात.
२. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ती आपल्या सुरक्षेसाठी काम करते. काही धोके असतील तर ते ध्यानात आणून देण्यासाठी आपल्या मनाला जागे करतात.
३. अनेकदा एकाच वेळी अनेक काम करण्याचा परिणाम असू शकतो.
४. इतर गोष्टी ज्यांचा आपण अनेकदा विचार करतो त्या आपल्या मनाभवती पिंगा घालत असतात. त्यामुळे अचानक दुसराच विचार डोक्यात येतो.
५. फोन कॉल, ईमेल, मित्र, इतर व्यक्ती आपल्याला विचलित करतात. आणि हे दिवसातून कित्येकदा होते.
६. सभोवालच्या वातावरणाचा परिणाम दिसून येतो. उदा. माती, हवा, आवाज प्रदूषण.
७. शारीरिक व्याधी, मानसिक आजार.
८. कामाचे अयोग्य नियोजन आणि व्यवस्थापन.

मनुष्यप्राणी आहोत हे न विसरता एकावेळेस ठराविक गोष्टी आपल्याला जमतील का याचा विचार कित्येकदा होत नाही. मित्रांचा हाच प्रॉब्लेम होता. साध्या गोष्टी आहेत ज्या आपले लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करतात व त्यांचा सराव सातत्याने करणे गरजेचं असतं.

१. एकाच वेळेस अनेक गोष्टी करणे हळूहळू सुरू केल्या तरच त्या यशस्वी होतात. त्यासाठी प्लॅनिंग, योग्य मनुष्यबळ आणि व्हिजन लागते.
२. लक्ष केंद्रित करण्यासाठी शरीराची साथ हवी. योग्य आहार, वेळेवर पुरेशी झोप, व्यायाम महत्वाची भूमिका निभावतात.
३. विचलीत करणाऱ्या गोष्टी म्हणजे, फोन silent मोड वर, नोटिफिकेशन्स सेटिंग बदलणे, स्मार्ट फोनचा वापर स्मार्ट पद्धतीने वापर, अशा पद्धतीचा वापर इष्ट.
४. ठराविक वेळी छोटा पाणी ब्रेक चांगला. वेळेचे नियोजन.
५. आदल्या दिवशी प्लॅनिंग करणं आणि त्याला फॉलो करणाऱ्या व्यक्तींचे लक्ष विचलित होत नाही असे सांगतात.
६. काम किंवा अभ्यास सुरू करायच्या आधी आपल्याला कुठल्या गोष्टी विचलित करू शकतात याचा विचार.
७. सकारात्मक विचारसरणी आणि सशक्त मन हे सगळ्यात चांगले गुण आपल्यात हवे.
८. समुपदेशन, मानसिक आरोग्य चाचणी, थेरपी आपल्याला मानसिक रित्या तयार करते. मानसोचारतज्ज्ञ मदत करतील.
९. सर्वात महत्त्वाचे, मोटिवेशन्. का आणि कशाकरीता मी हे काम करतोय याची जाणीव.

माहिती व सरावाचा अभाव कित्येकांना आपल्या ध्येयापासून वंचित ठेवतो. अवांतर वाचन आणि निरीक्षण अशा गोष्टी आपल्याला शिकवतात व त्यासाठी लहानपणापासून शिकवण असेल तर तो स्वभाव बनतो. लक्ष केंद्रित करण्यासाठी तयारी ठरवून करा परंतु झाली नाही म्हणून नाराज न होता प्रयत्न करत राहणं हेच जीवन. ध्यानात असूद्या…”सातत्य” हीच गुरुकिल्ली.

 

© श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *