स्मृती आणि दैनंदिन व्यवहार

मी आजकल बारीक बारीक गोष्टी विसरत चाललोय असे म्हणणारा मित्र पूर्ण विचारात गढून गेलेला दिसला. असं का होतं हे त्याला समजून उमजत नव्हतं. हीच गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यात घडतेय. आपली स्मृती विस्मरणात जातेय असे जाणवायला लागले आहे. मानसशस्त्रीय भाषेत, असे घडण्यामागे काही प्रमुख कारणे आहेत.

१. असलेली माहिती पाहिजे तेंव्हा न आठवणे.
२. असलेल्या माहितीची दुसऱ्या माहितीमध्ये मिक्स होणे किंवा हस्तक्षेप होणे. आणि मग ऐनवेळी लक्षात येत नाही.
३. नवीन माहिती ध्यानात न ठेवणे किंवा जास्त महत्त्व न देणे.
४. ध्यानात ठेवण्याची प्रेरणा नसणे. काय गरज ध्यानात ठेवायची असा विचार.
५. भूतकाळातील घडलेल्या घटनांचा परिणाम.
६. शारीरिक किंवा मानसिक असंतुलन. वृद्धापकाळ.
७. कमी झोप, अल्कोहोल किंवा ड्रग्स सेवन, चिंता, नैराश्य, डिप्रेशन, ठराविक औषधी सेवन, जास्त विचार इत्यादी.

परंतु थोड्याफार प्रमाणात आपण बऱ्याच गोष्टी विसरत असतो, मग कधीपासून आपण काळजी करणे अपेक्षित आहे?

१. रोजच्या जगण्यात येणाऱ्या गोष्टी नेहमी विसरणे. आता ध्यानात होते परंतु लगेच विसरणे.
२. नेहमीच्या ठिकाणी गेलो तरी ओळखीच्या जागा, रस्ते विसरायला होतं. पत्ता विसरणे.
३. नेहमीच्या ठिकाणी ठेवलेल्या वस्तू विसरणे…जसे की कारची चावी.

जर असे काही लक्षणे आपल्यात सातत्याने सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ दिसली आतरणि त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होत असेल तर मात्र डॉक्टरला, psychiatrist भेटणे क्रमप्राप्त. त्यामुळे प्रारंभीच विश्लेषण करून पुढील गोष्टी ठरवता येतील. ठराविक प्रयत्नांनी, बऱ्याच अंशी आपली स्मरणशक्ती पूर्ववत होऊ शकते फक्त काही अपवाद वगळता, जसे की शारीरिक इजा, मानसिक आघात. मग अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आपला विसरभोळेपणां असेल तर मग आपली स्मरणशक्ती चांगली होऊ शकते का? प्रयत्नाने काही गोष्टी नक्कीच आपल्याला मदत करतात.

१. मेंदूची कार्यक्षमता वाढविण्यासाठी निगडित व्यायाम करणे. ब्रेन पॉवर गेम खेळणे. बुद्धिबळ, नवीन स्किल, वाद्य संगीत यामध्ये भाग घेणे.
२. शारीरिक व्यायाम. कसेही करा पण व्यायाम ब नियमित ठेवा. एरोबिक्स, वॉकिंग मदत करतं.
३. वेळेवर व पुरेशी झोप, कॉफी कटऑफ टाईम, टीव्ही, मोबाईल, PC, लॅपटॉप झोपायच्या आधी एक तास बंद.
४. मित्रांशी गप्पा. घरात मिक्स होऊन हसी मजाक.
५. चिंता आणि नैराश्य, डिप्रेशन ची कारणे शोधून त्यावर उपाय करणे.
६. बुध्दीला चालना देणारे जेवण महत्वाचे. व्हिटॅमिन ची कमतरता असेल तर डॉक्टरचा सल्ला घेणं. शरीराचा प्रश्न असेल तर तो लगेच दाखवून मोकळे व्हा.
७. मानसोपचरतज्ज्ञ आपल्याला काही टिप्स किंवा थेरपी देऊन मदत करू शकतील.

जहाजावर काम करताना आम्हाला आधी शिकवले जाते की एक खिळा निघाला तरी जहाज बुडू शकतं तसेच आरोग्याचे पण आहे. प्राथमिक लक्षणं दुर्लक्षित केले तर आयुष्यभर पस्तावा. म्हणून काळजी घ्या व मस्तपैकी आपल्या कुटुबियांसमवेत वेळ घालवा.

©श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *