विवाहाच्या अगोदर आणि नंतर जोडप्यांना समजायला लागते की लग्न करणे आणि निभावणे समजतो तेव्हढे सोपे नाही. काही तरुण मुलांशी संवाद साधला असता त्यांनी अनेक प्रश्न विचारले की असं काय होतं की ज्यामुळे आज जोडप्यांमध्ये भांडणे होतात आणि हे न होण्यासाठी कुठले प्रयत्न केले पाहिजेत. भांडणे होण्यासाठी काही कारणे आहेत.
१. मोकळा वेळ.
२. पैसा.
३. घरकाम.
४. शारीरिक जवळीक नसणे.
५. विस्तारित कुटुंब.
६. राग. निराशा. उदासीनता. मानसिक/शारीरिक आजार.
७. अहंभाव.
८. असमंजस व्यक्तिमत्त्व.
९. शंकेखोर स्वभाव.
१०. इतरांच्या हस्तक्षेपामुळे.
११. Ex फॅक्टर.
अत्यंत क्लेशदायक परिस्थितीत जोडपी राहतात व त्यात दोन्ही बाजूच्या कुटुंबांना प्रचंड मनस्ताप होतो. हे घडू नये म्हणून लग्नाअगोदर जर जोडप्यांनी समुपदेशन घेतले तर फायदे होतात.
१. निरोगी आणि प्रभावी संवाद साधण्यासाठी समुपदेशक मदत करतात. विवाहपूर्व आणि पश्चात बदलणारे संवाद यांची ओळख.
२. एकमेकांच्या आवडी आणि निवडी एकमेकांना कशा प्रकारे त्रास देऊ शकतात याबाबत चर्चा व समुपदेशन.
३. वैवाहिक व कौटुंबिक मानसशास्त्र यांची ओळख.
४. येणाऱ्या अडीअडचणी आणि त्यांना सकारात्मकतेने तोंड कसे द्यायचे याबाबत मार्गदर्शन.
५. शारीरिक व मानसिक बदल. डॉक्टरांचा सल्ला.
६. जोडीदाराच्या वर्तनात्मक पॅटर्नचे विश्लेषण करून आणि संघर्षास कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी ओळखुन त्यावर उपाययोजना.
७. मासिक पाळी आणि हार्मोन्स मधील बदल, त्यांचा शारीरिक व मानसिक परिणाम.
८. स्वप्नं आणि वास्तविकता यातील फरक प्रभावीपणे मांडणी जोडप्यासमोर ठेवण्यात येते.
९. नातेवाईक, अपेक्षा, घरपण, मानापमान, आवडनिवड, आदरातिथ्य यामधील तडजोड.
१०. जबाबदारी आणि निर्णयप्रक्रिया. त्यामध्ये प्रामुख्याने भूमिका विश्लेषण.
११. विवाहपूर्व चुकीच्या सवयी व त्यांचा होणारा परिणाम.
१२. फोन आणि इतर फॅक्टर यांचे वादामधील योगदान, त्यासाठी मानसिक तयारी.
असे अनेक प्रकार या विवाहपूर्व समुपदेशन मध्ये घेतले जातात आणि एकमेकांबद्दल आदर व प्रेम यांची भावना रुजवणे सोपे जाते. अर्थात असे समुपदेशन सर्वांनाच गरजेचे असते असे नाही. मग कुणाला लाभदायक आहे?
१. ज्यांना स्वतःचा संसार आनंदी रहावा असं वाटतं त्यांनी.
२. पुनर्विवाह. घटस्फोटीत व्यक्ती.
३. कुटुंबात वादाची पार्श्वभूमी किंवा भीती.
ज्याप्रकारे आजकालची जोडपी एकमेकांशिवाय राहायला लागली आहेत, हे खूप दुःखदायक असते. समाजात कुटुंबाची नाचक्की तर होतेच, परंतु स्वतःची हेळसांड होते ते वेगळेच.
जगभरात विवाहपूर्व समुपदेशन केले जाते आणि त्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. घरगुती गोष्टी मुलं किंवा मुलींना सांगितल्या जातात परंतु त्यांना त्या लक्षात येत नाहीत.
म्हणून काळाची पावले ओळखून लग्नाच्या अगोदर आणि नंतर (गरज भासल्यास) जरूर मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या व सुखी रहा.
©श्रीकांत कुलांगे
9890420209