वैवाहिक दृष्टिकोन व समुपदेशन.

काही सुखद बातम्या काल ऐकायला आल्या.  ज्यांना विवाहपूर्व समुपदेशन केले होते त्या काही जोडप्यांचे फोन येऊन गेले. त्यांच्या म्हणण्यानुसार मागील वर्ष जे लग्नानंतर अत्यंत छान गेले त्याला कारण एकमेव त्यांनी घेतलेले विवाहपूर्व समुपदेशन होय. त्यामुळे त्यांच्या विवाह पश्चात संसाराबाबत दृष्टीकोन सकारात्मक झाला.

आजही मी आग्रहाने सर्व मित्रपरिवाराला हेच सांगत आलोय की विवाहपूर्व आणि पश्चात समुपदेशन जरूर करून घ्या.
विवाहपूर्व समुपदेशन ही एक प्रकारची थेरपी आहे जी जोडप्यांना लग्नासाठी तयार होण्यास मदत करते आणि त्याबाबत असणारी आव्हाने, फायदे आणि त्यासह येणारे नियमांची ओळख करून दिली जाते.
सर्वात प्रथम विवाहावर परिणाम करणाऱ्या गोष्टी काय आहेत?

१. आपण किंवा आपल्या जोडीदारास बालपणातील अत्याचाराचा इतिहास असल्यास.
२. जर आपण किंवा आपल्या जोडीदारावर घरगुती हिंसाचार झाला असेल.
३. व्यभिचार म्हणजे काय यावर तुमचे किंवा तुमच्या जोडीदाराचे मत भिन्न असेल तर विवाहावर परिणाम होईल.
४. आपल्या किंवा आपल्या जोडीदाराबाबत अंतर्गत अपेक्षा असतील तर.
५. एकमेकांनी आपल्या गरजा कशा आहेत व काय करावे याबाबत गृहीत धरल्यास व त्यामुळे नंतर होणारे त्रास.
६. आपण किंवा आपल्या जोडीदाराचे निराकरण न झालेले विवाद असल्यास किंवा आपल्या विस्तारित कुटुंबांशी किंवा एकमेकांशी असंतोष असल्यास.
७. जोडीदार व आपल्यात निराशा आणि राग व्यक्त करण्याच्या पद्धती चुकीच्या वापरल्यास.
८. जोडीदाराशी विसंवाद किंवा सवांदात चुकीच्या पद्धतीचा अवलंब.
९. घरच्यांची किंवा इतरांची संसारात नको तेंव्हा लुडबूड, हस्तक्षेप.
१०. न सांगितलेल्या शारीरिक व मानसिक व्याधी असल्यास.
११. व्यक्तिमत्त्वातील फरक.
१२. नोकरी संबंधी तक्रार.
१३. एकमेकांना वेळ न देणं.
१४. आदर नसणे किंवा ती फिलिंग नसणे.
१५. अचानक जोडीदार चुकीचा निवडला याची जाणीव होणे.
१६. कामजीवन बाबत कमतरता.
१७. विवाहानंतर एकमेकांचे खरे स्वरूप समजणे.

अशा अनेक कारणांनी आपल्या वैवाहिक जीवनात व्यत्यय येतो म्हणून जर जोडप्यांनी विवाहपूर्व समुपदेशन घेतल्यास, अशा येणाऱ्या समस्या कशा सोडवायच्या किंवा त्यांना सामोरे कसे जायचे यावर विचार मंथन केले जाते.
तरीही पालक आणि जोडपी अशा समुपदेशनाची गरज भासत नाही असे का म्हणतात म्हणून आम्ही सर्व्हे केला. त्यातून निष्पन्न झालेले तथ्य काही असे आढळले.

१. फक्त वेड्यानांच समुपदेशनाची गरज असते व आमची मुलं चांगली आहेत म्हणून गरज नाही.
२. पाल्यांवरील अती विश्वास किंवा खरोखर असलेला विश्वास.
३. सुशिक्षित कुटुंबव्यवस्था.
४. विवाहपूर्व समुदेशनाबाबत माहितीचा अभाव.
५. वेळ नाही ही सबब.
६. समाज काय म्हणेल ही भीती.
७. संकुचित मनोवृत्ती.
८. मुलांची, मुलींची समुपदेशनसाठी नकारात्मक भूमिका.
९. होणारे संबंध माहितीतील कुटुंबातील असल्याने गरज भासत नाही.
१०. जे होईल ते पाहून घेऊ अशी भूमिका.
११. आपल्या संस्कारावरील विश्वास.

अशी कित्येक लग्न विना अडथळे पार पाडतात आणि सक्सेसफुल होतात. तरीही भारतामध्ये आजच्या घडीला अनेक तरुण जोडपी लग्ना नंतर लगेच वेगळी व्हायची भाषा बोलायला लागतात. असं का होतं, याचा विचार आपण सर्वांनी करायला हवा. त्यामुळे होणारी हानी प्रचंड मानसिक त्रास देणारी असते.

१. जोडप्यांचे मतभेद रस्त्यावर, ऑफिसात, विमानात, बस मध्ये, लग्न समारंभात दिसून येतात.
२. कौटुंबिक जीवनात व्यत्यय.
३. पैशांचा अपव्यय.
४. सामाजिक मानहानी.
५. जोडप्यातील एखाद्याकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोन बदलणे.
६. मानसिक स्वास्थ्य बिघडण्यास कारणीभूत.
७. न्यूनगंड निर्माण होणे.
८. पुढील भविष्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होते.

सकारात्मक बदल घडवायचा असेल तर आता नवीन जीवनमानानुसार आपणही बदलायला हवं. फक्त नशिबावर अवलंबून न राहता नाविन्याची कास धरून कुंडली किंवा रक्ताच्या चाचण्या प्रमाणेच, जोडीदार आपल्या मानसिकतेचा आहे की नाही हे जरूर चेक करायला हवं. यातून अविश्वास निर्माण न होता वैवाहिक आयुष्य सुरळीत होऊ शकते. भारतामध्ये याबाबत अजूनसुद्धा पूर्णपणे जनजागृतीचा अभाव आहे. घटस्फोटाचे वाढते प्रमाण आज वाढत आहे ते आपण आधीच रोखू शकलो तर होणारी हानी नक्कीच टाळू शकतो.

©श्रीकांत कुलांगे.
9890420209

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *